2 उत्तरे
2
answers
जागतिकीकरण म्हणजे काय?
0
Answer link
जागतिकीकरण म्हणजे
१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .
२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .
३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .
=जागतिकीकरणाच्या व्याख्या:
१. हेराड, टाथेल आणि रॉबर्ट:- "जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थ व्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे."
२. एडवर्ड हार्मनः- " जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा आणि आर्थिक क्रिया प्रक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष करणारी प्रक्रिया आहे."
३. बायलिस आणि स्मिथ: - "जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणा-या लोकांमध्य वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय."
४. कॉक्स आणि कॉटन;- " जागतिक भांडवलशाही मधुन निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी, आंतररष्ट्रीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्राची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.'
५ स्मिथ:- " आंतरराष्ट्रीय आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश असणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया आहे."[३]
6 जागतिक बँकः- जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया होय
0
Answer link
जागतिकीकरण म्हणजे विविध देशांतील लोकांचे, कंपन्यांचे आणि सरकारांचे परस्परांशी वाढलेले संबंध.
सोप्या भाषेत: जागतिकीकरण म्हणजे जगाला एका मोठ्या खेड्यात रूपांतरित करणे. ज्यामुळे जगातील कोणतीही वस्तू, विचार, संस्कृती, किंवा माहिती सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकते.
जागतिकीकरणामुळे काय होते:
- आर्थिक विकास: व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ होते.
- सांस्कृतिक देवाणघेवाण: वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांना समजून घेतात.
- तंत्रज्ञानाचा प्रसार: नवीन तंत्रज्ञान जगभर पोहोचते.
जागतिकीकरण ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
अधिक माहितीसाठी: