तत्त्वज्ञान आधुनिकतावाद

आधुनिकतावाद म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

आधुनिकतावाद म्हणजे काय?

0

ख्रिस्ती धर्मातील एक सुधारणावादी विचारसरणी. एकोणिसाव्या शतकात विज्ञानोदयाच्या व बुद्धिवादाच्या प्रभावाखाली ख्रिस्ती धर्माच्या परंपरागत व तात्त्विक विचारांमध्ये परिवर्तन होऊ लागले. तसेच विज्ञानाशी व बुद्धिवादाशी जुळेल, असा ‘पवित्र-पुस्तकाचा’ (होली बायबलचा) नवा अर्थ किंवा उपपत्ती मांडण्याचा प्रयत्‍न सुरू झाला. यासच आधुनिकतावाद म्हणतात. जर्मनीत डी. एफ्. श्ट्राउस (१८०८−७४) आणि फ्रान्समध्ये जोसेफ अर्नेस्त रनां (१८२३−९२) यांनी अनुभववाद, विकासवाद आणि वैज्ञानिक शोध यांच्याशी सुसंगत ठरणारी ख्रिस्ती धर्माची ऐहिक उपपत्ती मांडली. इंग्‍लंड व इटली या देशांतही धर्माला आधुनिकतावादी साज चढविण्यात आला. आधुनिकतावादाचा प्रभाव कॅथलिक धर्मप्रचारकांच्या धर्मप्रचारावरही होऊ लागला. त्यामुळे प्रतिक्रिया निर्माण झाली. दहावा पोप पायस यांच्या कारकिर्दीत (१९०३−१४) या आधुनिकतावादाची ६५ मुद्यांमध्ये मांडणी करण्यात येऊन तो मान्य करण्यात आला. मध्ययुगात अभेद्य वाटणाऱ्या ख्रिस्ती धर्माच्या बौद्धिक आणि राजकीय इमारतीला मानवतावाद, प्रबोधनकाल आणि मार्टिन ल्यूथर यांची धर्मसुधारणेची चळवळ यांनी धक्के दिले. यांच्या माध्यमातून धर्माच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात सत्य काय आहे, ह्याचा निर्णय व्यक्तीला स्वतंत्रपणे करता येतो, हा सिद्धांत यूरोपीय संस्कृतीत रुजविला गेला. बेकन काय, देकार्त काय आणि ल्यूथर काय, सत्याकडे जाणारा मार्ग मानवी विवेकाच्या माध्यमातून जातो, असेच मानत होते.

विज्ञानप्रधान व बुद्धिवादी अशा पश्चिमी संस्कृतीच्या संपर्कामुळे भारतातही पंरपरागत हिंदू धर्माची आधुनिकतावादी उपपत्ती मांडण्याचा प्रयत्‍न आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज तसेच इतर अनेक हिंदू धर्मसुधारक यांनी केला. हिंदू धर्मावर नितांत श्रद्धा; परंतु परंपरागत जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता, बालविवाह, विधवाधर्म, मूर्तिपूजा इत्यादींचा अव्हेर करणारा, कालोचित विचार हिंदुधर्मियांत मूळ धरू लागला.


उत्तर लिहिले · 26/4/2022
कर्म · 53710
0

आधुनिकतावाद (Modernism) ही एक तात्विक आणि कलात्मक चळवळ आहे जी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात विकसित झाली.

व्याख्या:

  • आधुनिकतावाद म्हणजे पारंपरिक विचार, कला आणि सामाजिक रचनांना नाकारून नवीनता, प्रयोगशीलता आणि वैयक्तिक अनुभवांवर लक्ष केंद्रित करणे.
  • हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रांतीमुळे समाजात झालेल्या बदलांना प्रतिसाद म्हणून उदयास आले.

आधुनिकतावादाची काही वैशिष्ट्ये:

  • नवीनता आणि प्रयोगशीलता: आधुनिकतावादी कला आणि साहित्यात नवीन तंत्रांचा आणि शैलींचा वापर केला जातो.
  • अमूर्तता: अनेक आधुनिकतावादी कलाकारांनी वास्तविकतेचे थेट चित्रण करण्याऐवजी अमूर्त कल्पना आणि भावना व्यक्त करण्यावर भर दिला.
  • व्यक्तिवाद: व्यक्तीच्या भावना, अनुभव आणि अस्तित्वावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.
  • अनैतिहासिकता: भूतकाळातील परंपरा आणि मूल्यांना नाकारून वर्तमानावर लक्ष केंद्रित केले जाते.

उदाहरण: चित्रकला, साहित्य, वास्तुकला आणि संगीत यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आधुनिकतावादाचा प्रभाव दिसून येतो.

  • चित्रकला: पाब्लो पिकासो (Pablo Picasso) आणि वासिली कांडिन्स्की (Wassily Kandinsky) यांच्या चित्रांमध्ये आधुनिकतावादी विचार दिसतात.
  • साहित्य: जेम्स Joyce आणि टी.एस. Eliot यांच्या लेखनातून आधुनिकतावादी विचार व्यक्त होतात.

अधिक माहितीसाठी, आपण हे दुवे पाहू शकता:

  1. Wikipedia - Modernism
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
आशयाचा वास्तववाद ही संकल्पना स्पष्ट करा?
बुद्धीवाद आणि अनुभववाद यातील फरक स्पष्ट करा?
किंFormatError: Invalid argument(s)वा ची व्याख्या लिहा?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
मार्क्स प्रणित परमात्म्याची संकल्पना स्पष्ट करा?