आयुर्वेद
आरोग्य व उपाय
नैसर्गिक उपाय
आपण वेदनाशामक (पेन किलर) गोळ्या घेण्याऐवजी कोणत्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करू शकतो?
2 उत्तरे
2
answers
आपण वेदनाशामक (पेन किलर) गोळ्या घेण्याऐवजी कोणत्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करू शकतो?
1
Answer link
शरीरातील वेदना दूर करण्यासाठी आयुर्वेदात खूप चांगली औषधे आहेत..
पतंजली ची पिडांतक वटी नियमित घेतल्याने वेदना दूर होतात..तसेच शिलाजीत रसायन वटी..महावात विध्वंस न रस वटी घेतल्याने सुध्धा शरीराला आवश्यक ती खनिजे आणि व्हिटॅमिन ची पूर्तता होऊन वेदना कमी होतात..चंद्रप्रभा वटी मुळे पाठ व कंबर दुखी बंद होते..मी याचा अनुभव घेतला आहे.( रक्तदाबाचा त्रास असल्यास शिलाजीत रसायन वटी चा वापर जपून करावा )
अगदी घरगुती औषधे बनवायची असतील तर..कच्चा लसूण जेवताना 1, 2 पाकळ्या खावा..
ओवा , सुंठ, हळद, मेथ्या, गूळ , गायीचे तूप यांचे मिश्रण असलेले छोटे लाडू तयार करून सकाळी खाल्ले तरी वेदनेत लाभ होतो..तसेच सकाळी अभ्यंग स्नान केल्यास , शरीराचे कडक थंडी आणि उन्हा पासून रक्षण केल्यास शारीरिक वेदना कमी होतात… रासना,. निर्गुंडी, अश्वगंधा, पारिजातक ची पाने यांच्या नियमित वापर केल्यास वात दोष हळू हळू कमी होत जाऊन वेदने पासून मुक्ती मिळते..( याच आशयाचे अजून एक उत्तर मी लिहिलेले आहे..)
शरीरात विषारी द्रव्य(toxins) साचले तरी आळस येतो शरीर दुखते..म्हणून ते डिटॉक्स करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करावा. रात्री चमचा भर एरंडेल तेल घ्यावे..किंवा रोज सकाळी गरम पाणी लिंबू मध घालून प्यावे..
परंतु गंभीर दुखण्या मध्ये तज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
0
Answer link
वेदनाशामक (पेन किलर) गोळ्यांऐवजी आपण खालील आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करू शकतो:
-
हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्व असते, ज्यात वेदनाशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.
- उपयोग: हळदीचे दूध प्यावे किंवा हळदीचा लेप लावावा.
-
आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे वेदना कमी करण्यास मदत करतात.
- उपयोग: आल्याचा चहा प्यावा किंवा आल्याचा लेप लावावा.
-
लसूण: लसणामध्ये दाहक-विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात.
- उपयोग: लसणाचे तेल लावावे किंवा लसूण खावा.
-
मेथी: मेथीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात.
- उपयोग: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे किंवा मेथीची भाजी खावी.
-
दालचिनी: दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
- उपयोग: दालचिनीचा चहा प्यावा किंवा दालचिनीचा लेप लावावा.
-
लवंग: लवंगामध्ये युजेनॉल नावाचे तत्व असते, जे वेदनाशामक आहे.
- उपयोग: लवंगाचे तेल दुखणाऱ्या भागावर लावावे.
-
पुदीना: पुदिन्यात वेदनाशामक आणि थंड गुणधर्म असतात.
- उपयोग: पुदिन्याचा रस प्यावा किंवा पुदिन्याचा लेप लावावा.
टीप: कोणतीही आयुर्वेदिक उपाययोजना करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.