Topic icon

नैसर्गिक उपाय

1
शरीरातील वेदना दूर करण्यासाठी आयुर्वेदात खूप चांगली औषधे आहेत..

पतंजली ची पिडांतक वटी नियमित घेतल्याने वेदना दूर होतात..तसेच शिलाजीत रसायन वटी..महावात विध्वंस न रस वटी घेतल्याने सुध्धा शरीराला आवश्यक ती खनिजे आणि व्हिटॅमिन ची पूर्तता होऊन वेदना कमी होतात..चंद्रप्रभा वटी मुळे पाठ व कंबर दुखी बंद होते..मी याचा अनुभव घेतला आहे.( रक्तदाबाचा त्रास असल्यास शिलाजीत रसायन वटी चा वापर जपून करावा )

अगदी घरगुती औषधे बनवायची असतील तर..कच्चा लसूण जेवताना 1, 2 पाकळ्या खावा..

ओवा , सुंठ, हळद, मेथ्या, गूळ , गायीचे तूप यांचे मिश्रण असलेले छोटे लाडू तयार करून सकाळी खाल्ले तरी वेदनेत लाभ होतो..तसेच सकाळी अभ्यंग स्नान केल्यास , शरीराचे कडक थंडी आणि उन्हा पासून रक्षण केल्यास शारीरिक वेदना कमी होतात… रासना,. निर्गुंडी, अश्वगंधा, पारिजातक ची पाने यांच्या नियमित वापर केल्यास वात दोष हळू हळू कमी होत जाऊन वेदने पासून मुक्ती मिळते..( याच आशयाचे अजून एक उत्तर मी लिहिलेले आहे..)

शरीरात विषारी द्रव्य(toxins) साचले तरी आळस येतो शरीर दुखते..म्हणून ते डिटॉक्स करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करावा. रात्री चमचा भर एरंडेल तेल घ्यावे..किंवा रोज सकाळी गरम पाणी लिंबू मध घालून प्यावे..

परंतु गंभीर दुखण्या मध्ये तज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.


उत्तर लिहिले · 23/4/2022
कर्म · 1850
1

तुरटीचे पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे 

तुम्ही तुरटीचे अनेक उपयोग ऐकले असतील, पण तुरटीच्या वापराबद्दल ऐकले आहे का? होय! तुरटीचेही सेवन केले जाते. तुरटी हा एक पारदर्शक मिठासारखा पदार्थ आहे जो स्वयंपाकासाठी तसेच औषधी कारणांसाठी वापरला जातो. तुरटीचा वापर आयुर्वेदात पावडरच्या स्वरूपात केला जातो. फुफ्फुसातील श्लेष्माचे प्रमाण कमी करून डांग्या खोकला नियंत्रित करण्यासाठी मधासह स्फटिक भस्माचा वापर केला जातो.तुरटीचे पाणी पिऊनही अनेक फायदे मिळू शकतात. तुरटीचे पाणी घरी सहज उपलब्ध आहे आणि औषधांचा स्वस्त पर्याय, तुरटीच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुरटीचा प्रभाव उष्ण असतो, या कारणास्तव ते प्रमाण प्रमाणात सेवन करावे.  तुरटीचे पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ शकाल.

तुरटीचे पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे - 
तुरटीचे पाणी कसे बनवायचे : तुरटीचे पाणी कसे बनवायचेएका भांड्यात पाणी उकळत ठेवा, त्यात तुरटीचा तुकडा घाला, वितळायला लागल्यावर गाळून घ्या. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे अनेक समस्या आणि आजारांपासून आराम मिळेल.तुरटीचे पाणी पिण्याचे फायदे: तुरटीचे पाणी हिंदीत फायदेतुरटीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून डिटॉक्सची प्रक्रिया सुरू करते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.अॅसिडिटी आणि गॅसची तक्रार असल्यास तुरटीचे पाणी खूप फायदेशीर ठरते. यामुळे पोट साफ तर होतेच पण बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.अॅनिमियासारख्या आजारात हे पाणी प्यायल्याने रक्ताची कमतरता पूर्ण होते. तुरटीच्या पाण्यात भरपूर प्रमाणात लोह असते, ते रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासही मदत करते.तुरटीचे पाणी पिण्याचे तोटे : तुरटीच्या पाण्याचे  दुष्परिणामतुरटीच्या पाण्याचे सेवन केल्याने काही लोकांना ऍलर्जी देखील होऊ शकते. त्वचेवर व्रण सारखी समस्या देखील असू शकते.या पाण्याच्या अतिसेवनाने अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.



तुरटीचे पाणी पिण्याआधी कॅन्सरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, 
उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 121765
0
तुम्ही काही दिवसांपासून धावणे करत आहात, परंतु टायफॉइड झाल्यानंतर तुमचे पाय गळून जातात आणि एनर्जी जास्त वेळ टिकत नाही, तर या समस्येवर काही नैसर्गिक उपाय आणि आहारातील बदल खालीलप्रमाणे आहेत:

आहार:

  • प्रथिने (Protein):

    प्रथिने स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि ताकद वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.

    • उदाहरण: अंडी, चिकन, मासे, पनीर, टोफू, बीन्स, डाळी.

  • कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates):

    कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देतात.

    • उदाहरण: ब्राऊन राईस, ओट्स, शेंगा, बटाटे, फळे.

  • हेल्दी फॅट्स (Healthy Fats):

    हेल्दी फॅट्स हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि ऊर्जा देतात.

    • उदाहरण: नट्स ( बदाम, अक्रोड), बिया (चिया, फ्लेक्स), ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो.

  • व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स (Vitamins and Minerals):

    व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराच्या कार्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.

    • उदाहरण: हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, दही.

नैसर्गिक सप्लिमेंट्स:

  • अश्वगंधा:

    अश्वगंधा एनर्जी लेव्हल सुधारते आणि थकवा कमी करते.
    कसे घ्यावे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १-२ चमचे चूर्ण घ्यावे.

  • शिलाजीत:

    शिलाजीतमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
    कसे घ्यावे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २५०-५०० मिগ্রॅ प्रतिदिन घ्यावे.

  • व्हिटॅमिन बी12:

    व्हिटॅमिन बी12 लाल रक्तपेशी तयार करते आणि नर्व्ह फंक्शन सुधारते.
    कसे घ्यावे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी12 सप्लिमेंट घ्यावे.

  • आयरन (Iron):

    टायफॉइडनंतर शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे थकवा येतो.
    कसे घ्यावे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयरन सप्लिमेंट घ्यावे.

इतर उपाय:

  • पुरेशी झोप:

    दररोज रात्री ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

  • तणाव कमी करा:

    तणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान, किंवा श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा.

  • हाइड्रेटेड राहा:

    दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.

  • व्यायाम:

    हलका व्यायाम करा, जसे की चालणे किंवा स्ट्रेचिंग.

डॉक्टरांचा सल्ला:

  • सप्लीमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • तुमच्या लक्षणांनुसार डॉक्टर योग्य उपचार आणि सल्ले देऊ शकतील.

हे सर्व उपाय तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील आणि तुम्हाला लवकर बरे वाटेल.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
2
आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. जरी आपल्यास मधुमेह आजार नसेल, तरीही त्याचे सेवन आपल्याला भविष्यात या धोक्यापासून वाचवेल. कडूलिंबाची पाने संधिवात, सांधेदुखीच्या समस्या दूर ठेवते. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाने मालिश देखील करू शकता किंवा त्याच्या पानांचा लेप देखील लावू शकता.९ फेब्रु, २०२१कडुलिंबाची असते; परंतु आयुर्वेदात चव कडू असते; कडुलिंबाच्या झाडाची साल, देठ, लाकूड आणि सिंक अनेक आजारांचा उपचार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अँटीबॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्म असलेले कडुलिंब मुरुम, केस गळणे, खाज सुटणे, एक्जिमा यासारख्या समस्यांसाठी खूप प्रभावी आहेत. जर दररोज रिकाम्या पोटी ५-६ कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले तर एकही आजार तुम्हाला होणार नाही. जाणून घेऊ कडुनिंबाच्या पानाचे फायदे..

कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे...



१) रोग प्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती राखणे फार महत्वाचे आहे. महागडे औषध, सप्लीमेंट्स याऐवजी रिकाम्या पोटी आपण कडुलिंबाची पाने खाल्ली तर केवळ रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही तर त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. तसेच हे शरीरास विषाणू, बॅक्टेरिया, फंगस विरुद्ध लढण्यास मदत करेल.
कडुलिंबाचा प्रभाव थंड असतो म्हणून उन्हाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आपण हिवाळ्यामध्ये देखील त्याचा उपयोग करू शकतो; पण थोड्या प्रमाणात वापरू शकता.

x

अधिक जानका२) अँटीबॅक्टेरियाच्या समृद्ध

अँटीबॅक्टेरियल,

कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल, एंटीइंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला बऱ्याच रोगांपासून संरक्षण मिळते.

३) रक्त स्वच्छ होते

कडुलिंबामध्ये रक्तातील शुद्धीकरण करणारे गुणधर्म आहेत जे रक्तातील सर्व अशुद्धता काढून टाकण्यात मदत करते. तसेच, सकाळी कडुलिंबाची पाने चघळण्यामुळे रक्त जाड होण्याची समस्या उद्भवत नाही. नियमित सेवन केल्यास तुमचे शरीर टॉक्सिन फ्री राहते.४) कर्करोग प्रतिबंध

त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापूर्वीच नष्ट करतात. संशोधनानुसार, कडुलिंबाचे बियाणे, पाने, फुले व अर्क गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करतात.

ग्रीवेच्या आणि प्रोस्टेट कॅन्सर५) मधुमेहाचा धोका कमी होतो

आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपण रोज कडूलिंबाची पाने चावावी. यामुळे रक्तातील साखर पातळी नियंत्रित राहते. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. जरी आपल्यास मधुमेह आजार नसेल, तरीही त्याचे सेवन आपल्याला भविष्यात या धोक्यापासून वाचवेल.६) संधिवातसाठी योग्य उपचार

कडूलिंबाची पाने संधिवात, सांधेदुखीच्या समस्या दूर ठेवते. संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाने मालिश देखील करू शकता किंवा त्याच्या पानांचा लेप देखील लावू शकता.

७) पोटातील जंतू दूर होतात रिकाम्या पोटी कडुलिंब खाल्याने किंवा चहा प्यायल्याने पोटातील जंतू नष्ट होतात. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कडुलिंबाच्या गोळ्या देखील घेऊ शकता.८) त्वचा उजळते

कडुलिंबाची पाने चघळण्यामुळे रक्त साफ होते आणि त्यामुळे त्वचेमध्ये असलेले टॉक्सिंस देखील बाहेर पडतात. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम, एक्जिमा, त्वचेची इन्फेक्शन समस्या देखील दूर होते. आपण कडुलिंबाचे फेस पॅक देखील बनवू शकता.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121765
1
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात.

९) ऐकू न येणे- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) जुलाबासाठी- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) मुळव्याधासाठी- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

 ---------------------------------------------- 

उत्तर लिहिले · 16/8/2021
कर्म · 121765
0
उष्णतेसाठी खालील गुलकंद चांगले आहेत:
  • गुलाब गुलकंद: हे गुलकंद उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांवर गुणकारी आहे.

    उदाहरण: ॲसिडिटी, डोकेदुखी

  • आवळा गुलकंद: आवळा गुलकंद देखील उष्णतेसाठी चांगला असतो.
गुलकंद निवडताना तो चांगल्या प्रतीचा आणि नैसर्गिकरित्या बनवलेला असावा.

टीप: अधिक माहितीसाठी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
1
खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल तेलाने कोणताही साईड इफेक्ट, अॅलर्जी होत नाही.
मात्र पेट्रोलियम जेली वापरू नये.