मराठी भाषा व्याकरण

चौदावे रत्न दाखवणे ही म्हण कशी प्रचलित झाली?

1 उत्तर
1 answers

चौदावे रत्न दाखवणे ही म्हण कशी प्रचलित झाली?

4
चौदावे रत्न दाखविणे म्हणजे चाबकाने फोडून काढणे, चांगलाच समाचार घेणे, इंगा दाखविणे.

समुद्र मंथनातून प्राप्त झालेले चौदावे रत्न अमृत आहे.

अमृतामुळे देवदैत्‍यांत युद्ध होऊन दैत्‍यांना मार बसला.

त्‍यावरून चोप, मार असा अर्थ. कोणी याचा अर्थ चुकीने ‘चाबक’ असा करतात. शंखोऽमृतं चांबुधे-या श्र्लोक चरणांतील ‘चांबुधे’ चा चाबूक झाला! ‘आम्‍ही इतके धीट आहो की चवदावे रत्‍न आमच्या दृष्‍टीस पडलें की पुरें, आम्‍ही आपले पाय लावून पळत सुटलोच.’ -आगरकर. ‘आधी चवदाव्या रत्‍नाची गांठ पडते, त्‍यांतून निभावल्‍यावर पुढे पंधराव्याची गोष्‍ट बोलायची.’
उत्तर लिहिले · 20/4/2022
कर्म · 121705

Related Questions

मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते ?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
मराठी व्याकरणासाठी चांगली pdf मिळेल काय ?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
संयुक्‍तवाक्‍य व मिश्रवाक्‍य यांच्या विषयी माहिती मिळेल का?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?