2 उत्तरे
2
answers
घड्याळ कोणत्या भिंतीवर असावे?
3
Answer link
दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असते व वेळ सूर्यावरून ठरतो त्यामुळे……
.
.
.
नाही नाही नाही!!!
तसे काहीही नाही. ह्या अंधश्रद्धा आहेत. म्हणून माझा असल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. आमच्या घरातील मुख्य सर्वात जास्त वापरले जाणारे भिंतीवरचे घड्याळ उत्तरेच्या भिंतीवर आहे व दक्षिणेला तोंड करून आहे. कारण तेच सोयीस्कर आहे.
भिंतीवरचे घड्याळ सोयीच्या ठिकाणे असावे.
मग सोयोस्कर म्हणजे काय ?
आपण घरात जस्ट वेळ असतो तिथून कुठूनही मान जास्त न वळवता सहज दिसेल अशा भिंतीवर घड्याळ असावे.
सध्या भिंतीची घड्याळे खूप स्वस्त झाली आहेत त्यामुळे घरातल्या प्रत्येक खोलीत घड्याळ असायला हरकत नाही.
तसेच ड्रॉइंग रूममध्ये म्हणजे बसायच्या खोलीमध्ये तुमच्या घरी असलेले सर्वात चांगले दिसणारे घड्याळ दिसण्यासाठी म्हणून लावू शकता जर ते दिसण्यासाठी असेल तर त्याच्याकडे बघण्यासाठीचे जे नियम आहेत ते थोडेसे शिथिल करू शकता.
हा पहा कालच्याच उत्तरातील फोटो. ह्यातील घड्याळ हे शो साठी आहे व सध्या चालू पण नाही नीट.
आता प्रत्येक खोली प्रमाणे माझ्या दृष्टीने जे काय नियम वाटतात ते सांगतो.
बसण्याच्या खोलीमध्ये तुम्ही जिथे जास्त बसता तिथून सहज नजर जाईल असे घड्याळ लावावे. समजा तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर त्यांना घड्याळाकडे पाठ करून बसवावे म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर बसलात व तुमची नजर घड्याळाकडे जात असली तर त्यांच्या लक्षात नाही आले पाहिजे/ किंवा मुद्दाम लक्षात दाखवूनही देता येईल🤣
बऱ्याच वेळेला आपल्याला असे वाटते की हे पाहुणे आता कधी जातील? कधी जातील ? असो.
सध्या स्वयंपाक घरे व ड्रॉइंग वगैरे बर्याच वेळेला एकत्र असतात त्यामुळे ड्रॉईंग रूम मधले किंवा दुसऱ्या कुठल्यातरी खोली मधले एक तरी घड्याळ स्वयंपाक घरातून जिथे स्वयंपाकाचे काम तिथून सरळ दिसेल असे असावे. किंवा अशा ठिकाणी वेगळे घड्याळ लावावे.
त्याशिवाय समजा तुमच्या घरातील जवळची कोणी व्यक्ती परदेशात असेल व त्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे फोन वगैरे करायचा असेल तर त्यांचा घड्याळाचा टाईम सेट केलेले वेगळे घड्याळ असेल तर चांगले होते म्हणजे दर वेळेला गणित करून त्यांच्याकडे किती वाजलेत असे बघावे लागत नाही.
आमच्याकडे वरचे जे घड्याळ आहे ज्याला दोन बाजूंनी दोन घड्याळे आहेत. आम्ही सुरुवातीला एकावर इंडियन टाईम वर एकावर इंग्लंडचा टाईम असे सेट केले होते त्यावेळी माझी मुलगी इंग्लंडमध्ये शिकायला होती पण हल्ली आता ते बंद पडलेले आहे आणि त्याचा उपयोग फक्त दिसण्यासाठी आहे. फोनवर एक परदेशातील वेळ सेट केलेले घड्याळ आहे तेच वापरतो सध्या.
बेड रूम मध्ये वेगळे घड्याळ नक्कीच असावे व ते शक्यतो पलंगावरून बाजूला मान वळवल्यावर पटकन दिसेल असे असावे. बाजूला का? समोर का नाही? माझ्या मते बाजूने पाहणे सोपे जाते. तसेच असे असले तर आपण पलंगावर कुठल्याही बाजूला डोके करून झोपलो तरी ते दिसू शकेल.
अजून एक मुद्दा सांगतो : भिंतीवरचे घड्याळ म्हटले कि ते मुद्दाम १० -१५ मिनिटे पुढे करून ठेवण्याचेही प्रकार असतात. हे मुले शाळेत जायची असतात किंवा आपल्यला ऑफिस ला जायचे असते त्यावेळी लोक वापरतात. पण मग ह्यात अजून गोंधळ होऊ लागतो. मग ह्यात किती वाजले? खरे किती वाजले? असे अनेक प्रश्न पडतात व आपल्याला माहीतच असते हे घड्याळ पुढे आहे म्हणून. मग त्याचा काय उपयोग.
0
Answer link
घड्याळ भिंतीवर लावताना दिशा आणि जागा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ पूर्वेकडील, उत्तरेकडील किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावावे.
या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे:
-
दिशा:
- पूर्व दिशा: या दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जाते.
- उत्तर दिशा: उत्तर दिशा देखील सकारात्मक ऊर्जा देते.
- पश्चिम दिशा: या दिशेला लावल्यास घरात समृद्धी येते.
-
जागा:
- घड्याळ दरवाजाच्या समोर किंवा दाराच्या वरती लावू नये.
- घड्याळ अशा ठिकाणी लावा जेथे ते सहज दिसेल.
अधिक माहितीसाठी आपण वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घेऊ शकता.