आध्यात्म दिशा

जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे?

2 उत्तरे
2 answers

जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे?

2
जेवण करताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे.
 

पूर्व दिशा , जेव्हा तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून जेवता. तेव्हा तुमच्या मेंदूला उर्जा मिळते आणि पचन चांगले होते. कमकुवत पचनक्रिया पचन ही सर्व समस्यांचे मूळ कारण आहे. म्हणून पूर्व दिशेला बसूनच जेवण करावे. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांच्यासाठी पूर्व दिशा उत्तम आहे.


पश्चिम दिशा : पश्चिम दिशा ही लाभाची दिशा मानली जाते. त्यामुळे ही अन्न ग्रहण करण्यासाठीही चांगली दिशा आहे. व्यवसाय, नोकरी किंवा लेखन, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही दिशा चांगली मानली जाते. वास्तू म्हणते की जेव्हा तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून जेवता तेव्हा ती तुमच्या फायद्याची शक्यता वाढवू शकते.

.






उत्तर: ही दिशा ज्ञान आणि आर्थिक संपन्नता शोधणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या लोकांसाठी उत्तर दिशेत बसून भोजन करणे फायदेशीर ठरते. जे लोक करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यांच्यासाठी ही दिशा योग्य आहे.
 

दक्षिण दिशा : जेवणासाठी ही दिशा सर्वात वाईट आहे. मृत लोकांसाठी दक्षिण दिशा आहे आणि म्हणून वास्तुशास्त्र या दिशेला बसून खाणे टाळण्याचे सुचवते. ही यमाची दिशा आहे. विशेषत: ज्यांचे आई-वडील हयात असतील. त्यांनी या दिशेला बसून कधीही जेवण करू नये.


  जेवणाची खोली नेहमी घराच्या पश्चिम दिशेला असावी. ही दिशा शुभ आणि लाभदायक मानली जाते आणि जेव्हा लोक या दिशेला जेवतात तेव्हा आरोग्य चांगले राहते आणि अन्न आणि इतर मौल्यवान वस्तूंची कमतरता भासत नाही. जेवणाची खोली नेहमी घराच्या पश्चिम दिशेला असावी. ही दिशा शुभ आणि लाभदायक मानली जाते आणि जेव्हा लोक या दिशेला जेवतात तेव्हा आरोग्य चांगले राहते आणि अन्न आणि इतर मौल्यवान वस्तूंची कमतरता भासत नाही.



उत्तर लिहिले · 3/1/2023
कर्म · 53700
0
जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करावे याबद्दल काही मान्यता आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
  • पूर्व दिशा: या दिशेला तोंड करून जेवण करणे उत्तम मानले जाते. असे मानले जाते की या दिशेने सकारात्मक ऊर्जा (Positive energy) मिळते आणि आरोग्य सुधारते.
  • उत्तर दिशा: काही लोकांच्या मते उत्तर दिशेला तोंड करून जेवण करणे देखील शुभ असते.
  • पश्चिम दिशा: पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करणे मध्यम मानले जाते.
  • दक्षिण दिशा: दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे टाळावे, असे मानले जाते.

टीप: या मान्यता ज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांवर आधारित आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रम्हचर्या म्हणजे काय?
सूक्ष्मदेहाने संचार कसा करावा?
अग्निहोत्र दररोज एकाच व्यक्तीने करावे की घरातील कुणीही केले तरी चालते? तसेच घरातील सर्व जण बाहेरगावी गेल्याने अथवा सुतक वगैरे मध्ये अग्निहोत्र करण्यात खंड पडला तर चालते का, कृपया मार्गदर्शन करावे.
घरामध्ये देवघर कोठे असावे?
विपश्यना वयाच्या _____ वर्षापासून शिकता येते?
जंगलातील प्राण्याचा आत्मा अमर आहे का?
तुमच्या घरी आज महाराज आले होते का?