Topic icon

वास्तुशास्त्र

0

नवीन घर बांधायला सुरूवात करण्यासाठी शुभ मुहूर्त काढण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील:

  • तुमची जन्मतारीख आणि वेळ: या माहितीच्या आधारावर तुमच्यासाठी कोणता मुहूर्त चांगला आहे हे ज्योतिषशास्त्राच्या आधारे निश्चित केले जाऊ शकते.
  • पंचांग: पंचांगामध्ये शुभ दिवस, तिथी, नक्षत्र, योग आणि करण दिलेले असतात. बांधकाम सुरू करण्यासाठी योग्य मुहूर्त निवडताना ह्यांचा विचार केला जातो.
  • शुभ महिने: साधारणपणे वैशाख, श्रावण, कार्तिक आणि माघ हे महिने घर बांधकामासाठी शुभ मानले जातात.

मुहूर्त काढण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात:

  • एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्या.
  • ऑनलाईन पंचांग तपासा.

मुहूर्त काढताना तिथी नक्षत्र आणि ग्रहांची स्थिती पहावी.

हे लक्षात ठेवा की मुहूर्त हा एक मार्गदर्शक आहे. तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 30/3/2025
कर्म · 980
1
देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल.
उत्तर लिहिले · 20/12/2022
कर्म · 11785
2
घड्याळ जर बंद झालं असेल तर ते तात्काळ चालू करुन घ्या किंवा बदलून तरी घ्या. कधीही घरात बंद घड्याळं ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, बंद घड्याळं ही घराच्या विकास आणि आनंदावर बाधा आणत असतात. त्यामुळेच घड्याळाची टिक-टिक सुरु राहणं कायम गरजेचं आहे. तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे आणि कोणत्या दिशेला घड्याळ लावल्याने काय फरक पडतो.
उत्तर लिहिले · 26/4/2022
कर्म · 53715
3
दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असते व वेळ सूर्यावरून ठरतो त्यामुळे……

.

.

.

नाही नाही नाही!!!
तसे काहीही नाही. ह्या अंधश्रद्धा आहेत. म्हणून माझा असल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. आमच्या घरातील मुख्य सर्वात जास्त वापरले जाणारे भिंतीवरचे घड्याळ उत्तरेच्या भिंतीवर आहे व दक्षिणेला तोंड करून आहे. कारण तेच सोयीस्कर आहे.
भिंतीवरचे घड्याळ सोयीच्या ठिकाणे असावे.

मग सोयोस्कर म्हणजे काय ?

आपण घरात जस्ट वेळ असतो तिथून कुठूनही मान जास्त न वळवता सहज दिसेल अशा भिंतीवर घड्याळ असावे.

सध्या भिंतीची घड्याळे खूप स्वस्त झाली आहेत त्यामुळे घरातल्या प्रत्येक खोलीत घड्याळ असायला हरकत नाही.

तसेच ड्रॉइंग रूममध्ये म्हणजे बसायच्या खोलीमध्ये तुमच्या घरी असलेले सर्वात चांगले दिसणारे घड्याळ दिसण्यासाठी म्हणून लावू शकता जर ते दिसण्यासाठी असेल तर त्याच्याकडे बघण्यासाठीचे जे नियम आहेत ते थोडेसे शिथिल करू शकता.

हा पहा कालच्याच उत्तरातील फोटो. ह्यातील घड्याळ हे शो साठी आहे व सध्या चालू पण नाही नीट.


आता प्रत्येक खोली प्रमाणे माझ्या दृष्टीने जे काय नियम वाटतात ते सांगतो.

बसण्याच्या खोलीमध्ये तुम्ही जिथे जास्त बसता तिथून सहज नजर जाईल असे घड्याळ लावावे. समजा तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर त्यांना घड्याळाकडे पाठ करून बसवावे म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर बसलात व तुमची नजर घड्याळाकडे जात असली तर त्यांच्या लक्षात नाही आले पाहिजे/ किंवा मुद्दाम लक्षात दाखवूनही देता येईल🤣
बऱ्याच वेळेला आपल्याला असे वाटते की हे पाहुणे आता कधी जातील? कधी जातील ? असो.

सध्या स्वयंपाक घरे व ड्रॉइंग वगैरे बर्‍याच वेळेला एकत्र असतात त्यामुळे ड्रॉईंग रूम मधले किंवा दुसऱ्या कुठल्यातरी खोली मधले एक तरी घड्याळ स्वयंपाक घरातून जिथे स्वयंपाकाचे काम तिथून सरळ दिसेल असे असावे. किंवा अशा ठिकाणी वेगळे घड्याळ लावावे.

त्याशिवाय समजा तुमच्या घरातील जवळची कोणी व्यक्ती परदेशात असेल व त्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे फोन वगैरे करायचा असेल तर त्यांचा घड्याळाचा टाईम सेट केलेले वेगळे घड्याळ असेल तर चांगले होते म्हणजे दर वेळेला गणित करून त्यांच्याकडे किती वाजलेत असे बघावे लागत नाही.

आमच्याकडे वरचे जे घड्याळ आहे ज्याला दोन बाजूंनी दोन घड्याळे आहेत. आम्ही सुरुवातीला एकावर इंडियन टाईम वर एकावर इंग्लंडचा टाईम असे सेट केले होते त्यावेळी माझी मुलगी इंग्लंडमध्ये शिकायला होती पण हल्ली आता ते बंद पडलेले आहे आणि त्याचा उपयोग फक्त दिसण्यासाठी आहे. फोनवर एक परदेशातील वेळ सेट केलेले घड्याळ आहे तेच वापरतो सध्या.

बेड रूम मध्ये वेगळे घड्याळ नक्कीच असावे व ते शक्यतो पलंगावरून बाजूला मान वळवल्यावर पटकन दिसेल असे असावे. बाजूला का? समोर का नाही? माझ्या मते बाजूने पाहणे सोपे जाते. तसेच असे असले तर आपण पलंगावर कुठल्याही बाजूला डोके करून झोपलो तरी ते दिसू शकेल.

अजून एक मुद्दा सांगतो : भिंतीवरचे घड्याळ म्हटले कि ते मुद्दाम १० -१५ मिनिटे पुढे करून ठेवण्याचेही प्रकार असतात. हे मुले शाळेत जायची असतात किंवा आपल्यला ऑफिस ला जायचे असते त्यावेळी लोक वापरतात. पण मग ह्यात अजून गोंधळ होऊ लागतो. मग ह्यात किती वाजले? खरे किती वाजले? असे अनेक प्रश्न पडतात व आपल्याला माहीतच असते हे घड्याळ पुढे आहे म्हणून. मग त्याचा काय उपयोग.
उत्तर लिहिले · 20/4/2022
कर्म · 121765
0

त्रिकोणी जागेमध्ये काही अडचणी येऊ शकतात, त्या खालीलप्रमाणे:

  • बांधकाम खर्च: त्रिकोणी जागेवर बांधकाम करताना जागेचा आकार अनियमित असल्यामुळे बांधकाम खर्च वाढू शकतो. कारण बांधकाम साहित्याची बर्बादी होण्याची शक्यता असते.
  • जागेचा वापर: त्रिकोणी जागेचा पूर्णपणे वापर करणे कठीण असते. जागेचा काही भाग उपयोगी नसतो, त्यामुळे Space management व्यवस्थित होत नाही.
  • फर्निचरची जुळवाजुळव: त्रिकोणी जागेमध्ये फर्निचर व्यवस्थित लावणे हे एक आव्हान असते. कारण बाजारात सरळ Walls साठी फर्निचर उपलब्ध असते.
  • वास्तुशास्त्र: वास्तुशास्त्रानुसार, त्रिकोणी जागा शुभ मानली जात नाही आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते.
  • पुनरर्विक्री मूल्य: त्रिकोणी भूखंडाचे पुनरर्विक्री मूल्य कमी असू शकते, कारण अनेकजण अशा जागा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.

या अडचणींवर मात करण्यासाठी, आर्किटेक्ट आणि डिझायनर यांच्या मदतीने जागेचा योग्य वापर करणे आणि रचनात्मक उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
3
व्यक्तीची गरज पुर्ण करण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. उपयोगितेच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळवण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते. उपयोगितेची संकल्पना ही स्थल सापेक्षसंकल्पना आहे. म्हणजेच स्थल किंवा ठिकाणानूसार किंवा उपभोगाच्या जागेत बदल केल्यास उपयोगिता बदलते.



मानवी गरज पुर्ण करण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय.

उदाः- वही , पेन

उपयोगितेच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळवण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते.

वैशिष्ट्येः-

१) स्थल सापेक्ष संकल्पनाः-

उपयोगितेची संकल्पना ही स्थल सापेक्षसंकल्पना आहे. म्हणजेच स्थल किंवा ठिकाणानूसार किंवा उपभोगाच्या जागेत बदल केल्यास उपयोगिता बदलते.

उदा.- समुद्रकाठची वाळू - समुद्रकाठची वाळू बांधकामाच्या ठिकाणी वाहून नेल्याने त्यात उपयुक्तता निर्माण होते.

२) काल सापेक्ष संकल्पनाः-

उपयोगितेची संकल्पना ही काल सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजेच वेळ किंवा उपभोगाच्या काळात बदल केल्यास उपयोगिता बदलते.

उदा.- छत्री - छत्रीचा उपयोग हिवाळ्याऐवजी पावसाळ्यात केल्यास त्यात उपयोगिता मिळते.

३) व्यक्ती सापेक्ष संकल्पनाः- ( व्यक्तीनिष्ठ )

उपयोगितेची संकल्पना ही व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजेच व्यक्तीनूसार उपयोगिता बदलते. वस्तुची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते. आवड - निवड, सवयीमुळे उपयोगितेत बदल होतो.

उदा.- पुस्तक - साक्षर व्यक्तीला निरक्षर व्यक्तीपेक्षा पुस्तकात जास्त उपयोगिता मिळते.

४) उपयोगिता व उपयुक्तता भिन्नः-

उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. तर उपयुक्ताता म्हणजे वस्तूचे उपयोगितामूल्य होय.

उदा- सिगारेट - व्यसनी व्यक्तीस सिगारेट मध्ये उपयोगिता

वाटते परंतू ती शरिरास उपयुक्त नसते.

५) उपयोगिता व आनंद भिन्नः-

उपयोगिता व आनंद या दोन भिन्न संकल्पना आहे. कारण ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते. त्यापासून आनंद मिळेलच असे नाही.

उदा- इंजेक्शन - आजारी व्यक्तीस इंजेक्शन मध्ये उपयोगिता

असते परंतू ते घेताना मात्र आनंद होत नाही.

६) उपयोगिता व समाधान भिन्नः- उपयोगिता व समाधान या परस्पर संबंधीत संकल्पना असल्यातरी त्या भिन्न आहेत. उपयोगिता उपभोगाचे कारण तर समाधान उपभोगाचा परिणाम असतो.

उदा- पाणी - तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्यात

उपयोगिता वाटते. तर पाणी पिल्यानंतर त्याला समाधान मिळते.

७) गरजेच्या तिव्रतेवर अवलंबूनः-

उपयोगितेची संकल्पना ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. गरज जेवढी जास्त तेवढी उपयोगिता अधिक असते याउलट गरज जेवढी कमी तेवढी उपयोगिता कमी असते.

उदा- अन्न - भूक लागलेल्या व्यक्तीला अन्नात जास्त उपयोगिता वाटते. तर जेवण केलेल्या व्यक्तीस कमी उपयोगिता मिळते.

८) उपयोगितेचे फक्त तात्विक मापण शक्यः-

उपयोगिता अदृश्य व अमुर्त संकल्पना आहे. तसेच मानवी मनाशी संबंधीत असल्याने मानस -शास्त्रीय संकल्पना असल्याने तिचे संख्यात्मककिंवा आकडेवारीत मापन करता येत नाही.

उदा- भूक लागलेल्या व्यक्तीला अन्नात जास्त उपयोगिता वाटते. पण किती वाटते हे मात्र संख्येत मोजता येत नाही.

९) नैतिकदृष्ट्या तटस्थः-

उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक असा फरक करत नाही.फक्त व्यक्तीची गरज पुर्ण होणे गरजेचे असते.

उदा- सूरी - सूरीचा उपयोग गृहिणीला भाजी कापण्यासाठी

तसेच एखाद्या मारेकऱ्याला खून करण्यासाठी होतो. त्यामुळे दोघांनाही उपयोगिता मिळते.

१०) मागणीचा आधारः-

वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्याक्ती त्या वस्तूसाठी नागणी करेल. म्हणून उपयोगिता हा मागणीचा आधार आहे.

उदा- आजारी व्यक्ती- औषधी आजारी वयक्तीला औषधांमध्ये उपयोगिता जाणवेते म्हणून ती औषधाची मागणी करेल.

उपयोगितेचे प्रकार

१) रुप उपयोगिताः-

वस्तूच्या रुपात / स्वरुपात / आकारात बदल केल्याने वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे रुप उपयोगिता होय.

उदा.- लाकडापासून फर्निचर बनवणे

२) स्थल उपयोगिताः-

जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थळ उपयोगिता....

उदा.- शेतीतील आंबे शहरी भागात नेणे.

३) काल उपयोगिताः-

वस्तूच्या उपभोगाचा काळ बदलल्याने निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता .

उदा.- रक्तपेढीत साठून ठेवलेले रक्त

४) स्वामित्व उपयोगिताः-

वस्तूची मगलकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरीत होते. तेव्हा स्वामित्व उपयोगिता.

उदा.- विक्रेत्याकडुन वस्तू विकत घेणे

५) सेवा उपयोगिताः-

समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात म्हणजे सेवा...

उदा.- डॉक्टर, वकिल, शिक्षक इ. दिलेल्या सेवा

६) ज्ञान उपयोगिताः-

उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो. तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात.

उदा.- मोबाईल, संगणक प्रणालीचे ज्ञान घेणे.

 

एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांतील संबंध

एकूण उपयोगिताः- वस्तूच्या सर्व नगांच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय.

एकूण उपयोगिता सगलपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासुन मिळाली असते.

सुत्रः- TU=∑MU

सीमांत उपयोगिताः- वस्तूच्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरीक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय.

सीमांत उपयोगिता ही वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर असते.

सुत्रः-

 

 

 




वस्तूचे नग

सीमात उपयोगिता

एकूण उपयोगिता


२०

२०


१५

३५


१०

४५



५०



५०


-५

४५

 

 

 

 

 

 

 

 

 

१) पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता सारखीच असते. (ए.उ = सी.उ , २०=२०)

२) एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. सीमांत उपयोगिता घटत जाते.(ए.उ वाढते = सी.उ घटते,५० = -५)

३) एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते. सीमांत उपयोगिता शुन्य असते. (ए.उ सर्वात जास्त = सी.उ शुन्य, ५० = ००)

४) एकूण उपयोगिता घटू लागते.तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. (ए.उ घटते = सी.उ ऋण , ४५ = -०५)

५) एकूण उपयोगिता नेहमी धन असते. तर सीमांत उपयोगिता धन,ऋण व शुन्य असू शकते.

 

घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम

प्रस्तावनाः-

डॉ. आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या “अर्थशास्त्राची मुलतत्वे” Principles of Economics या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरुपात मांडला. सर्वप्रथम प्रा.गॉसेन यांनी मांडला म्हणून त्यास गॉसेनचा पहिला नियम म्हटले जाते.

नियमः-

          “ इतर परिस्थिती स्थिर असताना, ‘मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तुच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान, त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर,क्रमशःघटक जाते.”

तक्त्याद्वारे स्पष्टीकरणः-

“घटत्या सीमांत उपयोगितेचा सिध्दांत पुढील

तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल.


          वरील तक्त्याद्वारे असे स्पष्ट होते की, एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो. तसी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. व शेवटी ऋण होते.






गृहीतके

१) विवेकशीलता :

उपभोक्‍ता विवेकशील आहे.आणि त्‍याची वर्तणूक सर्वसामान्य आहे. असे मानलेजाते. त्‍यामुळ तो महत्‍तम समाधान मिळविण्याचा प्रयत्‍न करतो.

२) संख्यात्‍मक मापन :

सिदधातात उपयोगितेचे संख्यात्‍मक मापन करता येतेअसे गृहीत धरले जाते. त्‍यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्‍य होतात. यामुळे वस्‍तूच्या प्रत्‍येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्‍यांची तुलना करता येते.

३) एकजिनसीपणा :

उपभोगातील वस्‍तूचे सर्व नग आकार, स्‍वरूप, रंग, चव इत्‍यादींबाबत समान आहेत.

४) उपभोग सातत्‍य :

एखाद्या वस्‍तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ एक घेतला जातो.

५) योग्‍य आकारमान :

उपभोग्‍य वस्‍तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्‍य किंवा साधारण असावे. ते अत्‍यंत मोठे किंवा लहान नसावे.

६) स्‍थिरता :

उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्‍त्‍याचे उत्‍पन्न,चव-पसंती, सवयी, आवडी-निवडी यांसारखे घटक स्‍थिर असावेत. पैशाची सीमान्त उपयोगिता सुध्दा स्‍थिर असल्‍याचे गृहीत धरले जाते.

७) विभाज्‍यता : सिद्धान्त असे गृहीत धरतो की, उपभोगात आणलेली वस्तू विभाज्‍य असावी. त्‍यामुळे वस्‍तूचे लहान भागात विभाजन करता येईल.

८) एकच गरज :

एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्‍तूचा वापर होतो. असे गृहित धरले जाते.तरच हा सिध्दांत अनुभवास येतो.

अपवादः-

१) छंदः-

पोस्टाची तिकीटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळचित्रे यांचा संग्रह करणे, वाचण करणे, संगित ऐकणे यांसारख्या छंदाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही म्हणुन हे या नियमाला अपवाद आहेत.

२) कंजूष व्यक्तीः-

कंजूष उपभोक्ता हा लोभी असतो. त्याला प्रत्येक वाढीव नगापासुन अधिक समाधान मिळते. त्यामुळे हा नियम कंजुष व्यक्तींना लागू होत नाही.

३) व्यसनः-

मध्यपी व्यक्तिच्या बाबतीत असे दिसुन येते की, मध्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारीनशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यसन देखिल या नियमाला अपवाद आहे.

४) पैसाः-

पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शुन्य होत नाही. पैशाच्या वाढीव नगापासून सीमांत उपयोगिता वाढत जाते. त्यामुळे पैसा देखिल या नियमाला अपवाद आहे.

५) सत्ताः-

व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. त्यामुळे सीमांत उपयोगिता ही वाढते म्हणुन सत्ता हि नियमाला अपवाद ठरते.

       वरील प्रमाणे काही अपवाद या नियमाला सागितले जातात परंतू त्यामध्ये काहि गृहितांचे उल्लघन होते त्यामुळे ते अपवाद नसुन फक्त भासमान असतात.

महत्वः-

१) उपभोक्‍त्यांसाठी उपयुक्‍त :

मर्यादित साधनांमुळे महत्‍तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्‍तूंच्या उपभोगामध्ये वैविध्य असणेआवश्यक आहे.

२) सरकारसाठी उपयुक्‍त :

शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धान्त उपयुक्‍त ठरतो. उदा. प्रगतशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण इत्‍यादी.

३) मूल्‍य विरोधाभास :

 वस्‍तूचे उपयोगिता मूल्‍य व विनिमय मूल्‍य यातील फरक दाखवून हा सिद्धान्त मूल्‍याचा विरोधाभास स्‍पष्‍ट करतो. ज्‍यामध्ये उपयोगिता मूल्‍य जास्‍त उदा. पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्‍यादी. घटकाचे विनिमयमूल्‍य कमी असते तसेच काही वस्‍तूंचे उपयोगिता मूल्‍य कमी असते, पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्‍य जास्‍त असते. उदा. हिरे, सोने. हा सिदधान्त वस्‍तूंचे उपयोगिता मूल्‍य व विनिमय मूल्‍य ह्यांतील विरोधाभास समजण्यासाठी साहाय्य करतो.

४) मागणी सिध्दांताचा आधार : मागणीचा सिदधान्त घटत्‍या

सिमांत उपयोगितेच्या सिद्धातावर आधारित आहे. मागणी सिदधातानुसार वस्‍तूची किंमत कमी झाल्‍यास वस्‍तूची मागणी वाढतेआणि किंमत जास्‍त झाल्‍यास मागणी कमी होते. जेव्हा वस्‍तूंच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्‍त्याकडून केली जाते तेव्हा सीमान्त उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्‍हणून फक्‍त कमी किमतीला वस्‍तूची जास्‍त नगसंख्या खरेदी केली जाते.

टिकाः-

१) अवास्‍तव गृहीतके :

घटत्‍या सीमान्त उपयोगितेचा सिद्धान्त एकजिनसीपणा, सातत्‍य, स्‍थिरता, विवेकशीलता इत्‍यादी विविध गृहीतकांवर आधारित आहे. परंतु प्रत्‍यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत.

२) संख्यात्‍मक मापन :

उपयोगिता संख्येत मोजता येते. तिची बेरीज व तुलना करता येतेआणि कोष्‍टकाद्वारे सादर करता येते. पण प्रत्‍यक्षात उपयोगितेचे संख्यात्‍मक मापन करणेअशक्‍य असते. कारण उपयोगिता ही मानसशास्‍त्रीय संकल्‍पना आहे.

३) अविभाज्‍य वस्‍तू :

हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच यांसारख्या अविभाज्‍य व अवजड वस्‍तूंसाठी लागू पडत नाही. कारण, साधारणपणेया वस्‍तूंची खरेदी एका वेळी एकाच वस्‍तूची केली जाते. अशा वस्‍तूच्या सीमान्त उपयोगितेची तुलना अशक्‍य असते.

४) पैशाची स्थिर सीमान्त उपयोगिता :

सिदधान्त गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्‍येक एककाची सीमान्त उपयोगिता स्‍थिर असतेपण टीकाकारांच्या मतेपैशाची सीमान्त उपयोगिता व्यक्‍तिपरत्‍वे बदलते. तसेच किमतींतील बदल, पैशाचा साठा यांमुळे प्रभावित होते.

५) एकच गरज :

हा सिद्धान्त विशिष्‍ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्‍तविक व्यक्‍ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळविते.

 


उत्तर लिहिले · 25/3/2022
कर्म · 121765
0

एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दुप्पट विक्रीची किंमत आहे, याचा अर्थ:

  • खरेदी किंमत (ख.कि.) = x
  • विक्री किंमत (वि.कि.) = 2x

शेकडा नफा काढण्यासाठी, आपण खालील सूत्र वापरू शकतो:

शेकडा नफा = ((विक्री किंमत - खरेदी किंमत) / खरेदी किंमत) * 100

या गणितानुसार:

शेकडा नफा = ((2x - x) / x) * 100 = (x / x) * 100 = 1 * 100 = 100%

म्हणून, शेकडा नफा 100% आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980