2 उत्तरे
2
answers
कोकणातून आला भट, त्याला धरणी आपट' या म्हणीचा अर्थ काय होतो?
2
Answer link
कोकणातला भट = नारळ,
"कोकणातून आला भट, त्याला धर नी आपट" याला म्हणी ऐवजी कोडे किंवा उखाणा म्हणाल्यास योग्य राहील.
हिंदीत याला पहेली म्हणतात.
यात ते कोडे ओळखण्यास मदत करणाऱ्या काही नकळत अप्रत्यक्ष सूचना इशारा क्लू Clue रहस्यमय भाषेत देतात. त्यावरुन आपण ओळखून उत्तर द्यायचे असते. गाण्याच्या व गावाच्या नावाच्या भेंड्या खेळण्या सारखाच उखाणे व कोडी घालणे हा करमणुकीचा प्रकार आहे.
"कोकणातून आला भट, त्याला धर नी आपट" या मध्ये कोकण हा एक व त्याला धरून आपट असा दुसरा क्लू आहे. त्यावरून हे भट म्हणजे नारळ वाटते. कारण हे नारळ कोकणातून येतात. बहुतेक वेळेस त्याला दगड अथवा जमिनीवर शेंडी धरून आपटून देवापुढे फोडतात.
कोकणातून आला, भट शेंडी धरून आपट असा पाठभेद आहे.
0
Answer link
'कोकणातून आला भट, त्याला धरणी आपट' या म्हणीचा अर्थ:
अर्थ: कोकणातील ब्राह्मण (भट) गरीब परिस्थितीतून आलेले असतात. जेव्हा ते समृद्ध होतात, तेव्हा ते जमिनीवर पाय रोवून न वागता गर्वाने वागतात.