शारीरिक समस्या आरोग्य

काल रात्री झोपलो असता थोड्यावेळाने मला दचकून जाग आली, तेव्हा मला माझे दोन्ही हात पूर्णपणे सुन्न झालेले जाणवले. डावा हात तर पूर्णपणे सुन्न झालेला, पण उजवा हात थोडासा झाला होता. जेव्हा मी उठून बसलो, तेव्हा उजव्या हाताने डावा हात माझ्या समोर ठेवला आणि थोड्या वेळाने माझे दोन्ही हात सामान्य झाले. हे कशामुळे झाले?

3 उत्तरे
3 answers

काल रात्री झोपलो असता थोड्यावेळाने मला दचकून जाग आली, तेव्हा मला माझे दोन्ही हात पूर्णपणे सुन्न झालेले जाणवले. डावा हात तर पूर्णपणे सुन्न झालेला, पण उजवा हात थोडासा झाला होता. जेव्हा मी उठून बसलो, तेव्हा उजव्या हाताने डावा हात माझ्या समोर ठेवला आणि थोड्या वेळाने माझे दोन्ही हात सामान्य झाले. हे कशामुळे झाले?

3
रात्री झोपेत असताना अचानक एका बाजूचे हात-पाय सुन्न होतात. खूप वेळ एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने हात-पाय सुन्न होतात. शरीरावर दबाव पडल्याने अशा समस्या उद्भवतात. सतत शीत पेय, मद्याचे अधीक सेवन केल्याने हात-पाय सुन्न हेतात









आजच्या धका-धकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करतो. सततच्या कामाच्या व्यापाने आणि वेळेत पुरक आहार न घेतल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. व्यस्त जीवन शैलीमुळे जेवणाच्या वेळा देखील अगदी रोज चुकतात. आपण लक्षात घ्यायला हवं ही साधी गोष्ट नाही, याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर नकळत होत असतात. त्यापैकी एक म्हणजे, हात-पाय सुन्न होणे. रात्री झोपेत असताना अचानक एका बाजूचे हात-पाय सुन्न होतात. खूप वेळ एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने हात-पाय सुन्न होतात. शरीरावर दबाव पडल्याने अशा समस्या उद्भवतात. सतत शीत पेय, मद्याचे अधीक सेवन केल्याने हात-पाय सुन्न हेतात. याशिवाय मधुमेह, थकवा, व्हिटॅमीन बी, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्वे कमी असल्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते. हात-पायाचे सतत सुन्न हेणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. वेळेतच प्रसंगवधान बाळगले तर ही समस्या कायमची दूर केली जाऊ शकते.



हात-पाय सुन्न होत असल्यास घरगुती उपाय
शरीरातील रक्त प्रवाहात अडथळे निर्माण हेत असल्यास हात-पाय सुन्न होतात. त्याप्रमाणे शरीरातील एक नस दबल्याने सुद्धा ही समस्या उद्भवते. तर काही घरगुती उपायांमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होवू शकते. 


- शिवण काम केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत.


- ऑलिव्ह, नारळ आणि ,सरसोच्या तेलाने मालीश केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत. या तेलांनी मालीश केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. 


- सुन्न झालेल्या भागावर गरम पाण्याचे शेक घेतल्याने रक्तात असलेली कमतरता भरून काढण्यास मदत होते. हा रामबाण उपाय सुन्न झालेल्या भागांमधील मांसपेशी आणि नसांना आराम देतो. 



- एक स्वच्छ कापड गरम पाण्यात भिजवून प्रभावित भागात पाच ते दहा मिनिटे लावल्यास हात पाय सुन्न होत नाहीत.


- नियमित फक्त १५ मिनिटे व्ययाम केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत. व्यायाम केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत राहतो. 


- आठवड्यातून तीस मिनिटे अॅरोबिक्स, सायकलींग, धावल्याने, पोहोल्याने हात पाय सुन्न होत नाहीत. 
   
- हळदीमध्ये अॅन्टी इन्फ्लेमेंटरी सारखे तत्वे असतात प्रभावित भागाचे दुखणे काही प्रमाणात कमी होऊ शकतो. 




- एक ग्लास दुधामध्ये एक चमच हळद मंद आचेवर घ्या आणि एक चमच मध एकत्रित करून प्यायल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो. 


- दालचीनीमध्ये व्हिटॅमीन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम महत्वपूर्ण घटक असतात. नियमीत रोजच्या आहारात ४ ग्रॅम दालचीनीचा समावेश करावा. 





 


 




उत्तर लिहिले · 6/4/2022
कर्म · 121765
0

माणसाने वेगाला आवरावे - प्रयोग ओळखा.

उत्तर लिहिले · 6/4/2022
कर्म · 0
0

तुमच्या लक्षणांवरून असे दिसते की तुम्हाला रात्री झोपेत असताना हातांना मुंग्या येणे किंवा हात सुन्न होण्याची समस्या येत आहे. या समस्येची काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. रक्तपुरवठा कमी होणे: झोपेत असताना तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्यास, तुमच्या हातांवरील रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो. यामुळे हातांना रक्तपुरवठा कमी होतो आणि ते सुन्न होऊ शकतात.
  2. नसांवर दाब येणे: तुमच्या मनगटातून (Carpal Tunnel Syndrome) किंवा कोपऱ्यातून (Cubital Tunnel Syndrome) जाणाऱ्या नसांवर दाब आल्यास, तुमच्या हातांना मुंग्या येऊ शकतात किंवा ते सुन्न होऊ शकतात.
  3. चुकीच्या पद्धतीने झोपणे: अनेकवेळा झोपताना हात डोक्याखाली किंवा शरीराखाली आल्याने नसांवर दाब येतो आणि हातांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हात सुन्न होऊ शकतात.
  4. मानेच्या मणक्यांची समस्या (Cervical Spondylosis): मानेच्या मणक्यांमध्ये काही समस्या असल्यास, त्याचा दाब नसांवर येऊ शकतो आणि हातांना मुंग्या येऊ शकतात.
  5. मधुमेह (Diabetes): मधुमेहामुळे नसांना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात.
  6. व्हिटॅमिनची कमतरता: व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे देखील नसांना त्रास होऊ शकतो आणि हात सुन्न होऊ शकतात.

उपाय:

  • झोपताना योग्य स्थितीत झोपण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे हातांवर दाब येणार नाही.
  • मनगट आणि कोपऱ्याच्या नसांवर दाब येऊ नये म्हणून मनगट सरळ ठेवणारे Splint वापरा.
  • नियमित व्यायाम करा आणि आपल्या शरीराची हालचाल ठेवा.

जर तुम्हाला ही समस्या वारंवार येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला योग्य निदान आणि उपचार देऊ शकतील.

अस्वीकरण: या उत्तराचा उद्देश फक्त माहिती देणे आहे. कृपया वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?
शरीराची थरथर का होते?
महाराष्ट्रामध्ये फ्री उपचार कोठे होतात?
मेंदूची सूज कमी होऊ शकते का?
माझ्या मुलाचे 6 वर्षांपासून कान वाहत आहे, खूप दवाखान्यात इलाज केला पण काही फरक नाही?
सुखदाई आरोग्यचे महत्वाचे पैलु संगा?