वनस्पतीशास्त्र आयुर्वेद आरोग्य

अडुळशाचे औषधी उपयोग कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

अडुळशाचे औषधी उपयोग कोणते आहेत?

2




.

.


अडुळसा
अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती
अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पंढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.

औषधी गुणधर्म:
अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.

विविध रोगांवर उपचार:
क्षय रोग:
आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे.

एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.

खोकला:
अडूळसाची सात पाने पाण्यामध्ये उकळवावी, ती गाळून घेतल्या नंतर त्यात २४ ग्राम मध मिसळावे. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच अडुळसा ची फुले टाकून तयार केलेली मिठाई दर वेळी 12 ग्राम या प्रमाणे सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास खोकला थांबतो. ६० ग्राम फुले १८० ग्राम गुळाच्या पाकात मिसळून ही मिठाई तयार करावी.

पोटातील जंत:
पाने, खोड आणि मुडाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी 1 चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा.

जुलाब आणि आव:
जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस 2 ते 4 ग्राम घ्यावा.

त्वचारोग:
ताज्या जखमा, संद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पानाचे पोटीस लावले. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.

वापरण्याची पद्धत आणि प्रमाण:
पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेडी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण 2 ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.



उत्तर लिहिले · 31/3/2022
कर्म · 121765
0

अडुळशाचे अनेक औषधी उपयोग आहेत. ते खालीलप्रमाणे:

  1. सर्दी आणि खोकला: अडुळशाचा काढा सर्दी आणि खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

    उपयोग: अडुळशाच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास आराम मिळतो.

  2. दमा (Asthma): अडुळशाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म श्वसनमार्गातील अडथळे दूर करतात.

    उपयोग: अडुळशाच्या पानांचा रस नियमितपणे घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.

  3. क्षयरोग (Tuberculosis): अडुळशाच्या सेवनाने छातीतील कफ कमी होतो आणि श्वसनक्रिया सुधारते.

    उपयोग: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अडुळशाचा वापर क्षयरोगाच्या उपचारांमध्ये मदत करू शकतो.

  4. रक्तपित्ती (Bleeding disorders): अडुळशाच्या पानांचा रस रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उपयुक्त आहे.

    उपयोग: नाकातून रक्त येत असल्यास अडुळशाच्या पानांचा रस नाकात टाकावा.

  5. त्वचा रोग: अडुळशाच्या पानांचा लेप त्वचेच्या रोगांवर गुणकारी आहे.

    उपयोग: खाज, पुरळ यांसारख्या समस्यांवर अडुळशाच्या पानांचा लेप लावल्यास फायदा होतो.

  6. जखम: अडुळशाच्या पानांमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म जखम लवकर भरून काढण्यास मदत करतात.

    उपयोग: अडुळशाच्या पानांचा रस जखमेवर लावल्यास ती लवकर बरी होते.

इतर उपयोग:

  • अडुळशाचा उपयोग ताप कमी करण्यासाठी देखील होतो.
  • पोटदुखी आणि अपचनाच्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी अडुळशाचा काढा गुणकारी आहे.

टीप: औषधी उपचारांसाठी अडुळशाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

संदर्भ:
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
तुमच्या परिसरातील कोणत्याही १० झाडांचा अभ्यास करून त्या झाडांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी जसे की फुले, फळे येण्याच्या कालावधीत होणाऱ्या बदलाची माहिती कशी लिहाल?
वृक्षवेलींनाही प्राण्यांप्रमाणे भावना असतात हे कोणी शोधले?
वृक्षवेलींनाही प्राण्यांप्रमाणे भावना असतात हे सर्वप्रथम कोणी दाखवून दिले?
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या भागांवर येणारी वनस्पती कोणती?
पानाकडून अन्नाचे इतर भागांकडे वहन कसे होते?
अळशी म्हणजेच जवस का?