अध्यात्म प्रथा व परंपरा धर्म

होळी दहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य आहे की अयोग्य?

2 उत्तरे
2 answers

होळी दहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य आहे की अयोग्य?

3
होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?
होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याची किंवा धावण्याची प्रथा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत आहे. या वर्षी कर्नाटकमधील तुमकूर गावात होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालत असतांना तीन जणांचा भाजल्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर या प्रथेवर बंदी आणण्यासाठी कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तरतूद करणार असल्याची घोषणा तेथील एका मंत्र्यांनी केली आहे. याविषयीचा सनातन दृष्टीकोन पुढे दिला आहे.

१. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेचा धर्मशास्त्रात कुठेही उल्लेख नाही. असे असले, तरी हिंदु धर्म हा स्वतःची उपासनापद्धत निर्माण करण्याचे आणि त्याद्वारे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. यानुसार तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेल्यांनी तेजतत्त्वाची उपासना म्हणून प्रज्वलित निखार्यांवरून चालत गेल्यास त्यांना त्याचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर पहुडण्याविषयी कुठेही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. असे असले, तरी तंजावूर (तमिळनाडू) येथील अग्नीयोगी प.पू. रामभाऊस्वामी तेजतत्त्वाची उपासना म्हणून यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर १०-१५ मिनिटे पहूडतात. त्या वेळी यज्ञाग्नीमुळे त्यांचे शरीर जळत नाही, हे अनेकांनी पाहिले आहे.

२. साधना न करणार्या सर्वसामान्य व्यक्तींनी मात्र साहसी कृत्य म्हणून होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालू नये. उदाहरणार्थ तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेली व्यक्ती सूर्याकडे पाहून त्राटक लावू शकते; मात्र सामान्य व्यक्ती क्षणभरही सूर्याकडे पाहू शकत नाही; कारण सूर्याचे तेज धारण करण्याची क्षमता तिच्यात नसते.

३. एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

४. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या २००९ या वर्षीच्या अहवालानुसार व्यक्तीच्या शरिरातील अवयव जाळणार्या सिगारेटमुळे भारतात प्रतिवर्षी ९ लक्ष म्हणजेच प्रतिदिन २४६६ व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. तरीही सिगारेटवर बंदी आणण्यासाठी काहीही न करणारे मंत्रीमहोदय केवळ ३ व्यक्तींचा मृत्यू झाला; म्हणून निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालण्याचा विचार करतात, हे आश्चर्यकारक, तसेच धर्मद्रोहीही आहे.

५. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालत असतांना तीन युवकांच्या कपड्यांना आग लागून त्यांचा मृत्यू होणे, हा केवळ अपघात आहे. प्रतिदिन रस्त्यांवर शेकडो अपघात घडत असतात; म्हणून शासन काही रस्त्यांवरून वाहन चालवण्यास बंदी घालणारा कायदा करत नाही; मग या अपघातासाठी थेट कायदा करण्याची भाषा करणे, हे हास्यास्पद ठरते.

६. गेल्या वर्षी हज यात्रेला चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ७०० हून अधिक मुसलमानांपैकी १०० हून अधिक मुसलमान भारतीय होते; मग शासन हज यात्रेला जाण्यास बंदी घालेल का ?

७. हिंदूंनी धर्मशिक्षित होण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच साधना न करणार्या सर्वसामान्य व्यक्तींनी अशा प्रकारच्या कृती करू नयेत, यासाठी प्रबोधन करणे, हेच या घटनेवरील खरे उपाय आहेत. शासनाने हे लक्षात घेऊन त्यानुसार कार्य केले पाहिजे.


उत्तर लिहिले · 17/3/2022
कर्म · 121765
0

होळी दहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालणे योग्य आहे की अयोग्य, हे काही गोष्टींवर अवलंबून असते:

  • धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व: काही समुदायांमध्ये, होळीच्या निखार्‍यांवरून चालणे हा एक धार्मिक विधी मानला जातो. हे धैर्य आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
  • आरोग्य आणि सुरक्षा: निखार्‍यांवरून चालणे धोकादायक असू शकते. त्वचेला भाजण्याची शक्यता असते. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी हे विशेषतः धोकादायक असू शकते.
  • वैयक्तिक श्रद्धा: काही लोक या परंपरेवर विश्वास ठेवतात आणि कोणतीही इजा न होता निखार्‍यांवरून चालू शकतात, तर काहीजण याला अंधश्रद्धा मानतात.

सुरक्षिततेसाठी उपाय: जर तुम्ही निखार्‍यांवरून चालण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • निखारे पूर्णपणे जळलेले आणि लालसर रंगाचे असावेत.
  • चालताना वेग जास्त नसावा.
  • पायाला protection देण्यासाठी जाडसर कपड्याचा वापर करावा.
  • जखमेवर उपचार करण्यासाठी nearby वैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी.

अंतिम निर्णय: निखार्‍यांवरून चालावे की नाही, हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. परंपरेचे महत्त्व, सुरक्षा आणि तुमच्या श्रद्धेचा विचार करून तुम्ही निर्णय घेऊ शकता.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?