सरकारी योजना मुख्यमंत्री अर्थ

मुख्यमंत्री सहायता निधी कोणत्या वैद्यकीय कारणासाठी व कसा मिळतो?

2 उत्तरे
2 answers

मुख्यमंत्री सहायता निधी कोणत्या वैद्यकीय कारणासाठी व कसा मिळतो?

4
हृदयरोग,
कर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार
रेडीओथेरपी कर्करोग
न्युरोलोजी
मूत्र रोग शस्त्रक्रिया अश्या विविध कारणासाठी  मुख्यमंत्री सहायता निधी दिला जातो. ज्या वैद्यकीय सुविधेमध्ये  महात्मा फुले जनयोजना आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत लाभ भेटत नाही त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध होतो. 
रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य म्हणून खालीलप्रमाणे देण्यात यावे.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : सीआरएफ-२००१/प्रक्र १९७/२००१/२५, दिनांक १५.११. २००१ मधील उद्दिष्ट क्रमांक ४ नुसार राज्यातील गरजू व गरीब रूग्णांवरील शस्त्रक्रिया / उपचारासाठी निधीतून अंशत: अर्थसहाय्य रुग्णालयाचे नांवे प्रदान केले जाते.
१. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च १.००लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)
१.१. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.
२. महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रंमाक
३. तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असलेबाबत)
४. नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक
५. मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र
६. रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल:
६.१. बँक खाते क्रमांक
६.२. रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा
६.३. रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव
६.३. आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर
६.५. रुग्णालयाचा ई-मेल
७. सदर मदत हि प्रत्येक रुग्णास ३ वर्षातून एकदा देण्यात येईल.
८. उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते -
अंदाजित खर्च
अर्थसहाय्य
रु.२०,०००/- पर्यंत
रु.१०,०००/-
रु.२०,००१/- ते रु.४९,९९९/- पर्यंत
रु.१५,०००/-
रु.५०,०००/- ते रु.९९,९९९/- पर्यंत
रु.२०,०००/-
रु.१,००,०००/- ते रु.२,९९,९९९/- पर्यंत
रु.३०,०००/-
रु.३,००,०००/- ते रु.४,९९,९९९/- पर्यंत
रु.४०,०००/-
रु.५,००,०००/- व त्यापेक्षा जास्त
रु.५०,०००/-

स्त्रोत : मुख्यमंत्री सहायता निधी, महाराष्ट्र शासन
उत्तर लिहिले · 14/3/2022
कर्म · 11785
0

मुख्यमंत्री सहायता निधी (Chief Minister's Relief Fund) हा एक सरकारी निधी आहे जो अनेक प्रकारच्या वैद्यकीय खर्चांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतो. खालील काही प्रमुख वैद्यकीय कारणे आहेत ज्यांसाठी या निधीतून मदत मिळू शकते:

  • गंभीर आजार: कॅन्सर, हृदयविकार, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, आणि इतर जीवघेणे आजार.
  • शस्त्रक्रिया: मोठ्या शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण (organ transplant).
  • अपघात: गंभीर अपघात झाल्यास आणि उपचारांसाठी पैशांची गरज असल्यास.
  • नैसर्गिक आपत्ती: नैसर्गिक आपत्तींमुळे (पूर, भूकंप, इ.) बाधित झालेल्या लोकांच्या वैद्यकीय उपचारांसाठी.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज कसा करावा:

  1. अर्ज प्रक्रिया:
    • तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल.
    • अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो.
  2. आवश्यक कागदपत्रे:
    • वैद्यकीय अहवाल (Medical reports) आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र.
    • उत्पन्नाचा दाखला (Income certificate).
    • आधार कार्ड आणि इतर ओळखीचे पुरावे.
    • उपचार खर्चाचा अंदाज (Cost estimate of treatment).
  3. अर्ज कोठे करावा:
    • ऑफलाइन: जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुख्यमंत्री कार्यालय.
    • ऑनलाइन: मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध असते.

अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. महाराष्ट्र शासन
  • जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधा.

टीप: अर्ज करण्यापूर्वी, योजनेच्या अटी व शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासून घ्या.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

स्वच्छ भारत योजना व आयुष्यमान भारत योजना ची उद्दिष्टे आणि फायदे स्पष्ट करा?
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये व कार्यपद्धती स्पष्ट करा?
रोजगार हमी योजनेच्या निर्मितीमागील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करा?
जि प मध्ये ओबीसी साठी काय योजना आहेत?
ग्रीन कॉरिडोर उपक्रमाबद्दल माहिती हवी आहे?
Swayam scholarship yojna form documents?
अंगणवाडी सेविका पद भरती किती किलोमीटर अंतर असावा?