पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही. अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय पूर्ववत होऊ दे. अशा स्थितीत कधी कधी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा शक्य होत नाही किंवा डॉक्टर कधी कधी उपलब्ध नसतात. अशी वेळ आल्यास काय करावे? तर तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता. आज आम्ही या विशेष लेखातून तुम्हाला पायाची सूज कमी करू शकतील असे काही लाभदायक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करून पायाच्या सुजेपासून आराम मिळवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार!
जाडे मीठ
जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्नीशियम सल्फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा सहज उपलब्ध होणारा एक लाभदायी पदार्थ आहे. बेकिंग सोडामध्ये अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. तांदळाच्या पाण्यासोबत मिसळून हा बेकिंग सोडा पायात जमा असलेले अतिरिक्त पाणी शोषून घेतो आणि यामुळे पायातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. दोन चमचा तांदूळ पाण्यात उकडावे. आता या पाण्यात दोन चमचा बेकिंग सोडा टाकून याची पेस्ट बनवा आणि पायांवर याचा लेप १५ मिनिटे लावा. या उपायामुळे तुम्झाला त्वरित परिणाम जाणवू लागेल आणि पायाची सूज लवकर कमी होईल.
इसेन्शियल ऑईल
हे इसेन्शियल ऑईल पायातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी खूप गुणकारी असते. इसेन्शियल ऑईल पाण्यात टाकून मिक्स करावे. तुम्ही हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी यात अर्धा कप जाडे मीठ सुद्धा टाकू शकता. आता या पाण्यात १५ मिनिटांसाठी आपले पाय टाकून ठेवा. तुम्हाला यूकेलिप्टस, पेपरमिंट, लेमन इसेन्शियल ऑईलचे ३ ते ४ थेंब आणि अर्धी बादली गरम पाणी घ्यायचे आहे. हे मिश्रण तुमच्या पायाच्या वेदनेवर परिणाम करून पायाची सूज लवकर कमी करते.
लिंबाचाही करता येतो वापर
लिंबामध्ये सूज रोखणारे गुणधर्म असतात आणि दालचिनीचे तेल सुद्धा सूज कमी करण्यात मदत करते. अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक चमचा लिंबूचा रस, एक चमचा दुध मिसळून त्याची पेस्ट बनवा. हि पेस्ट काही वेळ पायावर लावून काही तास तशीच राहू द्या. तुम्ही रात्री झोपताना हि पेस्ट लावून सकाळपर्यंत तशीच ठेवू शकता. या सर्व पदार्थांतील गुणधर्म जलद गतीने पायाची सूज कमी करण्याचे काम करतील.
दालचिनी
अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक चमचा लिंबूचा रस, एक चमचा दुध मिसळून त्याची पेस्ट बनवा. हि पेस्ट काही वेळ पायावर लावून काही तास तशीच राहू द्या. तुम्ही रात्री झोपताना हि पेस्ट लावून सकाळपर्यंत तशीच ठेवू शकता. या सर्व पदार्थांतील गुणधर्म जलद गतीने पायाची सूज कमी करण्याचे काम करतील.
बर्फाचा शेक
हा उपाय तुम्हाला सर्वांना माहित असेलच आणि कोणत्याही अवयवावर सूज आली किंवा अवयव दुखू लागला, वेदना होऊ लागल्या तर हा सगळ्यात सोप्पा पर्याय आपण वापरून पाहतोच. तर जेव्हा पायाला सूज येते तेव्हा एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा. बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते. तर , डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून हे उपाय वापरून पहा, जर या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र तुम्ही शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.