व्यवसाय व्यवसाय मार्गदर्शन शेती कृषी व्यक्ती विशेष

'शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे' असे कोणी म्हटले आहे?

2 उत्तरे
2 answers

'शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे' असे कोणी म्हटले आहे?

1
सत्काराला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, “गांधीजींनी सुचवलेले अहिंसेचे तत्वच शेतीसाठी उपयुक्त आहे. शेती हा व्यवसाय नसून तो धर्म आहे.” जपानी कृषी तज्ज्ञ फुकुओका यांच्या Do Nothing सूत्राची त्यांनी आठवण करून दिली तसेच सेंद्रिय शेती म्हणजे निसर्ग नियमांना धक्का न लावता करायची शेती, अशी सोपी व्याख्या त्यांनी सांगितली.




शेती हा व्यवसाय नाही, धर्म आहे!

“शेती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती रासायनिक करू नये. निसर्ग नियमांना जराही धक्का लावू नका. त्यांच्याप्रती आदर आणि विश्वास बाळगा,” अशी भावना ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि नैसर्गिक शेतीपद्धतीतील गांधी म्हणून परिचित असणाऱ्या भास्करराव सावे यांनी आज व्यक्त केली.
८८वर्षीय ऋषीतुल्य कृषीयुवकाचे उद्गार
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

देशभरातील साखर कारखानदारांना मोठा दिलासा; केंद्राने घेतला नवा निर्णय
“शेती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती रासायनिक करू नये. निसर्ग नियमांना जराही धक्का लावू नका. त्यांच्याप्रती आदर आणि विश्वास बाळगा,” अशी भावना ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि नैसर्गिक शेतीपद्धतीतील गांधी म्हणून परिचित असणाऱ्या भास्करराव सावे यांनी आज व्यक्त केली.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र अध्ययन केंद्र आणि साप्ताहिक विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. महाराष्ट्रातील कॄषी विषयक समस्यांना सेंद्रिय शाश्वत शेती विकासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
“पूर्णं पूर्णमिदं पूर्णात्‌ पूर्णम्‌”हे निसर्गाचे सूत्र आहे. माती, जल, वायु, वनस्पती, पशु-पक्षी आणि जीव ही सृष्टीची सहा परिमळे आहेत. सूर्यप्रकाश आणि परिमळे यांचा प्रभावी वापर करून आपण शेती केली पाहिजे, अशी शेतीची अध्यात्माशी सांगड त्यांनी घातली.  संस्थेतर्फे  जीवन गौरव पुरस्कार २०१० करिता भास्करराव सावे यांची निवड करण्यात आली आहे. हे निमित्त साधून त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, “गांधीजींनी सुचवलेले अहिंसेचे तत्वच शेतीसाठी उपयुक्त आहे. शेती हा व्यवसाय नसून तो धर्म आहे.” जपानी कृषी तज्ज्ञ फुकुओका यांच्या  सूत्राची त्यांनी आठवण करून दिली तसेच सेंद्रिय शेती म्हणजे निसर्ग नियमांना धक्का न लावता करायची शेती, अशी सोपी व्याख्या त्यांनी सांगितली.
भास्कररावांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना ओआरेफ मुंबईचे अध्यक्ष श्री. सुधींद्र कुलकर्णी यांनी केंद्र आणि राज्य शासनाने अशा प्रयोगांची दखल आपल्या कृषी धोरणात घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक श्री. दिलीप करंबेळकर यांनी शाश्वत सेंद्रिय शेती म्हणजे काय हे स्पष्ट करत या परिसंवादातून सेंद्रिय शेतीच्या उत्क्रांत पद्धतींची चर्चा व्हावी आणि या पद्‌धतींकडे पहाण्याचे वैज्ञानिक निकष तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, अर्थकारणाभोवती फिरणारी शेती, पशुधन-मृदा-जलसंधारण आदिंची गरज आणि शाश्वत शेतीचे निकष या विषयांवर परिसंवादात चर्चा करण्यात आली. सदर परिषदेस कृषी तज्ज्ञ, मृदा तज्ज्ञ, पशुतज्ज्ञ, प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अभ्यासक उपस्थित होते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी उत्पादनांच्या वाढत्या किंमती आणि शेतीतील अशाश्वतता या कृषी समस्यांवर उपाय ठरू शकणाऱ्या राज्यभरातील सेंद्रिय शेती प्रकल्पांची माहिती देणारी संशोधन पुस्तिका आयोजकांतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे.


उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121765
0

'शेती हा व्यवसाय नसून प्रवृत्ती आहे' असे विधान कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. ते महाराष्ट्रातील एक मोठे कृषी नेते होते.

भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काम केले आणि त्यांचे विचार आजही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1700

Related Questions

राष्ट्रसंतांनी कोणकोणत्या अभयारण्यात तपोसाधना केली?
ओएनजीसी (ONGC) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
इंग्रजांना सोन्याची व आम्हाला स्वातंत्र्याची सावट आहे हे उद्गार कोणी काढले?
इंग्रजांना सोन्याची व आम्हाला स्वातंत्र्याची चटक आहे हे उद्गार कोणी काढले?
देशातील पहिल्या महिला पर्यटक नेव्ही कॅप्टन राधिका मेनन?
विनोबाजींनी कोणते व्रत घेतले होते?
महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला तीन वेळा भेट दिली?