पर्यावरण परिसंस्था

परिसंस्थेचे अजैविक व जैविक घटक स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

परिसंस्थेचे अजैविक व जैविक घटक स्पष्ट करा?

1






 . जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक मिळून, त्यांच्या आंतरक्रियेतून अशी परिसंस्था बनत असते. यालाच पर्यावरणीय जीवशास्त्र असेही संबोधतात. हे विषय आपण अभ्यासक्रमात शिकतो खरे, परंतु ते आकलन करून घेत नाही. त्यामुळे आपण मोठे झालो की त्याच पर्यावरण-परिसंस्थांचा नाश करू लागतो. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. आपण तो शासकीय आणि खासगी पातळीवर उत्साहाने साजरा करतो. निसर्गाची; जैविक आणि अजैविक संसाधनांची नासधूस मोठ्या प्रमाणावर आजही चालूच आहे, त्याचे काय?

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते. आपल्याला पोषक असे पर्यावरण तयार होते. मनुष्य पाषाणयुगात निसर्गाचे नियम पाळत होता. तेव्हा निसर्ग आणि पर्यावरण सुरक्षित होते. आज स्थिती अगदी विरोधाभासी झाली आहे. मानव सुशिक्षित झाला, बुद्धिवान झाला, परंतु केवळ मनुष्य जातीच्या स्वार्थाचा विचार केला. परिणामी जंगल, वन्यजीव कमी झाले. लाखो वर्षांपासून बनलेले पर्यावरण, हवामानात बदल झाला. नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली. हे असेच सुरू राहिले तर सजीवच काय मानवालाही पृथ्वीवर राहणे कठीण होईल.

  अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव हे विविध परिसंस्थांत जगत असतात. अजैविक आणि जैविक घटक, त्याची आंतर्क्रिया आणि एकमेकावरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र, नद्या, जंगल, जलाशये, वाळवंट, गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश इत्यादी परिसंस्था आहेत. अजैविक भूभागात ज्या विविध सजीव प्रजाती एकमेकांना सहकार्य आणि समायोजन करून राहतात, तिथे जैवविविधता वाढते. एक अन्नसाखळी तयार होते. प्रत्येक सजीवाला त्यांचे अन्न मिळते. तिथे एक व्यवस्था (परिसंस्था) तयार होते. ती एकमेकांवर अवलंबून असते. जसे तळे आहे तिथे सूक्ष्म जीव, कीटक, जल वनस्पती, बेडूक, मासे, पक्षी, साप राहतील. तिथे जलीय परिसंस्था तयार होईल. परंतु तापमान वाढले, प्रदूषण वाढले, लोकांनी पाणी काढले, गाळ वाढला, खाणी आल्या तर तेथील परिसंस्था नष्ट होईल. सर्व जीव नष्ट होतील किंवा काहींना तिथून जावे लागेल. पृथ्वी हीसुद्धा एक मोठी परिसंस्था आहे. अशीच स्थिती पृथ्वीवर सर्वत्र पहावयास मिळत आहे.

पृथ्वीवर सूक्ष्म जीव, कीटक आणि प्राण्यांच्या; एकूणच सजीवांच्या आठ दशलक्षांपेक्षा जास्त प्रजाती असतील. अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत आहे. मानवाच्या अतिक्रमणामुळे हजारो प्रजाती नष्टही होत आहेत. तीन अब्ज वर्षांपासून आजतागायत विविध परिस्थितीत विविध परिसंस्थेत सजीवांचा क्रमिक विकास होत गेला. पण आज आपण सर्व अजैविक आणि जैविक संसाधने नष्ट करू लागलो आहोत. आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतो आहोत, हे आपल्याला; विज्ञानयुगातील बुद्धिवान मानवाला कळू नये ही शोकांतिका आहे.
    

उत्तर लिहिले · 25/12/2021
कर्म · 121765
0

परिसंस्थेचे अजैविक घटक:

अजैविक घटक म्हणजे परिसंस्थेतील निर्जीव वस्तू. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

  • हवा: परिसंस्थेतील सजीवांसाठी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन वायू आवश्यक असतात.
  • पाणी: सजीवांना जिवंत राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी पिण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
  • खनिज पदार्थ: परिसंस्थेतील वनस्पती आणि इतर सजीवांना वाढण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते.
  • सूर्यप्रकाश: वनस्पतींना प्रकाश संश्लेषण (photosynthesis) करण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
  • तापमान: परिसंस्थेतील सजीवांच्या वाढीवर आणि विकासावर तापमानाचा परिणाम होतो.
  • जमीन: जमीन वनस्पतींना आधार देते आणि खनिजे पुरवते.

परिसंस्थेचे जैविक घटक:

जैविक घटक म्हणजे परिसंस्थेतील सजीव वस्तू. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

  • उत्पादक: उत्पादक म्हणजे ते सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती प्रकाश संश्लेषण (photosynthesis)Through this process, they convert light energy into chemical energy and create food. करतात.
  • भक्षक: भक्षक म्हणजे ते सजीव जे अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. प्राणी हे भक्षक आहेत.
  • विघटक: विघटक म्हणजे ते सजीव जे मृत सजीवांचे विघटन करतात. जीवाणू (bacteria) आणि बुरशी (fungi) हे विघटक आहेत.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1680

Related Questions

पोषक द्रव्यांचे चक्रीकरण उदाहरणासह स्पष्ट करा?
परीसंस्थेची रचना लिहा?
इकोसिस्टमची रचना आणि कार्य स्पष्ट करा?
परिसंस्थेतील वस्तू व सेवांची अप्रत्यक्ष तत्त्वे सांगा?
परिसंस्थेची रचना लिहा?
परि संस्थेची रचना लिहा?
परिसंस्थेची व्याख्या स्पष्ट करा?