अन्न भेसळ

मिरची पावडर मध्ये कशाची भेसळ असते?

2 उत्तरे
2 answers

मिरची पावडर मध्ये कशाची भेसळ असते?

1
भेसळीचा पदार्थ : विटांची भुकटी, मीठ, तोंडाला लावण्याची पावडर. भेसळ ओळखण्यासाठी : चमचाभर मिरची पावडर काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात टाकल्यानंतर तळाला चिकट थर राहिल्यास ती विटेची भुकटी असते.
लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.
उत्तर लिहिले · 14/12/2021
कर्म · 121765
0

मिरची पावडरमध्ये भेसळ म्हणून खालील पदार्थ मिसळले जाण्याची शक्यता असते:

  • इष्टिकाचूर्ण (Brick powder): लाल रंग येण्यासाठी brick powder चा वापर केला जातो.
  • रंगीत लाकडी भुसा: textured bulk वाढवण्यासाठी वापरतात.
  • स्टार्च: powder volume वाढवण्यासाठी स्वस्त स्टार्च वापरले जाते.
  • रासायनिक रंग: artificial रंग मिसळल्याने मिरची पावडरला आकर्षक लाल रंग येतो.

भेसळयुक्त मिरची पावडर आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

अन्नभेसळ म्हणजे काय?
रोजच्या आहारात जी भेसळ आणि घातक भेसळ चालू आहे आणि काही कंपन्यांना (producer) सरकारने अनुमती दिली असून अशा वस्तू (product) भेसळयुक्त नकोत अशी आश्वासने दिली जातात, यावर सरकार कितपत लक्ष देते आणि आपण सर्व नागरिक म्हणून एकत्र येऊन आवाज उठवून हे कसे बंद करू शकतो?
आईस्क्रीममध्ये भेसळ शक्य आहे का?
दुधातील भेसळ कशी ओळखावी?
मी ज्या ठिकाणी काम करतोय, त्या किचनमध्ये प्लास्टिकसारखी अंडी येत आहेत, गेल्या 1 महिन्यापासून असंच चालू आहे, ना अंडी बंद करत आणि ना चांगली अंडी येत, तर मी कोणाला सांगून ही अंडी बंद होतील?
आईस्क्रीम भेसळयुक्त असते का?
प्लास्टिकचे तांदूळ कसे ओळखावे?