व्यायाम फिटनेस

बॉडी बनवण्यासाठी काय करावे लागेल?

2 उत्तरे
2 answers

बॉडी बनवण्यासाठी काय करावे लागेल?

2
बॉडी हवी असेल तर तरूणांनी नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि ग्लूकोजयुक्त पदार्थ खावेत. सोबतच याचीही काळजी घ्यावी की, नाश्ता कधीच टाळू नका. तुम्ही नाश्त्यामध्ये पनीर, दूध, पनीर पराठा, कडधान्य, दही, ओटमील आणि डाळींचं सेवन करू शकता. एका फिट व्यक्तीला दिवसभरात २ हजार कॅलरींची गरज असते






बॉडी बनवण्यासाठी खास टिप्स
   
काहींचे वजन झटपट वाढते तर काहींचे वजन कितीही खाल्ले तरी वाढत नाही. बारीक असण्यावरुन अनेकांची थट्टा उडवली जाते.




काहींचे वजन झटपट वाढते तर काहींचे वजन कितीही खाल्ले तरी वाढत नाही. बारीक असण्यावरुन अनेकांची थट्टा उडवली जाते. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त बारीक असाल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यासोबतच खाण्यापिण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. जर बॉडी बनवायची असेल तर व्यायाम करावाच लागेल. व्यायामुळे स्नायू मजबूत होतील. जाणून घ्या काही टिप्स ज्यामुळे तुम्ही झटपट वजन वाढवू शकाल. बॉडी बनवायची असेल तर खालील टिप्स वापरा


भरपूर कॅलरीज मिळवा


बारीक लोकांनी आपल्या आहारात कॅलरीजचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. अधिक कॅलरीज असलेल्या आहाराचा अर्थात अॅव्होकॅडो, बटाटा, चीज, पास्ता, ड्रायफ्रुट्स आणि नट्स यांचा समावेश करा. 


सतत खात राहा

तुमचे शरीर जितकी कॅलरीज बर्न करते त्यापेक्षा अधिक तुम्ही खाल्ले पाहिजे. यासाठी थोड्या थोड्यावेळाने खात राहिले पाहिजे. तुमचे वजन वाढत नाहीये तर तुम्हाला सतत खाल्ले पाहिजे. 


प्रोटीनयुक्त आहार घ्या

जर तुम्ही वजन वाढवण्यासाठी वर्कआउट करता तर तुमच्या स्नायूंना ताकद देण्यासाठी भरपूर प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करा. मटण, चिकन, अंडे आणि माशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.


हेल्थी स्नॅक्स

जर तुम्ही दिवसातून सतत खात नसाल स्नॅक टाईम वाढवा. तुमच्या स्नॅक्समध्ये ब्रेड, बिस्कीट, फळे, दुधाचा चहा अथवा ब्रेड यांचा समावेश करा. 


दूध, दह्याचे सेवन


आहारात अधिकाधिक दूध आणि दह्याचा समावेश करा. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत येईल. 


नियमित व्यायाम

वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज अर्धात तास व्यायाम करा. 





उत्तर लिहिले · 7/12/2021
कर्म · 121765
0

बॉडी बनवण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या खालीलप्रमाणे:

  1. आहार:

    बॉडी बनवण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने (proteins), कर्बोदके (carbohydrates) आणि चरबी (fats) यांचे योग्य प्रमाण असावे.

    • प्रथिने: अंडी, चिकन, मासे, पनीर, सोयाबीन, डाळी.
    • कर्बोदके: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, बटाटा, शकरकंद.
    • चरबी: तेल, तूप, सुका मेवा.
  2. व्यायाम:

    बॉडी बनवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तुम्ही वेट ट्रेनिंग (weight training), कार्डिओ (cardio) आणि स्ट्रेचिंग (stretching) व्यायाम करू शकता.

    • वेट ट्रेनिंग: स्नायू मजबूत करण्यासाठी.
    • कार्डिओ: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी.
    • स्ट्रेचिंग: लवचिकता वाढवण्यासाठी.
  3. पुरेशी झोप:

    बॉडी बनवण्यासाठी दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपेत असताना शरीर स्नायूंची दुरुस्ती करते.

  4. तणाव टाळा:

    तणावामुळे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे तणाव टाळण्याचा प्रयत्न करा.

  5. धैर्य ठेवा:

    बॉडी बनवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे लगेच परिणाम दिसले नाहीत तरी निराश होऊ नका. नियमित प्रयत्न करत राहा.

टीप: तुम्ही बॉडी बनवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

व्यायामाच्या वेळेत वाढ करावी का?
वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम कोणता?
मी कितीही विचार केला तरी मला कधीच सातत्य ठेवता येत नाही. ना अभ्यासाला, ना व्यायामाला, काय करू मी?
सूर्यनमस्कारासाठी वयोमर्यादा काय आहे?
घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?
दररोज किती तास व्यायाम करावा?
नियमित व्यायाम करण्याचे फायदे कोणते आहेत?