खगोलशास्त्र चंद्रग्रहण

चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा?

2 उत्तरे
2 answers

चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा?

1
चंद्रग्रहणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. खग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा पृथ्वीच्या सावलीत प्रछायेत पूर्णपणे झाकलेला असतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा खग्रास चंद्रग्रहण लागते. खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा अंशिकरीत्या पृथ्वीच्या सावलीने झाकल्या गेला असतो.
ग्रहण हा असा विषय आहे ज्याचे मला (आणि आपल्यातील बहुतेकांना सुद्धा) माझ्या बालपणापासून कुतुहूल होते. दोन्ही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जेव्हाही असले, तेव्हा मी हि खगोलीय घटना बघण्याचं सौभाग्य कधीच सोडत नाही. नुसता बघण्याचं नाही, तर हि ग्रहण नावाची खगोलीय घटना का होते, हे सुद्धा समजायचं प्रयत्न मी करायचो. आणि इतके ग्रहण बघितले असतांना सुद्धा मला अजूनही ग्रहणाचे जणू नवलच वाटते. चला जसा मी समजायचं प्रयत्न केला, तस तुम्हाला हि समजावतो कि चंद्रग्रहण का होते, आणि त्याचे प्रकार किती आहेत.

एकदम सोपा करून सांगायचं झाला तर जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि या सावलीने चंद्राचा तेजस्वीपणा कमी होतो, तेव्हा चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात. हि खगोलीय घटना पौर्णिमेला घडत असते. आता पृथ्वीची सूर्यप्रकाशामुळे जी छाया किंवा सावली चंद्रावर असते, तिचेही २ प्रकार असतात. मधात पडणाऱ्या गडद घन छायेला प्रछाया म्हणतात, आणि त्याच्या भोवतील फिक्कट छायेला उपछाया म्हणतात.


Figure: Lunar Eclipse (diagram is drawn by the author using Microsoft paint)

आता असा विचार करणे स्वाभाविक आहे कि चंद्र तर पृथ्वीची नेहमीच परिक्रमा करत असतो, आणि दर महिन्याला निदान एक पौर्णिमा तर असतेच, मग प्रत्येक पौर्णिमेला पृथ्वीची सावली पृथ्वीवर का नाही पडत किंवा चंद्रग्रहण का नसते ? याचे कारण म्हणजे ज्या plane मध्ये पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते (Ecliptic plane), आणि ज्या plane मध्ये चंद्र पृथ्वीची परिक्रमा करते, त्यात काही अंशाचा फरक आहे (५ अंश ९').[1]


हि छाया चंद्रावर पूर्णपणे पडते, कि अंशिकरीत्या पडते, (म्हणजे पृथ्वीची छाया चंद्राला अर्धवट झाकते, कि पूर्णपणे झाकते) यावरून आपण चंद्रग्रहणाचे वर्गीकरण करू शकतो.

चंद्रग्रहणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.

खग्रास चंद्रग्रहण
खंडग्रास चंद्रग्रहण
खग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा पृथ्वीच्या सावलीत प्रछायेत पूर्णपणे झाकलेला असतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा खग्रास चंद्रग्रहण लागते.




खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा अंशिकरीत्या पृथ्वीच्या सावलीने झाकल्या गेला असतो. जेव्हा चंद्र अंशिकरीत्या पृथ्वीच्या प्रछायेत (अम्ब्रा, umbra) प्रवेश करतो तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण लागते.


ग्लोस्टरशायर (Gloucestershire, UK), युनायटेड किंगडम वरून 17 जुलै 2019 रोजी लागलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे छायाचित्र [3]

पेनंब्रल चंद्रग्रहण एक विशेष प्रकारचा चंद्रग्रहण आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या पेनंब्रामधून (उपछायेतुन) जातो तेव्हा एक पेनंब्रल चंद्रग्रहण होते. पेनंब्रामुळे (पृथ्वीच्या उपछायेमुळे) चंद्राच्या पृष्ठभागाची मंद अंधुकता दिसून येते. हि अंधुकता इतकी मंद असते कि उघड्या डोळ्यांना दिसायला सुद्धा चंद्राचा व्यासाचा 70% भाग पृथ्वीच्या पेनंब्रामध्ये बुडला असायला हवा.[4][5] एक अति विशिष्ट प्रकारचा आणि दुर्मिळ असं चंद्रग्रहण म्हणजे एकूण किंवा खग्रास पेनंब्रल चंद्रग्रहण (Total penumbral lunar eclipse) (मला माहित नाही अस नाव पण आहे काय, पण तुम्ही संकल्पना समजून घ्या), ज्या दरम्यान चंद्र पृथ्वीच्या पेनंब्रामध्ये पूर्णपणे बुडून राहतो. जेव्हा हे घडते तेव्हा चंद्राचा त्याच्या अम्ब्रा (umbra) म्हणजे प्रछायेच्या सर्वात जवळचा भाग उर्वरित चंद्रापेक्षा किंचित गडद दिसतो.


उत्तर लिहिले · 2/12/2021
कर्म · 121765
0

चंद्रग्रहणाचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत:

  1. पूर्ण चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse):

    या प्रकारात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येतो आणि यामुळे चंद्र लालसर दिसतो. याला 'ब्लड मून' असेही म्हणतात.

  2. आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse):

    या प्रकारात चंद्राचा काही भागच पृथ्वीच्या छायेत येतो. त्यामुळे चंद्राचा काही भाग तेजस्वी तर काही भाग अंधारात दिसतो.

  3. उपच्छाया चंद्रग्रहण (Penumbral Lunar Eclipse):

    या प्रकारात चंद्र पृथ्वीच्या उपच्छायेतून (Penumbra) जातो. त्यामुळे चंद्राच्या तेजात थोडा फरक जाणवतो आणि तो किंचित् गडद दिसतो. हा बदल सहजासहजी लक्षात येत नाही.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्स बघू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आपल्याकडे रात्री आकाशात दिसणारा ध्रुव तारा दक्षिण गोलार्धातही दिसतो का?
नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?
धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
नेपच्यून ग्रह आहे का?
प्लुटो ग्रह आहे का?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?