शब्दाचा अर्थ शब्द

संकल्पना म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

संकल्पना म्हणजे काय?

2
संकल्पना सामान्य कल्पना किंवा सामान्य कल्पना म्हणून परिभाषित केल्या जातात ज्या मनात, भाषणात किंवा विचारात उद्भवतात. ते तत्त्वे, विचार आणि विश्वासामागील संकल्पनेचे मूलभूत बांधकाम अवरोध समजले जातात. अनुभूतीच्या सर्व पैलूंमध्ये ते महत्वाची भूमिका बजावतात.
संकल्पना : (कॉन्सेप्ट). वेगवेगळ्या वस्तू किंवा घटना यांच्यात आढळून येणारे सर्वसाधारण लक्षण/लक्षणे वा संबंध म्हणजे संकल्पना होय. संकल्पनांमुळे वस्तूंचे वर्गीकरण करणे सुलभ होते. तसेच संकल्पनांमुळे आपल्या पर्यावरणातील वस्तूंचा बोध सुकर होतो. त्यामुळे संकल्पना हे बाह्य जगाचे ज्ञान मिळविण्याचे एक साधन ठरते.


संकल्पनेचे अनेक प्रकार आहेत. उदा., सोपी (सिम्पल), गुंतागुंतीची (कॉम्प्लेक्स), संयोजित (कन्जंक्टिव्ह), पक्षांतरबोधक (डिस्‌जंक्टिव्ह) आणि संबंधदर्शक (रिलेशनल). जिच्यात एकच लक्षण वा गुणधर्म असतो, त्या संकल्पनेस सोपी संकल्पना म्हणतात. उदा., ‘हिरवा’ ह्या शब्दात केवळ एकच लक्षण (हिरवेपण) सांगितलेले आहे. ‘हिरवेपण’ ह्या संकल्पनेच्या आधारे आपण हिरव्या असलेल्या आणि हिरव्या नसलेल्या वस्तू असे वर्गीकरण करू शकतो. ज्यावेळेत संकल्पनेत एकाहून जास्त लक्षणे असतात, तेव्हा तिला गुंतागुं तीची संकल्पना म्हणतात. उदा., फळांच्या मिश्रणातून केलेल्या पदार्थामध्ये (फ्रू ट सॅलड) अनेक फळांच्या संकल्पना एकत्रित असतात. त्यात संकल्पनांची सरमिसळ असते. ज्यावेळी वस्तूची दोन किंवा अधिक विशेष लक्षणे संयुक्त रीत्या असल्याचे आढळते, तेव्हा संयोजित संकल्पना तयार होते. उदा., ‘मिरची’ म्हटल्यानंतर तिचा तिखटपणा आणि हिरवेपणा किंवा लालपणाही लक्षणे संयुक्त रीत्या एकत्र आलेली दिसतात. पक्षांतरबोधक संकल्पनेत एखादया वस्तूच्या अनेक विशेष लक्षणांपैकी एका विशेष लक्षणामुळे ती संकल्पना आपल्या एकदम लक्षात येते. उदा., जळणारी वस्तू वा इंधन म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यांसमोर कोळसा, लाकूड, रॉकेल, गोवऱ्या इ. वस्तू येतात किंवा त्यामुळे जळणाऱ्या इतर वस्तूंचा लगेच बोध होतो. संबंध दर्शक संकल्पना ही दोन वस्तूंमधील संबंध दर्शविते. उदा., अ वस्तू ब वस्तूच्या तुलनेत जवळची किंवा लहान प्राणी, मोठा प्राणी इत्यादी.


संकल्पनेची घडणही एक प्रक्रिया असून तिचा विकास लहानपणापासूनच होत असतो. एका मतानुसार हा विकास तीन अवस्थांतून होतो. पहिल्या अवस्थेत मूल निरनिराळ्या दृश्य वस्तूंचे वर्गीकरण एका गटात करते. ह्या गटातील वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांमुळे हे वर्गीकरण निर्माण झालेले असते. दुसऱ्या अवस्थेत हे संबंध कोणत्या प्रकारचे आहेत, ह्याचे त्याला ज्ञान होते. तिसऱ्या अवस्थेत मात्र त्याला वस्तूंमध्ये कोणते सर्वसाधारण लक्षण वा वैशिष्ट्य आहे, हे लक्षात येते आणि मग खऱ्या अर्थाने संकल्पनेचा बोध होतो. आरंभी कुत्रा, मांजर, झाड इ. शब्द लहान मूल केवळ उच्चा रत असते मात्र त्या शब्दांचा विशेष लक्षणांनी निश्चितपणे होणारा बोध तिसऱ्या अवस्थेत होतो.


सी. एल्. हल आणि ई. हिडब्रे डर यांनी विगामी (इन्डक्टिव्ह) आणि निगमनात्मक (डिडक्टिव्ह) पद्धतींचा उपयोग करून काही प्रयोग केले. विगामी पद्धतीत प्रयोगातील व्यक्तीला अनेक उदाहरणे देण्यात येतात आणि त्यांतून तिला त्यांतील सर्वसाधारण लक्षण वा वैशिष्ट्य शोधावयाचे असते. निगमनात्मक पद्धतीत प्रयोगातील व्यक्तीला एखादे तत्त्व सांगण्यात येते आणि त्या तत्त्वाच्या आधारे तिला अनेक उदाहरणे निर्माण करावयाची असतात. मानवी विचारांच्या इतिहासात ह्या दोन्ही पद्धतींचा उपयोग वेगवेगळेपणाने किंवा मिश्ररूपाने केला गेल्याचे आढळून येते. हिडब्रेडरच्या मतानुसार संकल्पना ह्या प्रथम मूर्त स्वरूपात, नंतर स्थळ स्वरूपात (spatial form) आणि शेवटी अमूर्त स्वरूपात विकसित होतात.


आपल्या अध्ययन प्रक्रियेत संकल्पनांचा फार मोठा सहभाग असतो. समजा, आपल्याला एखादी संकल्पना ज्ञात आहे आणि दुसरी एक संकल्पना आपण शिकत आहोत. अशा वेळी दुसरी संकल्पना जर पहिल्या संकल्पनेशी जुळणारी असेल, तर आपण दुसरी संकल्पना लवकर शिकतो. ह्याला धनसंक्रमण (पॉझिटिव्ह ट्रान्सफर) असे म्हणतात. दोन्ही संकल्पनांत काही प्रमाणात साधर्म्य असल्यामुळे धनसंक्रमण होते. काही वेळा पहिल्या संकल्पनेचा दुसरी संकल्पना शिकण्यास अडथळा निर्माण होतो कारण त्या दोन संकल्पनांत फार थोडे साधर्म्य असते. दोन संकल्पना अगदी भिन्न असतील, तर आपण दुसरी संकल्पना अगदी स्वतंत्रपणे शिकतो. ह्यात पहिल्या संकल्पनेचा काहीही सहभाग नसतो. पहिली संकल्पना मदत वा अडथळा असे काहीही करीत नाही.



उत्तर लिहिले · 25/11/2021
कर्म · 121705

Related Questions

मार्गदर्शन तत्वे व मूलभूत अधिकार यांचा परस्पर संबंध तुमच्या शब्दात सांगा?
अतिशय समानार्थी शब्द मराठी ?
सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे कोणी म्हंटले आहे?
समास सामासिक शब्द विग्रह?
शब्दाचे वचन बदला भिंति?
जूनि विरुद्धार्ति शब्द मराठी?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?