युद्ध इतिहास

पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले?

3 उत्तरे
3 answers

पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले?

1
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीराव यांच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अहमदशाह अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले[१]. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली[२]. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगेकूच केले.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 45560
1
पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, १४ जानेवारी, इ. स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले.
पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीही मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रुस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपुष्टात आले. याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफावण्यास झाला.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 121765
0

पानिपतचे तिसरे युद्ध मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे झाले.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तोंड उत्तर दिशेलाच का असते?
शीतयुद्ध नंतरच्या कालखंडातील परिमाणाचा अभ्यास स्पष्ट करा?
अण्णाभाऊ साठे रशियालाच का गेले होते?
कार्ल आणि भाजे लेण्यांमध्ये लेण्यांच्या संबंधीची माहिती विशद करा?
वेरुळ (एलोरा) येथील ब्राह्मणी (हिंदू) लेण्यांचे वर्णन करा.?
प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नाणे शास्त्राचे योगदान स्पष्ट करा?
मध्ययुगीन काळातील राज्यकर्त्यांनी (बादशहांनी) विनिमयात आणलेल्या नाण्यांविषयी चर्चा करा.