समाजशास्त्र कुटुंब कुटुंब पद्धती

मातृसत्ताक कुटुंब व पितृसत्ताक कुटुंब म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

मातृसत्ताक कुटुंब व पितृसत्ताक कुटुंब म्हणजे काय?

2
कुटुंबातील व्यक्ती, मालमत्ता आणि व्यवहार यांच्यावर मातेची किंवा वडिलधाऱ्या स्त्रीची अधिसत्ता चालते, अशा व्यवस्थेस मातृसत्ताक कुटुंबपद्धती असे म्हटले जाते. ... मालमत्ता स्त्रीची मानली जाते आणि तिच्या मुली ह्या तिच्या वारसदार मानल्या जातात. धार्मिक कार्यामध्ये गृहप्रमुख या नात्याने स्त्रियांना प्राधान्य असते.

कुटुंबातील घटक व्यक्तींवर पित्याची वा वडीलधार्‍या पुरूषाची अधिसत्ता असणारी कुटुंबाची संघटना म्हणजे पितृसत्ताक कुटुंबपद्धती. ... चीनमध्ये कुटुंबप्रमुख, त्याची पत्नी, विवाहित आणि अविवाहित मुले, नातवंडे यांनी बनलेले विस्तारित कुटुंब पिढ्यान्‌पिढ्या राहात आलेले होते.

मातृसत्ताक कुटुंब पद्धती-मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रीचे प्रस्थापित वर्चस्व असते कुटुंबाची वंशावळ तिच्याच नावाने चालते. कुटुंबाची ओळख तिच्याच नावाने किंवा गोत्राने होत असते. कुटुंबाची मालकीची संपती मुलांना न मिळता मुलींना मिळते. विवाह झाला की पती हा पत्नीच्या घरी अधूनमधून राहायला जातो. सर्व कारभार पुरुषांवर नसून स्त्रीच्या भावावर आणि वडिलांवर असतो. हे कुटुंब रक्तसंबंधांवर अधिक आधारलेले असते.

पितृसत्ताक कुटुंब - बहुतांशी जगात पितृसत्ताक कुटुंब पद्धती प्रचलित आहे. या कुटुंब पद्धतीमध्ये सर्व सत्ता पुरुषाकडे असते. विवाहानंतर पत्नी पतीच्या घरी जाऊन राहते. त्यामुळे पत्नीला त्या कुटुंबाचे सदस्यत्व मिळते. तसेच तिला पतीच्या गोत्रातील एक सदस्य म्हणून मान्यता मिळते. यामध्ये वारसा हक्क मुलास मिळतो. कोणतेही आर्थिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असताना पतीला प्राधान्य दिले जाते. सर्व आर्थिक व्यवहार जास्त करून पुरुष पाहतात. पित्याच्या मृत्यूनंतर सर्व व्यवहार आपोआप मुलाकडे येतात. विवाहा नंतर वधू वराच्या घरी जाते. कुटुंबामध्ये स्त्रीचा दर्जा दुय्यम असतो. तिचा दरारा असलाच तर सासू या नात्याने सुनेवर असतो. समाजातील लोकरूढीप्रमाणे या प्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्री-पुरुष यांच्या कामाची वाटणी झालेली असते.
उत्तर लिहिले · 13/11/2021
कर्म · 121765
0

मातृसत्ताक कुटुंब:

  • ज्या कुटुंबात आई ही प्रमुख असते आणि घराचे निर्णय घेण्याचा अधिकार तिच्याकडे असतो, त्याला मातृसत्ताक कुटुंब म्हणतात.
  • या प्रकारच्या कुटुंबात, संपत्ती आणि वारसा आईच्या नावावर असतो आणि तो मुलींकडे हस्तांतरित होतो.
  • भारतात, मेघालयमधील खासी जमाती आणि केरळमधील नायर जमातीमध्ये मातृसत्ताक पद्धती अजूनही अस्तित्वात आहे.

पितृसत्ताक कुटुंब:

  • ज्या कुटुंबात वडील हे प्रमुख असतात आणि घराचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो, त्याला पितृसत्ताक कुटुंब म्हणतात.
  • संपत्ती आणि वारसा वडिलांच्या नावावर असतो आणि तो मुलांकडे हस्तांतरित होतो.
  • जगामध्ये बहुतेक ठिकाणी पितृसत्ताक पद्धती आढळते.

फरक:

  • मातृसत्ताक कुटुंबात आईला जास्त अधिकार असतात, तर पितृसत्ताक कुटुंबात वडिलांना जास्त अधिकार असतात.
  • वारसा हक्काने मिळणारी संपत्ती मातृसत्ताक कुटुंबात मुलींना मिळते, तर पितृसत्ताक कुटुंबात मुलांना मिळते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

भारतातील पुरुषप्रधान कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
आपल्या कुटुंब व्यवस्थेत वर एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रभाव कसा आहे ते स्पष्ट करा?
आधुनिक काळात प्रचलित असलेली कुटुंब पद्धती कोणती आहे?
गारो जमातीत असलेल्या संयुक्त कुटुंबास काय म्हणतात?
उत्तर भारतातातील नाती -गोटी विषय माहिती लिहा ?
ग्रामीण भागात कोणत्या कुटूंब पद्धती अस्तित्वात आहे?
एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय?