4 उत्तरे
4 answers

आगळ म्हणजे काय?

2
आगळ म्हणजे कोकणातला रस म्हणजे आगळ

कोकम सरबत (वृक्षाम्ल पानक)

रणरणत्या उन्हामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेवर रामबाण उपाय म्हणजे कोकम सरबत !
विशेषतः कोकणात कोकमाची झाडे आढळतात . कोकम म्हणजे ताजे फळ आणि वळवले की आमसुले .

कृती –
बाजारात मिळणाऱ्या तयार कोकम सरबतात असण्याची शक्यता असते त्यामुळे आगळ वापरलेले चांगले . घरगुती, खात्रीचे असेल तर चालेल .
आगळ म्हणजे कोकमाच्या ताज्या फळांचा रस. अतिशय आंबट असतो .
पाव ग्लास आगळ घ्यावे . पाऊण ग्लास पाणी मिसळावे .
चवीनुसार साखर व सैंधव मीठ घालावे . साखरेऐवजी गुळही वापरू शकता .
यात जिरेपूड , पुदिना रस किंवा पूड घातल्यास सरबत चविष्टही बनते व उत्तम पाचक म्हणूनक काम करते .
सरबत किंवा आगळ नसेल तर आमसुले भिजत टाकणे , उकळणे व त्या साखर घालून सरबत बनवता येते.

गुणधर्म –
चवीला आंबट असणारे आमसूल / कोकम शरीरात सरबत स्वरूपात थंडपणा निर्माण करते .
आंबट गोड चवीमुळे मनाला आवडणारे , मन प्रसन्न करणारे.
भूक वाढते व तोंडाला चव येते.
तहान तहान कमी होते.
रक्तदुष्टी घालवणारे , पित्तशमन करणारे .

औषधी उपयोग –
शितपित्तात (अंगावर पित्त उठणे व खाज येणे ) व्याधीप्रत्यनिक  दिवसभर घोट- घोट कोकम सरबत प्यावे . खाज लगेच कमी होते.
सर्वांग दाहात ( शरीराची आग आग होणे) उपयुक्त .
मूलव्याधात भरपूर खडीसाखर घालून प्यावे .
तापात उत्तम . थकवा कमी होण्यास मदत . तोंडाला चव येते.
पोटात कळ येऊन पोट साफ होणे व नंतरही पोट दुखत राहणे यात गुणकारी . त्यात पुदिना किंवा जिरेपूड घातल्यास अधिक उपयुक्त .
कुठल्याही आजारात उकळून थंड केलेल्या पाण्यातील सरबत प्यावे .

दुसरा अर्थ आगळ म्हणजे दरवाजाच्या आतील बाजूस अडसर असते त्यला आगळ म्हणतात

आगळ म्हणजे एक सागवानी अवजड वासा होता. त्याच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवला होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कड़ी बसले होते. त्या कडीला करून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते.
उत्तर लिहिले · 20/10/2021
कर्म · 121765
1
आगळ म्हणजे दाराला लावलेला अडसर.
उत्तर लिहिले · 9/11/2021
कर्म · 3740
0

आगळ म्हणजे काय:

आगळ म्हणजे दरवाजा बंद करण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. हे विशेषतः जुन्या घरांमध्ये वापरले जाते. आगळ ही लाकडी किंवा धातूची बनलेली एक मोठी आडवी कडी असते.

आगळ कशी काम करते:

  • आगळ दाराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या खांब्यांमध्ये अडकवली जाते.
  • जेव्हा आगळ एका बाजूच्या खांब्यातून दुसऱ्या बाजूच्या खांब्यात सरळ घातली जाते, तेव्हा दरवाजा बाहेरून उघडणे शक्य नसते.
  • आगळ काढण्यासाठी, ती एका बाजूला उचलून खांब्यातून बाहेर काढावी लागते.

आगळचे फायदे:

  • आगळ लावल्याने दरवाजा अधिक सुरक्षित होतो.
  • आगळ सहसा मजबूत असल्याने तोडणे कठीण असते.
  • आगळ हे घराला पारंपरिक आणि आकर्षक स्वरूप देते.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून आगळ विषयी अधिक माहिती मिळवू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1680

Related Questions

सोनं गुंफा कोठे आहे?
मराठी शाहीचा अस्त का झाला, याविषयी माहिती द्या?
समकालीन ही संज्ञा सविस्तर स्पष्ट करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट करा?
रंगायन या नाट्य संस्थेवर टीप लिहा.
रंगायन ही नाट्य संस्था याबद्दल माहिती द्या?