कायदा शेती रस्ता शेतीविषयक कायदे

शेतीसाठी रस्ता अडवला तर काय करावे?

2 उत्तरे
2 answers

शेतीसाठी रस्ता अडवला तर काय करावे?

3
 

शेतकऱ्यांना शेतात शेत कसण्यासाठी स्वतः किंवा मजुरांना घेऊन जावेलागते, बी, बियाणे, खत, असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलगाडी किंवा ट्रॅक्टर वापरावा लागतो परन्तु मुजोर लोक आपल्या बांधावरून जाण्यास अडवणूक करतात .

शेतकरी जर तो रस्ता पूर्वापार वापरत असेल तर कुणालाही अडवणूक करता येत नाही. त्या साठी तहसीलदारा कडे मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 कलम 5 नुसार वादपत्र (अर्ज) दाखल करावे . या मध्ये रस्ता अडविनाऱ्यास प्रतिवादी करावे,कुणालाही अडवणूक करता येत नाही. त्या साठी तहसीलदारा कड़े मामलेदार न्यायालयात अधिनियम 1906 कलम 5 नुसार वादपत्र (अर्ज) दाखल करावे . या मध्ये रस्ता अडविनायास प्रतिवादी करावे, अडवणूक केल्याची घटना तारीख व वेळेसह सविस्तर लिहावी, त्यात साक्षदार असल्यास नाव टाकावे, अर्जा खाली सत्यापन (verification ) करावे . योग्य ती तिकीट लावावी. सोबत, दोन्ही शेताचे सातबारा जोडावे, कच्चा नकाशा तलाठ्यांकडून घेऊन जोडावा. असल्यास साक्षदारांचे नाव द्यावेत हा अर्ज अडवणूक केल्याच्या घटनेपासून पासून 6 महिन्याच्या मुदतीत दाखल करावा लागतो. जुना रस्ता असून तो अडवू नये या साठी तहसीलदारांना मामलेदार न्यायालय कायदा 1906 कलम 5 नुसार शेतकऱ्यांना रस्ता पुर्ववत करून देण्याचा अधिकार आहे. तसेच जुना रस्ता जरी नसेल तरी जमीन महसूल कायदा कलम 143 नुसार कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्त्याची

मागणी करता येते. ही मागणी तहसीलदार यांना

करावी लागेल.वहिवाट कायदा 1982 कलम15 नुसार 20 वर्ष अधिक काळ कोणत्याही रस्त्यावरून मग तो शेतात जाण्याचा असो की घराचारस्ता असल्यास त्या रस्त्यावरुन जाण्यासाठी अधिकार प्राप्त होतो. तो अडविल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता

येतो.

रस्त्यावरून जातांना अडवणूक करणे हा भादवि कलम 341 नुसार गुन्हा होतो.

शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवू नये या साठी अर्ज तहसीलदार न्यायालयात वरील तरतुदी नुसार करता येतो किंवा दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया कायदा ऑर्डर 39 रूल 1 व 2 नुसार तात्पुरत्या मनाई आदेशा साठी अर्ज व निरंतर मनाईआदेशा साठी दावा

दाखल करता येतो.

या सर्व कारवाई साठी तालुक्यातील जाणकार वकिलाची मदत घेतल्यास चांगले.
उत्तर लिहिले · 9/10/2021
कर्म · 121765
0

शेतीसाठी रस्ता अडवला গেলে खालील उपाय करा:

  1. तहसीलदार कार्यालयात अर्ज: तुमच्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयात रस्ता अडवल्याबद्दल लेखी तक्रार करा. त्यामध्ये रस्त्यामुळे होणारी गैरसोय नमूद करा.
  2. पोलिसात तक्रार: रस्ता अडवल्याने तुम्हाला शेतात जाण्यास मज्जाव झाल्यास, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता.
  3. न्यायालयात दावा: दिवाणी न्यायालयात (Civil Court) हक्काच्या रस्त्यासाठी दावा दाखल करता येतो.
  4. ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करून रस्ता मोकळा करण्याची मागणी करता येते.

कायदेशीर सल्ला: अधिक माहितीसाठी व तुमच्या परिस्थितीनुसार योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी वकिलाचा सल्ला घ्या.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्याकडील संबंधित कागदपत्रे (उदा. जमिनीचा नकाशा, मालकी हक्क कागदपत्रे) तयार ठेवा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, हे व्याख्या सांगणारा शासन निर्णय कोणता आहे?
सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत व आत्महत्यांबाबत सर्वच मीडियात चर्चा चालू आहे, पण असे केल्याने शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सुटतील का?