2 उत्तरे
2
answers
व्होल्टेज म्हणजे काय?
2
Answer link
व्होल्टेज म्हणजे विजेच्या दोन सप्लाय पाॅइंट मधील विद्युत दाब अथवा potential difference हा व्होल्ट्स मध्ये मोजतात. करंट म्हणजे विद्युत प्रवाह. हा विजेला जोडलेल्या उपकरणां च्या resistance ( लोड) प्रमाणे कमी जास्त होतो.
व्होल्टेज म्हणजे काय?
व्होल्टेज म्हणजे काय?वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे आपण व्होल्टेजची व्याख्या खालीलप्रमाणे मांडु शकतो.
वोल्टेज म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट(वरील चित्र) मधील पावरसोर्स (बेटरी सेल) मधील दाब. हा दाब चार्ज इलेक्ट्रॉनला (करंट) एका माध्यमातुन प्रवाहित करतो. आणि जेणेकरून आपल्याला दिवा पेटला आहे असे दिसते.
थोडक्यात वोल्टेज = दाब, आणि त्याला आपण व्हॉट्स(V) मध्ये मोजु शकतो.
व्होल्टेजचे २ प्रकार असतात:

१. अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज (AC): आपल्या घरातील वीज २३० वोल्ट्स हे यात मोडते. ती कश्या प्रकारे वाहते ते आपण वरील चित्रात नागमोडी वाहत असलेले बघु शकतो.
२. डायरेक्ट करंट व्होल्टेज (DC): घरात वापरले जाणारे रिमोट सेल किंवा घड्याळाचे सेल किंवा कारमधील बेटरी हे DC वोल्टेज चे उत्तम उदाहरण आहे.
आता वळूया करंट म्हणजे काय?
विद्युतीय सर्किट मध्ये इलेक्ट्रॉन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवाह करतात त्याला आपण करंट म्हणु शकतो. सर्वात पहिल्या चित्रात लाल आणि काळे बाण करंट दर्शवितात.
थोडक्यात करंट = प्रवाह आणि त्याला आपण एम्पियर (A) मध्ये मोजु शकतो.
करंटचे पण व्होल्टेज प्रमाणे २ प्रकार असतात:
१. अल्टरनेटिंग करंट (AC):
हे साइन वेव्ह पेटर्न प्रमाणे वाहतात.
याचे मोजमापसाठी साठी A, mA आणि uAmp अश्या संज्ञा वापरल्या जातात
घरातील वापरले जाणारे सर्व इलेक्ट्रिकल उपकरणात याचा वापर होतो.
२. डायरेक्ट करंट (DC):
हा करंट फक्त एका दिशेत प्रवाह करतो.
याचे मोजमापसाठी साठी A, mA आणि uAmp अश्या संज्ञा वापरल्या जातात
बेटरीज आणि डीसी जनरेटर यात वापर होतो.
ता.क.: थोडक्यात सांगतो किचनमधील मिक्सर ज्या प्रवाहने चालते त्याला AC voltage आणि AC current म्हणतात.
आणि घड्याळ किंवा इमर्जन्सी लाईट ज्या प्रवाहाने चालते त्याला DC voltage आणि DC current असे म्हणतात.
उदाहरणार्थ: टेरेस वर पाण्याची टाकी भरली आहे ते म्हणजे वोल्टेज आणि जेव्हा तुम्ही आपल्या घरातील नळ उघडता तेव्हा ते पाण्याचा प्रवाह आपल्या घरात येतो त्याला करंट असे म्हणतात.
टाकी पासुन तर घरातील नळापर्यंत असलेल्या सर्व प्लम्बिंगला इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणता येईल.
0
Answer link
व्होल्टेज (Voltage): व्होल्टेज म्हणजे दोन बिंदूंमधील विद्युतpotential फरकाची मापणी.
सोप्या भाषेत, व्होल्टेज हे विद्युत सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत ढकलण्याचे काम करते. याला विद्युत दाब किंवा विद्युतpotential फरक असेही म्हणतात.
व्होल्टेजची व्याख्या:
- व्होल्टेज हे कार्य (Work) प्रति युनिट चार्ज (Charge) असते.
- व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्ट (Volt) हे एकक वापरले जाते.
उदाहरणार्थ, 1.5 व्होल्टची बॅटरी म्हणजे ती एका Coulomb चार्जला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत हलवण्यासाठी 1.5 जूल (Joule) ऊर्जा देते.
व्होल्टेजचे प्रकार:
- AC व्होल्टेज (Alternating Current Voltage): हे वेळोवेळी बदलते.
- DC व्होल्टेज (Direct Current Voltage): हे स्थिर असते.
व्होल्टेजमुळे विद्युतप्रवाह (Current) सर्किटमध्ये वाहतो आणि उपकरणे कार्य करतात.
अधिक माहितीसाठी: