स्मरणशक्ती मानसिक आरोग्य आरोग्य

स्मरन शक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

स्मरन शक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

2



स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय


मेंदूचे कार्य कसे चालते ?
आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. 1) एखाद्या विषयाचे ग्रहण करणे (धी), 2) त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे (धृती), 3) योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे (स्मृती) अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात.
स्मरणशक्तीसाठी आहार कसा असावा?
> उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे.
> गाईचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या रोज आहारात समावेश असावा.
> आयुर्वेदानुसार गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा.
> आयुर्वेदानुसार गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ मेध्य म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत.
> शिळे पदार्थ, गवार, तोंडली, दही, म्हशीचे दूध हे पदार्थ बुद्धीमांद्यकर असल्याने ते खाण्याचे टाळावेत.
> बेकरी उत्पादने, आंबवलेले पदार्थ, चायनीज, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.
> कांदा, लसूण, म्हशीचे दूध हे ‘तम’ वाढवणारे असल्याने खाऊ नयेत.
> चहा, कॉफी अशा उत्तेजक पदार्थांचे अतिसेवन कालांतराने अपायकारक ठरते.
उपाय
> उत्तम स्मरणशक्तीसाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते.
> चालणे, पळणे, सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो. परिणामी स्मरणशक्तीही वाढते.
> अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.
> 6 ते 8 तासांची झोप उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते. डोके व तळपायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागून मेंदूला आराम मिळतो. स्मरणशक्ती तल्लख होते. झोपताना टीव्ही बघू नये. त्याने गाढ झोप लागत नाही.
> कोडी सोडवणे, सुडोकू, शब्दकोडी सोडवणे असे उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अभ्यास करताना नेहमी टेबल, खुर्ची किंवा संतरंजीवर बसून अभ्यास करावा. झोपून अभ्यास करू नये.
औषधी
> आयुर्वेदात उत्तम बुद्धी व स्मरणशक्तीसाठी अनेक औषधींचे वर्णन केलेले आढळते. विशेषत: वचा, ब्राह्मी, शंखपुष्पी, ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांच्या वापराने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय (
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार

पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसूनसुद्धा लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना कितीतरी गोष्टी लक्षात राहायच्या. अगदी कितीही जुने दाखले, हिशोब, गणितं त्यांना अगदी तोंडपाठ असायची. पण आता मात्र लोकांना मोबाईल फोन घेतल्याशिवाय काही आठवणार नाही. सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करायची सवय लागली आहे. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल. अशावेळी मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर द्यावा लागेल की नाही. म्हणूच आज आपण स्मरणशक्ती वाढवण्यावर थोडी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये आपण स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार, स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपचार, लक्षात ठेवण्याचे उपाय.. शिवाय केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशांसाठी काही सोप्या गोष्टी आणि बुद्धी कशी वाढवावी या विषयी अधिक माहिती घेणार आहोत मग करुया सुरुवात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने (
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार (
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार 
तुम्हाला पडलेत का प्रश्न (
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने (
सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत स्मरणशक्ती वाढवण्यासाठीच्या योगासनांनी. योगाचे शारिरीक फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण योगा तुमच्या स्मरणशक्ती आणि बुद्धीसाठीही चांगला आहे. जाणून घेऊया नेमका कोणता योगा प्रकार तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायद्याचा आहे.

1. सर्वांगासन


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय – सर्वांगासन

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आपण पाहणार आहोत ते सर्वांगासन. सर्वांगासनामध्ये तुमचे दोन्ही पाय हवेत वर करायचे असतात. असे करताना तुम्हाला कमरेकडून आधार द्यायचा असतो. या आसनामुळे तुमच्या मेंदूला योग्य तो रक्तपुरवठा होतो. मेंदूला झालेल्या योग्य रक्तपुरवठ्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.

2. भुजंगासन


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय – भुजंगासन

भुजंगासनामध्ये तुम्हाला सापाप्रमाणे मान मागे करायची असते म्हणूनच याला cobra pose असे सुद्धा म्हणतात. तुम्हाला पोटावर झोपून हाताच्या मदतीने अंग उचलायचे आहे. असे करताना तुम्हाला तुमचे डोके पाठीच्या दिशेने झुकवायचे आहे असे करताना तुम्हाला या आसनामध्ये काही किमान 1 मिनिटं तरी तसेच राहायचे आहे. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि त्याचा परीणाम तुमच्या मेंदूवर होतो. योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते.

3. पद्महस्तासन


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय – पद्महस्तासन

पद्महस्तासन हा व्यायामप्रकारसुद्धा तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला सरळ उभं राहून हात वर करुन तसेच कंबरेतून वाकत खाली यायचे आहे. असे करताना तुम्हाला जमिनीला हात टेकवता यायला हवा. शिवाय गुडघ्यात न वाकता तुम्हाला तुमचे डोकं तुम्हाला गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर ताण पडतो. शिवाय तुमच्या मेंदूला योग्य असा रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करत असताना तुम्ही हे आसन करू शकता.

4. हलासन


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय – हलासन

हलासनामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचे असते. पाय हवेत उचलून तुम्हाला ते तुमच्या डोक्यापर्यंत आणायचे असतात असे करत असताना तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होतो. तुमच्या पाठीच्या कण्यासोबतच तुम्हाला मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही हलासन करु शकता.

5. पद्मासन


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय – पद्मासन

स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आणखी एक सोपं आसन तुम्ही करु शकता ते म्हणजे पद्मासन. पद्मासनामुळे तुमचे मन शांत होते. मन शांत झाल्यामुळे तुमच्या मेंदूवरील ताण कमी होतो. ताण कमी झाल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं. त्यामुळे तुम्ही पद्मासन अगदी घरच्या घरी आणि कधीही करु शकता. पद्मासन करत असताना तुम्ही ओमकार म्हटला तरी चालू शकेल.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार (
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासनं पाहिल्यानंतर आता आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार पाहणार आहोत. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे खानपानात झालेले बदल तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करत असतात. त्यामुळे तुम्ही नेमका काय आहार घ्यायला हवा ते पाहुया.

1. स्मरणशक्तीला चालना देणारे पदार्थ



मासे: माशांमध्ये असणारे फिश ऑईल तुमच्या शरीरासाठी चांगले असते. माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश अगदी हमखास करायला हवा.
सॅच्युरेटेड फॅट: दूध,मांस, चिकन, तेल, चीझ यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. तुमच्या आरोग्यासाठी या गोष्टी अतिरिक्त खाणे चांगले नाही.असे सांगितले जाते. पण एका अभ्यासात असे समोर आले आहे की या पदार्थांच्या योग्य सेवनामुळे तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
पालेभाज्या: पालेभाज्याही तुमच्या शरीराला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन k, ल्युटेन, फ्लोलेट असते जे तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात मेथी, पालक, मुळा, लालमाठ अशा भाज्यांचे सेवन करायला हवे
ग्रीन टी: चहा पिण्यापेक्षा जर तुम्ही ग्रीन टी चे सेवन केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. म्हणून तुम्ही ग्रीन टीचे सेवन करा. ग्रीन टी तुम्हाला कायम अॅक्टीव्ह ठेवते. त्यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम राहता आणि तुमच्यामध्ये अधिक चुणूक दिसून येते. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करणं अतिशय सोपे आहे. 
2. डार्क चॉकलेट

चॉकलेट हे नेहमीच शरीरासाठी चांगले असते. तुम्ही जर डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते.

3. फिश सप्लिमेंट




जर तुम्ही आहारात मासे खाऊ शकत नसाल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेऊ शकता. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या बुद्धीला चालना देण्याचे काम फिश सप्लिमेंट करु शकतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेतात.

4. कोकोओचा करा वापर

कोकोआचे करा सेवन – स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार

चॉकलेटमध्ये असलेले कोकोआदेखील तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्यासाठी कोकोआ चांगले आहे. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कोकोआ खा. कारण त्याचा तुम्हाला योग्य तो फायदा होऊ शकेल. हल्ली बाजारात कोकोरआची पावडर मिळते. ज्याचा उपयोग तुम्ही करु शकता.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार (
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक चांगले आयुर्वेदिक उपचार आहेत. जर तुम्हाला आर्युवेदिक उपचारपद्धती हव्या असतील तर तुम्ही हे आर्युवेदिक उपचारही करु शकता. जाणून घेऊया याच आर्युवेदिक उपचार पद्धती.

1. अश्वगंधा

अश्वगंधा वनस्पती – स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय

अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकीच स्मरणशक्तीवर होणारा अश्वगंधाचा परिणाम हा वाखाणण्यासारखा आहे. अश्वगंधाची मुळे औषधांप्रमाणे घेतल्याने तुम्हाला फायदे होतात. अभ्यासातूनही हे समोर आले आहे. तुमच्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम अश्वगंधा करते. 

2. ब्राम्ही

ब्राम्ही वनस्पती – स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय

अश्वगंधाप्रमाणे ब्राम्हीही तुमच्या मेंदूला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. अनेकदा मन शांत होण्यासाठी ब्राम्ही घेण्याचा सल्ला दिला जातो. अल्झायमर सारख्या आजारांपासून ब्राम्ही तुम्हाला दूर ठेवते. मेंदूला चालना देण्याचे काम ब्राम्ही करते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात ब्राम्हीचे सेवन करु शकता.

3. शंखपुष्पी

शंखपुष्पीचे फुल – स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय

आयुर्वेदात शंखपुष्पीचे अनेक फायदे सांगितले आहेत. बुद्धीसाठी शंखपुष्पी चांगले असल्याचे पुराणात सुद्धा म्हटले आहे. शंखपुष्पीच्या सेवनामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही शंखपुष्पीचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.

4. गोटू कोला

गोटू कोला वनस्पती – स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय

गोटू कोला अनेक बाबतीत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अगदी त्वचेच्या समस्येपासून ते सेक्सपर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. पण तुमच्या मेंदुला चालना देण्यासाठीही गोटू कोला चांगले आहे. गोटू कोला नावाची वनस्पती तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगली असून तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. एका प्रयोगादरम्यान गोटू कोलाच्या वापरामुळे चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहेत.

स्मरणशक्तीवर करतात विपरीत परिणम करणाऱ्या या गोष्टी टाळा
स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहारात असणे गरजेचे असते. अगदी तशाच काही गोष्टी तुम्ही आहारातून वगळणे गरजेचे असते. आहारात जर या गोष्टी असतील तर त्या तुमच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम करतात. आता अशा काही सवयी किंवा खाद्यपदार्थ पाहुया जे तुम्ही तुमच्या सवयींच्या यादीतून काढून टाकायला हवे.

1. मद्य सेवन

आरोग्यासाठी मद्य सेवन अजिबात चांगले नाही. मद्य सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असतीलच. पण तुमच्या मेंदूवरही मद्य सेवन विपरीत परिणाम करतात. त्यामुले त्याचे सेवन तुम्ही टाळले पाहिजे.

2. जंक फूडची सवय

सध्या सगळ्यांना जंक फूडची सवय लागली आहे. जंक फूडमुळे तुमचे आरोग्य खराब होते. यामध्ये वापरलेले तेल,मसाले हे तुम्हाला सुस्त करुन टाकतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला असलेली जंक फूडची सवय सोडा. कारण ती तुमच्यासाठी घातक ठरु शकते. जर तुमच्या लहान मुलांना अशी सवय लागली असेल तर त्यांची ही सवय तुम्ही लवकरात लवकर सोडा कारण लहान मुलांवर त्याचा त्रास लवकर दिसून येतो.

3. जास्त विचार करणे

काही जणांना खूप विचार करायची सवय असते. ही सवय तुम्हालाही असेल तर आताच खूप विचार करणे बंद करा. कारण सतत विचार करण्यामुळेही तुमच्या मेंदुवर ताण पडू शकतो. अति विचार केल्यामुळे तुमचे लक्ष कशातही लागत नाही. त्यामुळे शक्य असेल तर विचार करणे थांबवा.

4. गोळ्यांचे अतिरिक्त सेवन नको

काहींना अगदी क्षुल्लक कारणासाठी औषधांच्या गोळ्या घ्यायची सवय असते. गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाचा परिणामही तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. तुमच्या तब्येतीवर त्याचे विपरीत परिणाम होऊ लागल्यावर तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो.

5. आरोग्याच्या तक्रारीकडे करु नका दुर्लक्ष

तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा त्रास हमखास होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (
1- मेंदूच्या आरोग्यासाठी केळ्यांचे सेवन करणे चांगले आहे का ?
केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी तुम्ही केळ्यांचे सेवन केल्यास फारच उत्तम.

2. अभ्यासात मुलांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करायला हवे ?
मुलांच्या अभ्यासासंदर्भात पालकांच्या अनेकदा तक्रारी असतात की ते अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नाही. अशावेळी तुम्ही मुलांना अधिकाधिक चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. फोनपासून दूर ठेवत त्यांना मैदानी खेळ खेळांंमध्ये अधिक गुंतवून ठेवा. त्यांना वाचनाची आवड लावा. त्यांच्यासोबत असे खेळ खेळा जे त्यांना सतत प्रश्न निर्माण करण्यास उद्युत करतील.

3. तुमच्या खाण्याच्या सवयी तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतात का ?
तुमच्या आहारातील खाद्यपदार्थांचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमच्या जंक फूड किंवा असे काही पदार्थ असतील तर ते तुमच्या शारिरीक क्रिया मंदावू शकतात. त्यामुळे तुम्हाला आहारात योग्य पदार्थ घेता आले तर फारच उत्तम 

आता तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच विचारात घ्या.


उत्तर लिहिले · 26/8/2021
कर्म · 121765
0
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय:

  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास स्मरणशक्तीवर परिणाम होतो. (Sleep Foundation)
  • नियमित व्यायाम करा: नियमित योगा केल्याने स्मरणशक्ती सुधारते. (Harvard Health)
  • पौष्टिक आहार घ्या: आहारात हिरव्या भाज्या, फळे, आणि प्रथिने (proteins) असावीत.
  • ध्यान करा: रोज 10-15 मिनिटे ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. (Mindful.org)
  • स्मरणशक्तीचे खेळ खेळा: कोडी सोडवणे, शब्दकोडे (crossword) खेळणे, किंवा स्मृती चाचणी (memory test) असलेले खेळ खेळा.
  • नवीन गोष्टी शिका: नवीन भाषा शिकणे किंवा वाद्य वाजवणे यासारख्या गोष्टींमुळे मेंदूला चालना मिळते.

या उपायांमुळे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होईल.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?