3 उत्तरे
3
answers
बंगालची फाळणी कधी केली?
3
Answer link
बंगालची फाळणी -
ब्रिटिशपूर्व भारतात हिंदू मुस्लिम संस्कृती ह्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. मात्र ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली व त्यानंतर भारतीयांनी त्यांना अयशस्वी सशस्त्र विरोध केला. यातून भारतीय जनतेने ब्रिटिशविरोधी लढ्याकरिता संघटना स्थापन करून नवीन मार्ग सुरु केला.
अशारितीने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन 1885 साली होऊन भारतीय लढ्याला सुरवर झाली. प्रारंभी ब्रिटिश काँग्रेस बाबत अनुकूल होते मात्र काँग्रेसचा वाढत प्रभाव ब्रिटिश सत्तेला पसंत पडत नव्हता. यातूनच काँग्रेसला शाह देणे व भारतीय चळवळ डळमळीत करणे ब्रिटिश सत्तेला आवश्यक वाटू लागले. बंगाल प्रांतात राष्ट्रवादी भावना व अकावत्वाची भावना वाढीस लागलेली होती. अशा रीतीने बंगाल विभाजन करावयाचे व भारतीय जनतेत फूट पडायची असे दुहेरी हेतू या घटनेतून ब्रिटिश सत्तेने साध्य केले. वरपांगी पाहता बंगाल प्रांताचा सम्राज्यविस्तार हा एकट्या गव्हर्नर ला प्रशासन चालविण्यास प्रतिकूल असल्याचे मत ब्रिटिशांनी फळणीमागील।कारण म्हणून घोषित केले.
खरे पाहता भारतीयांच्या एकतेचा फूट पाडायची व राष्ट्रवादी भावना मोडून काढायची हाच या योजनेमागील हेतू होता हे मात्र सूर्यप्रकाशाईतके पारदर्शक होते.
महत्वपूर्ण घटना
----------------------
19 जुलै 1905 - बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
7 ऑगस्ट 1905 -स्वदेशी चळवळीला सुरवात झाली
15 ऑगस्ट 1906 - राष्ट्रीय शिक्षण परिषद स्थापन केले
----------------------------------------
1) बंगालचे पूर्व बंगाल व आसाम
2)पश्चिम बंगाल बिहार व ओरिसा असा दुसरा प्रांत तयार करण्यात आला.
–--------------------------------------------
स्वदेशी चळवळ
-----------------------
बंगालच्या फळणीविरोधी स्वदेशी तसेच वंगभंग आंदोलन या नावाने ओळखळे जात
स्वदेशी चळवळीचा मुख्य कार्यक्रम चतुःसूत्री होय.
स्वराज्य स्वदेशी व बहिष्कार हि त्रिसूत्री टिळकांनी महाराष्ट्रात यशस्वीपणे वापरली.
टिळकांच्या त्रिसूत्री मध्ये राष्ट्रीय शिक्षण हा चौथा कार्यक्रम स्वदेशी चळवळी काळात समाविष्ट करण्यात आला.
16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस सर्व बंगाली जनतेने शिक दिवस म्हणून साजरा केला.
सर्व बंगाली जनतेने गंगा नदीच्या किनारी एकमेकांना राख्या बांधल्या व एकात्मतेचे दर्शन घडविले.
सर्व जनतेने हा दिवस उपवास केला व बंगालची फाळणी रद्द होईपर्यंत चळवळ चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
बंगाली जनतेच्या ऐक्याचे प्रतीक कलकत्ता येथे टाऊन हाल बांधण्यात आला.
कलकत्ता येथे नॅशनल कॉलेज स्थापन केले व त्याचे प्रथम प्राचार्य अरविंद घोष नियुक्त करण्यात आले.
बंगालची फाळणी हि घडून गेलेली घटना आहे अशी टिप्पणी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो याने केली.
बंगाली जनता मात्र प्राण पणाने बंगाल फळणीविरोधी चळवळ चालवीत होते.
चळवळीच्या काळात स्वदेशी मालाचे दुकान पी. सि रॉय यांनी बंगाल केमिकल स्टोअर या नावाने चालविले.
स्वदेशी चळवळ फारच परिणामकारक ठरली. इंग्लंड मधील लँकेशयर व म्यांचेस्टर या ठिकाणचे कापड उत्पादन निम्मे कमी झाले.
बंगाल फाळणी रद्द
--------------------------
बंगाल मधील चळवळीचा परिणाम व इंग्लंड मधील बदलते राजकारण ब्रिटीश सरकारने बंगालची फाळणी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
12 डिसेंबर 1911 रोजी पंचम जॉर्ज याने बंगाल फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. या वेळी लॉर्ड हार्डिंग्स हा गव्हर्नर जनरल होता.
बंगाल फाळणी रद्द केली मात्र बंगालचे महत्व कमी करण्याचे उद्देशाने राजधानी बंगाल वरून दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली.
खेळण्याचे लॉर्ड कर्झनने ठरविले. सन १९०३ च्या प्रारंभास बंगालचा गवर्नर सर आंड्र्यू फ्रेझर याने कर्झनच्या आदेशाने फाळणीची योजना तयार केली. कर्झनने सर्वसाधारण अनुमती देवून योजना तयार केली. मे १९०५ मध्ये लंडनच्या standard या वर्तमानकाळात फाळणीस विलायत सरकारने मान्यता दिली हे प्रथम छापले.
बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले.
पूर्व बंगाल व आसामचा एकत्रित नकाशा
उत्पत्ति संपादन करा
बंगाल प्रांताचे क्षेत्रफळ ४८९५०० वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या ८ कोटी अधिक होती. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा होता. १८३६ मध्ये,अप्पर प्रांतांमध्ये एका लेफ्टनंट गव्हर्नरचे शासन स्थापित केले होते ते १८५४ मध्ये गव्हर्नर जनरल-इन-कौन्सिलने रद्द केले. या फाळणीमागे इंग्रजांची "फोडा आणि राज्य करा" ही दुष्ट निती होती.
बंगालची फाळणी (१९०५) बद्दल महत्त्वाचे मुद्धे संपादन करा
लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय कॉंग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
सन १९०५ ते १९२० नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात.
0
Answer link
बंगालची फाळणी ही ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये केली. त्यांनी प्रशासकीय सोयीचे कारण देत बंगाल प्रांताचे विभाजन केले, ज्यामुळे पूर्व बंगाल आणि आसाम हे मुस्लिमबहुल प्रांत बनले, तर पश्चिम बंगाल हिंदू-बहुल प्रांत म्हणून राहिला.
या फाळणीचा उद्देश बंगाली राष्ट्रवादाला कमजोर करणे हा होता, परंतु यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आणखी बळ मिळाले.
अधिक माहितीसाठी, आपण हे दुवे पाहू शकता: