त्वचा समस्या
आरोग्य
पावसाच्या पाण्याने दरवर्षी माझ्या पायाच्या बोटांना चिखल्या येतात? मला उपचार सुचवा?
2 उत्तरे
2
answers
पावसाच्या पाण्याने दरवर्षी माझ्या पायाच्या बोटांना चिखल्या येतात? मला उपचार सुचवा?
1
Answer link
चिखल्या हा आजार सहसा पावसाळयात शेतीत काम करणा-यांना होतो. याची सुरुवात पावलाच्या सुजेने होते (बहुधा दोन्ही पाय सुजतात). त्याचबरोबर खाज सुटणे, नंतर पुळया होणे व त्या फुटून जखमा तयार होणे या क्रमाने आजार वाढत जातो. या पुळया अर्थातच सूक्ष्मजंतूंमुळे होतात.
उपचार
उपचाराच्या काळात 8 ते15 दिवस पाय कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे.
यासाठी विश्रांती घ्यावी किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे. तोंडाने कोझाल व ऍस्पिरिनच्या गोळया द्याव्यात. जखमा असतील तर जंतुनाशक मलम किंवा लिंबाच्या पाल्याचा रस लावल्याने चिखल्या ब-या होतात.
प्रतिबंधक उपाय म्हणून 'गमबूट' म्हणजे उंच पायाचे बूट वापरणे चांगले; पण अनेकांच्या दृष्टीने हा उपाय खर्चीक वाटेल.
चिखल्या हा शब्द आणखी एक वेगळया आजारासाठी वापरला जातो. पायाच्या बेचक्यांमध्ये पांढरट स्राव सुटणारा बुरशीदोष होतो. हाही ओलेपणामुळे होतो. जेंशन व्हायोलेट लावल्याने ही तक्रार दूर होते.
0
Answer link
पावसाळ्यात तुमच्या पायाच्या बोटांना चिखल्या येत असतील, तर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
उपचार:
- पाय स्वच्छ ठेवा: पावसाळ्यात घरी आल्यावर पाय आणि बोटे Anti-fungal साबणाने स्वच्छ धुवा.
- कोरडे ठेवा: बोटांमधील भाग पूर्णपणे कोरडा करा. ओलावा राहिल्यास चिखल्या वाढू शकतात.
- Anti-fungal क्रीम: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार Clotrimazole किंवा Miconazole सारखे क्रीम लावा.
- घरगुती उपाय:
- हळद: हळदीमध्ये Anti-inflammatory आणि antiseptic गुणधर्म असतात. हळद आणि पाणी मिक्स करून पेस्ट लावा.
- लसूण: लसणामध्ये Anti-fungal गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट चिखल्या झालेल्या भागावर लावा.
- लिंबू: लिंबाच्या रसामध्ये Anti-bacterial गुणधर्म असतात. लिंबाचा रस लावल्याने आराम मिळतो.
- डॉक्टरांचा सल्ला: आराम न मिळाल्यास त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या.
Sources: