Topic icon

त्वचा समस्या

2
हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत तर यावर उपाय टि ट्रि ऑईल वापरा खाली दिलेली माहिती वाचा.

गजकर्ण झाल्याने असाल हैराण तर 'या' घरगुती उपायाचा करा वापर!



बदलत्या वातावरणात अनेकदा रिंगवर्म म्हणजेच गजकर्ण होण्याची समस्या होते. असं जास्त त्या लोकांमध्ये बघायला मिळतं, ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते काही लोकांना हिवाळ्यात अशाप्रकारची समस्या जास्त होते आणि अनेक लोकांमध्ये त्वचेसंबंधी समस्या होण्याला वुलन कपड्यांची अ‍ॅलर्जी हे असू शकतं. जर तुम्हाला नेहमी वातावरण बदलल्यावर अशी समस्या होत असेल तर यावर तुम्ही सहजपणे उपाय करू शकता.


गजकर्णपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय हा टी ट्री ऑइल आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे तेल त्वचेसाठी इतकं फायदेशीर आहे की, आता मोठ्या प्रमाणात स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये टी ट्री ऑइलचा उपयोग वाढला आहे. टी ट्री ऑइलने केवळ त्वचेचं सौंदर्यच वाढेल असं नाही तर याने गजकर्ण सारख्या त्वचेच्या समस्याही दूर होण्यास मदत होईल.





कसा कराल वापर?

जर तुम्हाला गजकर्णाची समस्या असेल तर कॉटनच्या मदतीने त्यावर टी ट्री ऑइल लावा. असं दोन ते तीन वेळा करा. सुरुवातीला हलकी जळजळ होऊ शकते. पण नंतर काही वेळाने जळजळ शांत होईल आणि खाजही कमी होईल. अशाप्रकारे ४ ते ५ दिवस टी ट्री ऑइलचा वापर कराल तर काही लवकरच तुमची त्वचेसंबंधी समस्या दूर होईल.


संवेदनशील त्वचेवर

जर तुमची त्वचा फार जास्त संवेदनशील असले तर तुमच्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही टी ट्री ऑइलचा थेट त्वचेवर वापर करू नका. त्याआधी टी ट्री ऑइलमध्ये समान प्रमाणात खोबऱ्याचं तेल मिश्रित करा. याने साइड इफेक्ट होणार नाही. तसेच संवेदनशील त्वचेवर याने ड्रायनेस आणि इतरही समस्या होणार नाहीत. 

(टिप : वरील लेखातील टिप्स या केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. हे उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. अशात तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या गोष्टी फॉलो कराव्यात.)








उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 53720
0
कारणं
उत्तर लिहिले · 6/12/2021
कर्म · 0
0
मला घामोळ्या झाल्या आहेत, यावर उपाय सांगा.
उत्तर लिहिले · 30/10/2021
कर्म · 0
0
मला नक्की कशावर उपाय सांगायचा आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणत्या समस्येवर उपाय हवा आहे?
उत्तर लिहिले · 26/9/2021
कर्म · 0
1
चिखल्या हा आजार सहसा पावसाळयात शेतीत काम करणा-यांना होतो. याची सुरुवात पावलाच्या सुजेने होते (बहुधा दोन्ही पाय सुजतात). त्याचबरोबर खाज सुटणे, नंतर पुळया होणे व त्या फुटून जखमा तयार होणे या क्रमाने आजार वाढत जातो. या पुळया अर्थातच सूक्ष्मजंतूंमुळे होतात.
उपचार
उपचाराच्या काळात 8 ते15 दिवस पाय कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे.

यासाठी विश्रांती घ्यावी किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे. तोंडाने कोझाल व ऍस्पिरिनच्या गोळया द्याव्यात. जखमा असतील तर जंतुनाशक मलम किंवा लिंबाच्या पाल्याचा रस लावल्याने चिखल्या ब-या होतात.

प्रतिबंधक उपाय म्हणून 'गमबूट' म्हणजे उंच पायाचे बूट वापरणे चांगले; पण अनेकांच्या दृष्टीने हा उपाय खर्चीक वाटेल.

चिखल्या हा शब्द आणखी एक वेगळया आजारासाठी वापरला जातो. पायाच्या बेचक्यांमध्ये पांढरट स्राव सुटणारा बुरशीदोष होतो. हाही ओलेपणामुळे होतो. जेंशन व्हायोलेट लावल्याने ही तक्रार दूर होते.
उत्तर लिहिले · 22/7/2021
कर्म · 121765
1
जर तुझे वय 18 च्या आत असेल तर काहीच करू नको कारण 18 वर्षांपर्यंत हे नॉर्मली होतच राहतं. Before 18 years it's remove automatically.
उत्तर लिहिले · 11/4/2021
कर्म · 360
0
लग्नानंतर चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • हार्मोनल बदल: लग्नानंतर अनेक महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यामुळे तेल उत्पादन वाढते आणि चेहऱ्यावर मुरूम येतात.
  • तणाव: लग्नानंतर नवीन जीवनशैली, जबाबदाऱ्या आणि बदलांमुळे तणाव येऊ शकतो. तणावामुळे कोर्टिसोल (cortisol) नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे मुरूम येऊ शकतात.
  • आहार: लग्नानंतर आहाराच्या सवयी बदलू शकतात. जास्त तेलकट, मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने मुरुमांची समस्या वाढू शकते.
  • त्वचेची काळजी न घेणे: लग्नानंतर त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास, जसे की नियमित साफ न करणे, मॉइश्चरायझ न करणे, यामुळे मुरूम येऊ शकतात.
  • सौंदर्य प्रसाधने: लग्नात वापरलेली सौंदर्य उत्पादने (makeup products) काहीवेळा त्वचेला सूट करत नाहीत आणि त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.
उपाय:
  • त्वचेची नियमित काळजी घ्या: दिवसातून दोन वेळा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा.
  • पौष्टिक आहार घ्या: फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी प्या.
  • तणाव कमी करा: योगा, ध्यान आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या: जास्त त्रास होत असल्यास त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1020