भूगोल
वनस्पतीशास्त्र
पर्यावरण
प्राणी आणि वनस्पती
वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींची व प्राण्यांची नावे काय आहेत?
2 उत्तरे
2
answers
वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींची व प्राण्यांची नावे काय आहेत?
2
Answer link
०१. वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.
०२. वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते. उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे
०३. वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण असते.
०४. सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
भौगोलिक वैशिष्ट्ये
– वाळूने व्यापलेला प्रदेश.
– वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
– हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
– वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी
– विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत)
– अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे
– दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ
– क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)
जैविक वैशिष्ट्ये
– अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक
– निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर ) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.
– सरडा व साप या सारखे सरपटणारे प्राणी.
– उंदीर व खार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.
– गिधाडे व गरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.
– काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.
– मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.
जगातील प्रमुख वाळवंटे
क्रम नाव – प्रकार – क्षेत्रफळ (किमी²) – स्थान
०१. अंटार्क्टिक वाळवंट – ध्रुवीय – १३,८२९,४३० – अंटार्क्टिका
०२. आर्क्टिक – ध्रुवीय – १३,७२६,९३७ अलास्का (अमेरिका ), कॅनडा, फिनलंड, ग्रीनलॅंड (डेन्मार्क ), आइसलंड , नॉर्वे, रशिया व स्वीडन
०३. सहारा – उष्ण कटिबंधीय – ९,१००,०००+ – अल्जिरिया , चाड , इजिप्त, इरिट्रिया, लिबिया, माली, मॉरिटानिया , मोरोक्को , नायजर, सुदान, ट्युनिसिया व पश्चिम सहारा
०४. अरबी वाळवंट – उष्ण कटिबंधीय – २,३३०,००० – इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान , कतार, सौदी अरेबिया , संयुक्त अरब अमिराती व येमेन
०५. गोबी वाळवंट – शीत कटिबंधीय १,३००,००० – चीन व मंगोलिया
०६. कालाहारी वाळवंट – उष्ण कटिबंधीय ९००,००० अँगोला , बोत्स्वाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका
०७. पांतागोनिया वाळवंट – शीत कटिबंधीय – ६७०,००० – आर्जेन्टिना व चिली
०८. भव्य व्हिक्टोरिया वाळवंट – उष्ण कटिबंधीय – ६४७,००० – ऑस्ट्रेलिया
०९. सीरियन वाळवंट – उष्ण कटिबंधीय – ५२०,००० – इराक, जॉर्डन व सिरिया
१०. Great Basin Desert – शीत कटिबंधीय – ४९२,००० – अमेरिका
0
Answer link
येथे वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या काही वनस्पती आणि प्राण्यांची यादी दिली आहे:
वनस्पती:
- खजूर (Phoenix dactylifera)
- कॅक्टस (Cactaceae)
- बाभूळ (Vachellia nilotica)
- खैर (Senegalia catechu)
- निवडुंग (Opuntia)
प्राणी:
- उंट (Camelus)
- कोल्हा (Vulpes)
- सरडे (Lacertilia)
- विंचू (Scorpiones)
- उंट पक्षी (Struthio camelus)