तह इतिहास

पुरंदरच्या तहात काय ठरले होते?

3 उत्तरे
3 answers

पुरंदरच्या तहात काय ठरले होते?

2
 .
पुरंदरचा तह
छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग १६५७ ते १६६५ पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. हा भाग १६३६ ला शहाजहान आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या तहात मुघलांकडे आला होता. तो परत मिळवणे हा मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीमागाचा प्रमुख हेतू होता. मिर्झाराजे जय‌सिंगाने शिवाजी महाराजांविरोधात कुशल रणनीती अवलंबली होती. ३ मार्च १६६५ ला मिर्झाराजे जय‌सिंग महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी सपाट भाग जिंकत किल्ल्यांची रसद थांबवण्याकडे लक्ष दिले. नंतर किल्ले घ्यायला सुरुवात केली. १२ आणि १३ जून १६६५ ला पुरंदरचा तह होऊन चार लाख होनचा मुलुख आणि २३ किल्ले शिवाजी महाराजांकडून घेण्यात आले. जयसिंग आणि औरंगजेब यांच्यातील पत्रव्यवहार ‘हप्त अंजुमन’मध्ये जयसिंग औरंगजेबाला असे सांगतो की, ‘तुझ्या मनात असलेला निजामशाही तळ कोकण मी शिवाजीकडून घेतला आहे आणि ते मुघल साम्राज्याला जोडला आहे. विशेष म्हणजे जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या विरोधात आपल्याकडे वळवून घेतलेल्या मराठा सरदारांची यादी यासंशोधनात समोर आली आहे. तहासंदर्भात ‌सविस्तर आकडेवारीही देण्यात आली आहे. यात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला एकही पैसा दिला नाही, उलट जयसिंगाकडूनच दोन लाख मिळवल्याचे हप्त अंजुमनमध्ये दिसते.
दरबारींचे मतपरिवर्तन
शिवाजी महाराज १२ मे १६६६ ला आग्र्यात पोहचले. दरबारातील प्रकारानंतर बादशहाचा वजीर जाफरखान, मोठी बहीण जहाँआरा बेगम, जाफरखानची बायको फरजाना बेगम आणि जसवंतसिंग राठोड यांनी शिवाजी महाराजांना मारून टाकावे अशी विनंती १५ मे १६६६ रोजी बादशहाकडे केली होती. पण ७ जून रोजी जसवंतसिंग राठोड वगळता इतरांनी ‌शिवाजी महाराजांना सोडून द्यावे, अशी विनंती केली होती.
शिवाजी महाराजांना मोठी प्रसिद्धी
आग्र्यात शिवाजी महाराजांना मोठी प्रसिद्धी मिळाली असल्याचे राजस्थानी रेकार्डवरून दिसते. शिवाजी महाराजांविषयी यापूर्वीच बऱ्याच अख्यायिका पसरल्या होत्या. शिवाजी महाराज अदृश्य होवू शकतात, ते हवेत उडू शकतात आणि जमिनीपासून दहा पंधारा हात उंच उडी मारू शकतात, कोठेही प्रकट होऊ शकतात, अशा चर्चा अगदी इंग्रज कागदपत्रांतही उपलब्ध आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज जरी नजरकैदेत असले तरी औरंगजेबाच्या मनातही वरील अफवांमुळे भीती निर्माण झाली होती आणि त्याने आपल्याभवतीचे ‌संरक्षण वाढवले होते. त्यातून शिवाजी महाराजांना संपवण्याचे नियोजन बादशहाने केले होते. त्यासाठी १८ ऑगस्ट ही तारीखही ठरवली होती. पण शिवाजी महाराज पेटाऱ्यातून १७ ऑगस्टच्या रात्रीच आग्र्यातून निसटले.
२० नोव्हेंबरला राजगडावर दाखल
शिवाजी महाराज २० नोव्हेंबर १६६६ राजगडवर दाखल झाले असे मानणाऱ्या इतिहासतज्ज्ञांचा मुद्दा फाळके यांनीही उचलून धरला आहे. आग्रा, मथुरा, फतेहपूर सिक्री, कानपूर, प्रयाग, वाराणसी, अंबिकापूर, अमरकंटक, रतनपूर, बिलासपूर, रायपूर, चंद्रपूर, बिदर, गुलबर्गा, निरेचा दक्षिण काठ आणि राजगड या मार्गावरून शिवाजी महाराज महाराष्ट्रात परतले. अमरकंटकचा उल्लेख करताना फाळके असे सांगतात की तेथे कबीर पंथियांचे दोन मठ आणि नर्मदेचा उगम असल्याने शिवाजी महाराज जर बैराग्यांच्या तांड्यातून आले असतील ते अमरकंटकला गेले असले पाहिजेत, असा युक्तीवाद केला आहे.


उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121765
0
पुरंदरच्या तहात काय ठरले होते? पुरंदरच्या तहात खालील गोष्टी ठरल्या होत्या: * शिवाजी महाराजांनी त्यांचे २३ किल्ले मुघलांना द्यावे. * शिवाजी महाराजांनी स्वतः औरंगजेबाला भेटायला जावे. * शिवाजी महाराजांनी मुघलांना मदत करावी. * शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना मुघल दरबारात मनसबदारी देण्यात यावी.
उत्तर लिहिले · 31/7/2021
कर्म · 0
0

पुरंदरचा तह १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झाला. या तहात खालील गोष्टी ठरल्या:

  • शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना द्यावे.
  • शिवाजी महाराजांनी स्वतः औरंगजेबाला भेटायला जावे.
  • शंभाजी महाराजांना मुघल दरबारात मनसबदार म्हणून पाठवावे.
  • शिवाजी महाराजांनी मुघलांना गरज पडल्यास लष्करी मदत करावी.

या तहामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली, परंतु त्याचे दूरगामी परिणाम झाले.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

जय सिया आणि शिवाजी महाराजांच्या 1665 मध्ये कोणता तह झाला?
पुरंदरचा तह कोणाकोणात झाला?
पुरंदरचा तह कोणकोणते झाला?
पुरंदरचा तह कोणा-कोणामध्ये झाला?
सालबाईच्या तहातील कलमे स्पष्ट करा?
सालबाईचा तह केव्हा व कोणा कोणा मध्ये झाला?