Topic icon

तह

0

जय सिया आणि शिवाजी महाराजांच्या दरम्यान 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला.

तहातील काही महत्वाचे मुद्दे:

  • शिवाजी महाराजांनी मुघलांना २३ किल्ले आणि त्यांच्या आसपासचा प्रदेश दिला.
  • शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना मुघल मनसबदार म्हणून नियुक्त केले.
  • शिवाजी महाराजांनी गरज पडल्यास मुघलांना सैनिकी मदत करण्याचे आश्वासन दिले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220
2
 
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजी महाराजांचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भाण्डणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी भोसले राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पुरंदरचा तह या विजयानंतर शिवाजी महाराज पश्चिम किनाऱ्यावरील सुरतच्या मुख्य बंदर शहरात दाखल झाले. शहराच्या मोगल राज्यपालांनी शिवाजी महाराजांना बोलवण्यासाठी एक दूत पाठविला, पण शिवाजी महाराजांनी दूताला अटक केली. औरंगजेबाकडून जयसिंग यांच्या नेतृत्वात प्रचंड सैन्याच्या रूपात सूड उगवला. पराभव अपरिहार्य आहे हे समजून शिवाजी महाराजांनी १६६५ च्या जूनमध्ये पुरंदर करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अटींनुसार शिवाजी महाराज शरण जाण्यास तयार झाले.


पुरन्दराचा तह पूर्ण होण्यापूर्वी जयसिंह राजे व शिवाजी महाराजांची भेट (१२ जून १६६५).

शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवन्तसिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता.सत्तर हजारांची सेना घेऊन शाहिस्तेखान गेला व तीन बोटे गमावून माघारी आला. दिल्लीसम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली.शिवाजी महाराजांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई सम्पुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झाराजा जयसिंह ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झाराजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरु करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीला खिण्डार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.

यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,


१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरन्दर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भण्डारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसन्तगड
२२. विसापूर
२३. सोनगड

पुरन्दरचा वेढा व तह संपादन करा
सुरतेवर छापा: या विजयांनंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशहाच्या सेना महाराष्ट्रात धुमाकुळ घालत होत्या, तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला.कुठे पुणे व कुठे सुरत? सुरत म्हणजे त्या वेळीची मुघली मुलाखतील मोठी व्यापारपेठ. खुप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयाची लुट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशीदी यांना हात लावला नाही.

पुरन्दरच्या तहाचे परिणाम 
या तहानुसार राजांनी आपले तेवीस किल्ले व चार लाख होनांचे क्षेत्र बादशहाला दिले.
राजांच्या ताब्यात बारा किल्ले आणि लाख होनांचे क्षेत्र राहिले.
मिर्झाराजांनी चाळीस लाखांची खण्डणी राजांवर लादली.वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले.
सम्भाजीराजांना बादशहाकडून पाच हजाराची मनसब मिळाली.
तहातील कलमांची पुर्तता होईपर्यंत सम्भाजीराजे मिर्झाराजाकडे ओलीस म्हणून राहीले.

उत्तर लिहिले · 26/8/2021
कर्म · 121765
0
. !
उत्तर लिहिले · 8/8/2021
कर्म · 0
0
छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या तहात मोगलांना २३ किल्ले आणि चार लाख होनांचा मुलुख दिला.
उत्तर लिहिले · 16/7/2021
कर्म · 3065
2
 .
पुरंदरचा तह
छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग १६५७ ते १६६५ पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. हा भाग १६३६ ला शहाजहान आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या तहात मुघलांकडे आला होता. तो परत मिळवणे हा मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीमागाचा प्रमुख हेतू होता. मिर्झाराजे जय‌सिंगाने शिवाजी महाराजांविरोधात कुशल रणनीती अवलंबली होती. ३ मार्च १६६५ ला मिर्झाराजे जय‌सिंग महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांनी सपाट भाग जिंकत किल्ल्यांची रसद थांबवण्याकडे लक्ष दिले. नंतर किल्ले घ्यायला सुरुवात केली. १२ आणि १३ जून १६६५ ला पुरंदरचा तह होऊन चार लाख होनचा मुलुख आणि २३ किल्ले शिवाजी महाराजांकडून घेण्यात आले. जयसिंग आणि औरंगजेब यांच्यातील पत्रव्यवहार ‘हप्त अंजुमन’मध्ये जयसिंग औरंगजेबाला असे सांगतो की, ‘तुझ्या मनात असलेला निजामशाही तळ कोकण मी शिवाजीकडून घेतला आहे आणि ते मुघल साम्राज्याला जोडला आहे. विशेष म्हणजे जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या विरोधात आपल्याकडे वळवून घेतलेल्या मराठा सरदारांची यादी यासंशोधनात समोर आली आहे. तहासंदर्भात ‌सविस्तर आकडेवारीही देण्यात आली आहे. यात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला एकही पैसा दिला नाही, उलट जयसिंगाकडूनच दोन लाख मिळवल्याचे हप्त अंजुमनमध्ये दिसते.
दरबारींचे मतपरिवर्तन
शिवाजी महाराज १२ मे १६६६ ला आग्र्यात पोहचले. दरबारातील प्रकारानंतर बादशहाचा वजीर जाफरखान, मोठी बहीण जहाँआरा बेगम, जाफरखानची बायको फरजाना बेगम आणि जसवंतसिंग राठोड यांनी शिवाजी महाराजांना मारून टाकावे अशी विनंती १५ मे १६६६ रोजी बादशहाकडे केली होती. पण ७ जून रोजी जसवंतसिंग राठोड वगळता इतरांनी ‌शिवाजी महाराजांना सोडून द्यावे, अशी विनंती केली होती.
शिवाजी महाराजांना मोठी प्रसिद्धी
आग्र्यात शिवाजी महाराजांना मोठी प्रसिद्धी मिळाली असल्याचे राजस्थानी रेकार्डवरून दिसते. शिवाजी महाराजांविषयी यापूर्वीच बऱ्याच अख्यायिका पसरल्या होत्या. शिवाजी महाराज अदृश्य होवू शकतात, ते हवेत उडू शकतात आणि जमिनीपासून दहा पंधारा हात उंच उडी मारू शकतात, कोठेही प्रकट होऊ शकतात, अशा चर्चा अगदी इंग्रज कागदपत्रांतही उपलब्ध आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज जरी नजरकैदेत असले तरी औरंगजेबाच्या मनातही वरील अफवांमुळे भीती निर्माण झाली होती आणि त्याने आपल्याभवतीचे ‌संरक्षण वाढवले होते. त्यातून शिवाजी महाराजांना संपवण्याचे नियोजन बादशहाने केले होते. त्यासाठी १८ ऑगस्ट ही तारीखही ठरवली होती. पण शिवाजी महाराज पेटाऱ्यातून १७ ऑगस्टच्या रात्रीच आग्र्यातून निसटले.
२० नोव्हेंबरला राजगडावर दाखल
शिवाजी महाराज २० नोव्हेंबर १६६६ राजगडवर दाखल झाले असे मानणाऱ्या इतिहासतज्ज्ञांचा मुद्दा फाळके यांनीही उचलून धरला आहे. आग्रा, मथुरा, फतेहपूर सिक्री, कानपूर, प्रयाग, वाराणसी, अंबिकापूर, अमरकंटक, रतनपूर, बिलासपूर, रायपूर, चंद्रपूर, बिदर, गुलबर्गा, निरेचा दक्षिण काठ आणि राजगड या मार्गावरून शिवाजी महाराज महाराष्ट्रात परतले. अमरकंटकचा उल्लेख करताना फाळके असे सांगतात की तेथे कबीर पंथियांचे दोन मठ आणि नर्मदेचा उगम असल्याने शिवाजी महाराज जर बैराग्यांच्या तांड्यातून आले असतील ते अमरकंटकला गेले असले पाहिजेत, असा युक्तीवाद केला आहे.


उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121765
0
सालबाईच्या तहातील कलमे स्पष्ट करा
उत्तर लिहिले · 7/4/2023
कर्म · 0
1
सालबाईचा तह हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली. या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट देण्यात आले.
उत्तर लिहिले · 18/8/2021
कर्म · 283320