अध्यात्म कर्म

भोग हे भोगावेच लागतात काय?

2 उत्तरे
2 answers

भोग हे भोगावेच लागतात काय?

8
*🚩II"जय जय रामकृष्ण हरि"II🚩*
  • *माऊली*🌹👏
  • *भोग हे फक्त भोगूनच संपतात.*
  • *मग आजवर जेवढं पाप केलं आहे,*
  • *त्याचे जे भोग भोगायला येणार आहेत,*
  • *ते भोगावेच लागणार आहेत.*
  • *मग ते गत जन्मीचे असोत,*
  • *वा जन्मोन्जन्मीचे,*
  • *भोगणे हे फळ संचिताचे।*
  • *भोग पुढे ढकलू शकता,*
  • *पण संपूर्ण नष्ट करू शकत नाहीत.*
  • *हे मात्र नक्की...*
  • *जेंव्हा आपण भगवंताची भक्ती करतो,*
  • *तेंव्हा भगवंत काय करतो.*
  • *तर आधी तुमचे जे भोग आहेत ना..*
  • *ते तुमच्या मार्गात आणतो,*
  • *आधी तुमचे भोग संपवतो,*
  • *आणि मग जवळ करतो.*
  • *म्हणून आयुष्यात कितीही,*
  • *कसल्याही अडचणी,संकट,*
  • *दुःखं आली,*
  • *तरी कधीच भगवंताला ती सोडव,*
  • *असं म्हणू नका...*
  • *फक्त हात जोडा...*
  • *आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची,*
  • *ताकद दे इतकेच सांगा.*
  • *तो भक्त वत्सल आहे,*
  • *सोडव म्हणालात तर तो ते कर्म पुढे ढकलेलंही,*
  • *पण पुन्हा केंव्हा तरी ते भोगावेच लागतात,*
  • *एवढं मात्र नक्की.*
  • *भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत,*
  • *डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही,*
  • *तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो.*
  • *एकदा का ती गाठ मुळासकट निघाली,*
  • *की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही,*
  • *तसे कर्म पूर्ण भोगून झाले की,*
  • *पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही.*
  • *जर भोग आले, दुःख आलीत,*
  • *संकट आली की खात्रीने समजा,*
  • *की आपली भक्ती उदयास येते आहे,*
  • *आणी लवकरच कर्मात्रीतून,*
  • *मुक्त होणार आहोत.*
  • *मग अशा वेळेस अधिकाधिक भक्ती करा,*
  • *नामस्मरण करा...*
  • *निश्चितच लवकरच,*
  • *चांगले दिवस येतील...!!*
*हरि ‌हरि*🚩🌹👏
उत्तर लिहिले · 27/6/2021
कर्म · 44255
0

भोग हे भोगावेच लागतात का? हा एक कठीण प्रश्न आहे, कारण त्याचे उत्तर अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची विचारसरणी, कर्म आणि नशीब यावर.

या प्रश्नाची काही संभाव्य उत्तरे खालीलप्रमाणे दिली आहेत:
  1. कर्म सिद्धांत: कर्म सिद्धांतानुसार, आपण जे काही करतो, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. चांगले कर्म चांगले फळ देतात, तर वाईट कर्म वाईट फळ देतात. त्यामुळे, जर तुम्ही वाईट कर्म केले असतील, तर त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील.
  2. नशिबाचा भाग: काही लोकांचा असा विश्वास आहे की आपले नशीब आधीच ठरलेले असते आणि आपल्याला ते भोगावेच लागते.
  3. परिस्थिती: काहीवेळा आपण काही विशिष्ट परिस्थितीत अडकतो आणि त्यामुळे आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात, ज्या आपल्या हातात नसतात.
  4. choice (निवड): आपल्या कर्मानेfuture (भविष्य) बदलू शकतो.

अखेरीस, भोग भोगायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि चांगले कर्म करून भोगांपासून मुक्ती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

अभ्यास आणि वैराग्य यांचा उपयोग कशासाठी होतो?
खालीलपैकी कोणती चित्तवृत्ती नाही?
सर्व संतांच्या प्रार्थनांमधून करुणा तुमच्या शब्दात लिहा?
अंतिम संस्कार पुढील जीवन आणि परिस्थिती कशी निर्धारित करते?
कर्माचा नियम काय?
जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म?
सतत नामस्मरण करावे का?