2 उत्तरे
2
answers
बँक शाखा कोड काय असतो?
3
Answer link
IFSC Code

what is IFSC code:
आयएफएससी कोड म्हणजे काय –
IFSC Code म्हणजे काय भारतीय आर्थिक प्रणाली कोड(Indian Financial System Code) तसंच बँकेच्या ब्रँचची ओळख म्हणजे IFSC. प्रत्येक बँकेच्या शाखेचा विशिष्ट कोड असतो. हा ११ कॅरेक्टर कोड असतो. हा कोड अल्फानुमेरिक (alphanumeric) म्हणजेच अक्षरे आणि अंक मिळून तयार केला जातो. प्रत्येक बँकेचा आपापला IFSC Code असतो. जो रिझर्व्ह बँकेने दिलेला असतो. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करताना वित्तसंस्था व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा सत्यता पडताळणीसाठी आयएफएससी कोड सक्तीचा आहे. आर्थिक देवाणघेवाणीची प्रक्रिया जलद व्हावी याकरिता बँका आणि वित्तसंस्था प्रक्रिया सोपी आणि अॅटोमेटेड करण्यासाठी काही कोड वापरले जातात. IFSC कोड हा त्यापैकीच एक आहे.
IFSC Code कसा असतो –
आयएफएससी कोड हा ११ कॅरेक्टरचा असतो. सुरुवातीचे जे ४ अक्षर असतात. ते बँकचे नाव असते, पाचवे हे नेहमी 0 (शून्य) असते. हा एक नियंत्रण क्रमांक आहे, जो सर्व आयएफएससी कोडमध्ये समान असतो. तर शेवटच्या ६ नंबर हे बँकेचे स्थळ (location) दर्शवत असतो. त्यामुळे बँक कुठली आणि ब्रँच कोणती हे समजते. उदा. State Bank of India pune, Maharashtra. IFSC Code- SBIN0000333. आयएफएससी कोड माहीत करायचा असल्यास तो आपल्या बँक ब्रँचमध्ये मिळतो. तसेच IFSC कोड आपल्या पासबुक आणि चेक बुकवर देखील असतो.
आयएफएससी कोडची आवश्यकता –
आपण कुणाला एखादी मोठी रक्कम पाठवत असाल, तर आपल्याला या कोडची आवश्यकता असेल. समजा तुम्हाला एखाद्याला २ किंवा ३ लाख पाठवायचे असेल, तर आपल्याला पाठवणारी व्यक्तीची शाखा आयएफएससी कोड विचारेल. म्हणूनच आपल्या शाखेचा हा कोड काय आहे. हे आपल्याला त्वरित माहित असणे आवश्यक आहे. आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT) सारखे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एखाद्यास पैसे पाठवायचे किंवा पैसे घायचे असेल तर आपल्याला हा कोड माहित असणे आवश्यक असतो. जर तुम्ही नेट बँकिंगचे ग्राहक असाल तर जेव्हा आयएफएससी कोडने नवीन लाभार्थी( Beneficiary) जोडण्यासाठी आवश्यक असतो. त्या वेळेस पण या कोडची आवश्यकता असते.
0
Answer link
बँक शाखेचा कोड (Bank Branch Code) हा एक युनिक आयडेंटिफायर असतो जो प्रत्येक बँक शाखेला दिला जातो. हा कोड वापरून बँकेच्या शाखेची माहिती मिळवणे सोपे होते.
बँक शाखेच्या कोडचे फायदे:
- शUniqueIdentifierentification: हा कोड बँकेच्या शाखेला विशिष्ट ओळख देतो.
- Transaction सुलभता: ऑनलाइन व्यवहार आणि इतर बँकिंग कामांसाठी हा कोड आवश्यक असतो.
- Data अचूकता: बँकेच्या डेटाबेसमध्ये माहिती अचूकपणे साठवण्यासाठी मदत करतो.