2 उत्तरे
2
answers
डिजिटल मार्केटिंग (विपणन) म्हणजे नक्की काय?
0
Answer link
आजच्या डिजिटल मार्केटिंग च्या युगात इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे च ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन पेयमेन्ट, बिलं पेयमेन्ट, इत्यादी सेवा चे सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत.


डिजिटल मार्केटिंग (विपणन) म्हणजे नक्की काय? व त्याचे प्रकार
डिजीटल मार्केटिंग म्हणजे काय? तर एखाद्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ला ऑनलाईन किंवा इंटरनेट च्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी ज्या मार्केटिंग प्रणालीचा वापर केला जातो त्यालाच खऱ्या अर्थाने डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.
एखाद्या वस्तूला किंवा सेवेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रमोट करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.
डिजिटल मार्केटिंग सुद्धा इंटरनेट च्याच माध्यमातून केल्या जात असल्यामुळे व्यवसायासाठी नवीन ग्राहक शोधणे अगदी सोपे होत आहे.
तसेच डिजिटल मार्केटिंग मध्ये वस्तू व सेवांची ऑनलाईन मार्केटिंग करून त्या वस्तूला कमीत कमी वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो. म्हणूनच आपल्याला प्रॉडक्ट आणि सर्विसेस ला ग्राहकापर्यंत पोहोचवणे सोयीचे झाल्यामुळे आपल्या प्रॉडक्ट ची चांगल्या प्रकारे विक्री होऊ शकते.
पूर्वीच्या काळी जे मार्केटिंग केल्या जात होती, त्या मार्केटिंग पेक्षा आधुनिक विपणन प्रणाली हि खूप लोकप्रिय आणि यशस्वी माध्यम मानले जात आहे.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार
>> डिजिटल मार्केटिंग संपूर्ण माहिती साठी मराठी स्पिरिट ब्लॉग ला भेट द्या.
0
Answer link
डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) म्हणजे इंटरनेट, मोबाइल ॲप्स, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करणे होय.
डिजिटल मार्केटिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO): वेबसाइटला सर्च इंजिनच्या परिणामांमध्ये उच्च स्थान मिळवून देणे.
- सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात करणे आणि लोकांना जोडणे.
- ईमेल मार्केटिंग: ईमेलच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांना आकर्षित करणे.
- कंटेंट मार्केटिंग: लोकांना उपयुक्त आणि मनोरंजक माहिती देणे, ज्यामुळे ते तुमच्याकडे आकर्षित होतील.
- पेपर-पर-क्लिक (PPC) जाहिरात: जाहिरातींवर क्लिक केल्यावर पैसे देणे.
डिजिटल मार्केटिंग पारंपरिक मार्केटिंगपेक्षा अधिक प्रभावी आहे, कारण यामुळे तुम्ही विशिष्टTargeted दर्शकांना लक्ष्य करू शकता आणि तुमच्या जाहिरातीच्या परिणामांचे विश्लेषण करू शकता.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स: