Topic icon

डिजिटल मार्केटिंग

7



डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? 
डिजिटल मार्केटिंग मराठी मधे २ शब्द आहेत.पहिलं डिजिटल म्हणजे इंटरनेट,कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दूसरा मार्केटिंग म्हणजेच प्रचार.आता तुम्हाला याचा अर्थ थोडा स्पष्ट झाला असेल.

हो, बरोबर डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट,कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वर प्रचार मोहीम राभवणे.

विकिपीडियाच्या मते, जर आपण आपल्या सेवेचे किंवा कोणताही उत्पादनाची मार्केटिंग इंटरनेट सारख्या डिजिटल technology चा वापर करून विक्रीसाठी करत असू,तर त्याला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

ऑनलाईन मार्केटींग करण्याचे बरेच मार्ग आहेत जे काळानुसार वाढत आहेत. offline मार्केटींग आणि ऑनलाइन मार्केटिंग मध्ये बरेच अंतर आहे.

ऑनलाइन मार्केटिंगचा उपयोग करून आपण आपल्याला हव्या असलेल्या लोकं (Target Audience) पर्यंत आपली सेवा व उत्पादनचा प्रचार करू शकतो. आपले उत्पादन योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा डिजिटल मार्केटिंग हा एक वेगवान मार्ग आहे.

मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि या केलेल्या खर्चाच्या दुप्पट त्यांना त्यांच्या बिझनेस मध्ये फायदा देखील होतो.

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हल्ली लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवतात. इंटरनेट वापरणारी व्यक्ती दररोज इंटरनेटवर ३ तास घालवते. म्हणूनच इंटरनेट ही सर्वात मोठी मार्केटींगसाठी जागा बनली आहे.

डिजिटल मार्केटींगचे महत्व काय आहे ?
कोणत्याही कंपनीसाठी मार्केटिंग (Digital Marketing Marathi) किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे.मार्केटिंग साठी कंपन्या आपले स्वतंत्र बजेट तयार करतात.ऑफलाइन मार्केटिंग करणे खूप महाग आहे.

या उलट ऑनलाइन मार्केटिंग हे स्वस्त आहे आणि त्याचा फायदा देखील हा जास्त आहे. तर चला जाणून घेऊयात डिजिटल मार्केटींगचे महत्व .

डिजिटल मार्केटींग का महत्वाचे आहे

आपल्या सेवा व उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी हा एक सरळ,सोपा आणि वेगवान मार्ग आहे.
ऑनलाइन मार्केटिंग हे ऑफलाइन मार्केटिंगपेक्षा स्वस्त आहे.
डिजिटल मार्केटींग आपल्याला चांगला परतावा देतो.
हे आपले उत्पादन आणि सेवा योग्य लोकंकडे पोहचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
डिजिटल मार्केटींगमध्ये आपल्याला आपल्या सेवा आणि उत्पादचा प्रचार करण्यासाठी विविध मार्ग मिळतात.
डिजिटल मार्केटींगमुळे आपल्या कंपनीचे ब्रॅंड मूल्य (Value) वाढते.
डिजिटल मार्केटींगचा मदतीने आपण आपल्या सेवेचे आणि उत्पादनाचे प्रचार हे जागतिक स्तरावर करू शकतो.
आपण आपल्या उत्पादनाचे डिजिटल मार्केटिंग करून आपण ते ऑनलाइन विकू देखील शकतो.
डिजिटल मार्केटींग सुरू कसे करावे
ब्लॉगिंग (Blogging)
तुम्ही Blogging बद्दल ऐकले आहे का? नक्कीच तुम्ही ऐकलं असेल, कारण आजकाल प्रत्येकजण ब्लॉगिंगबद्दल बोलतो. आणि ते का नाही बोलणार?

ब्लॉगवर पोस्ट लिहिण्याची आणि ती विनामूल्य ऑनलाइन प्रकाशित करण्याची संकल्पना गेल्या दशकभरात खूप लोकप्रिय झाली आहे.अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही Blog लिहू शकता.

ब्लॉग सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. Blogging तुम्हाला स्वतःला सर्जनशीलपणे व्यक्त करण्याची, वाचकांकडून feedback मिळवण्याची आणि इतर गोष्टींबरोबरच affiliate marketing द्वारे पैसे कमविण्याची संधी देते.

Passive income मिळवण्याचा ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे.तेव्हा विचार कसला करताय ? आजच आपल्या आवडत्या विषयावर ब्लॉग सुरू करण्याचा निश्चय करा. आपला ब्लॉग वाढवा व त्याद्वारे विविध मार्गाने पैसे कमवा.

ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला होस्टिंग लागेल त्यासाठी Hostinger हा उत्तम पर्याय आहे. आपली ही website देखील Hostinger वर hosted आहे.

Hostinger निवडा आणि तुमची वेबसाइट फक्त ₹149/mo मध्ये होस्ट करा.

Search Engine Optimization (SEO) – सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन
Google हे एक सर्च इंजिन आहे. जर आपल्याला आपल्या वेबसाइट वर किंवा ब्लॉग वर गूगल द्वारे जास्तीत जास्त ट्रॅफिक,विजिटर्स हवे असेल,तर आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) याचा ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

हेच कारण आहे की बऱ्याच कंपन्या त्यांच्या वेबसाइटच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वर हजारो ,लाखो रुपये खर्च करतात.

जर आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) तज्ञ असाल तर तुम्हाला खूप चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते.

Youtube Channel – यूट्यूब चॅनेल
गूगल नंतर ज्यांचा नंबर लागतो ते म्हणजे Youtube. हो यूट्यूब वर आजच्या काळात गूगल नंतर सर्वात जास्त traffic आहे.

आज प्रत्यक व्यक्ति त्याला हवी असलेली कोणतीही माहिती तो गूगल किंवा यूट्यूब वर शोधतो.म्हणूनच यूट्यूब चे पण महत्व आता वाढले आहे.

यूट्यूब हा डिजिटल मार्केटींग चा एक असा पर्याय आहे जिथे तुम्ही तुमच्या सेवेचा किंवा उत्पादनचा प्रचार हा विडियो द्वारे करू शकता.

तुम्ही पाहिलं असेलच ,हल्ली बऱ्याच कंपन्या आपल्या product चा प्रचार करण्यासाठी मोठ मोठ्या यूट्यूबरसला product review करण्यासाठी देतात आणि त्यांना त्याचे पैसे सुद्धा दिले जातात.

जर तुम्ही विडियो बनवू शकता,यूट्यूब चॅनल सुरू करू शकता,तर तुम्ही देखील यूट्यूब वापरुन डिजिटल मार्केटींग सुरू करू शकता. यूट्यूब चॅनल सुरू करणे हे विनामूल्य आहे.

Social Media – सोशल मीडिया
Digital Marketing करण्याचा हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे.बर्‍याच कंपन्या त्यांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात.

Facebook, Twitter, Instagram वगैरे सोशल मीडियावर बर्‍याच कंपन्यांच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतीलच.

Google Adwords – गूगल अ‍ॅडवर्ड्स
आपण नेहमी इंटरनेट वर जाहिराती बगत असतो.बऱ्याच लोकांना कल्पना नसेल की ह्या जाहिराती येतात कुठून ? तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ह्या जाहिराती आपल्याला गूगल adwords द्वारे दाखवल्या जातात.

गूगल अ‍ॅडवर्ड्सच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या उत्पादनाचा प्रचार करू शकता. ही एक सशुल्क सेवा आहे ज्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात.

Google adwords च्या मदतीने आपण आपल्या उत्पादनास आपल्या ग्राहकां पर्यंत पोहोचवू शकतो.

आपण गूगल अ‍ॅडवर्ड्सद्वारे बर्‍याच प्रकारच्या जाहिराती चालवू शकता.जसे की

Display जाहिरात
Text जाहिरात
Image जाहिरात
जीआयएफ (GIF) जाहिरात
Text & Image जाहिरात
Match Content जाहिरात
Video जाहिरात
Pop-up जाहिरात
Sponsored सर्च जाहिरात
Affiliate Marketing – अफिलिएट मार्केटिंग
हे commission बेस्ड मार्केटिंग आहे.Online shopping आणि Product selling कंपन्या असे अफिलिएट कार्यक्रम चालवतात.

याच्या अंतर्गत आपण त्या वेबसाइटचे कोणतेही उत्पादन विकू शकतो.नंतर मग आपण विकलेल्या उत्पादनावर आपल्याला कमिशन दिले जातात.

हा डिजिटल मार्केटिंगचा स्मार्ट मार्ग आहे. याचा मध्ये वेबसाइटचा प्रचार होतो सोबत उत्पादन देखील विकले जातात.Affiliate मार्केटिंगमध्ये उत्पादन विकल्यानंतरच कमिशन मिळते.

Apps Marketing – अ‍ॅप्स मार्केटिंग
आपल्याला Google playstore मध्ये सर्व मोठ्या वेबसाइट्सचे apps पहायला मिळतील.आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि बर्‍याच लोकांना अ‍ॅप शॉपिंग, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन बुकिंग, न्यूज आणि सोशल मीडियासाठी apps चा वापर करायला आवडतो.

हे लक्षात घेऊनच कंपनी अ‍ॅप्स बनवते व त्या द्वारे देखील डिजिटल मार्केटिंग मराठी व इतर भाषेत करते.

Email Marketing – ईमेल मार्केटिंग
कोणत्याही कंपनीला हे Email मार्केटिंग करणे खूप महत्वाचे आहे.याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी देत असलेली नवीन ऑफर आणि सवलत आपण आपल्या ग्राहकांना थेट ईमेलद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो.आणि ग्राहकांकडून अभिप्राय देखील मिळवू शकतो.

डिजिटल मार्केटींगच्या इतरही अनेक पद्धती आहेत.परंतु आपल्याला अशी पद्धत निवडायची आहे जिथून आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक,विजिटर्स मिळतील. जेणेकरून ते आपले प्रोडक्टस पाहतील व त्यांची जास्त विक्री होईल. वरील सांगितल्या मार्गाने तुम्ही जास्तीत जास्त ट्रॅफिक मिळवू शकता.
.



डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
वस्तू आणि सेवांचे मार्केटिंग जेव्हा इंटरनेट,कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वर केली जाते त्याला डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग असे म्हणतात.

डिजिटल मार्केटींगचा फायदा काय ?
कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांकडे प्रचार करता येणे हा डिजिटल मार्केटींगचा सर्वात मोठा फायदा आहे.

डिजिटल मार्केटींगचे प्रकार कोणते ?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग , यूट्यूब मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, पे पर क्लिक (PPC) मार्केटिंग , एप्स मार्केटिंग.

माझ्या कंपनीला डिजिटल मार्केटींगचा फायदा होईल का ?
होय, नक्कीच फायदा होईल.डिजिटल मार्केटींगचा उपयोग हा आजच्या डिजिटल काळात केलाच पाहिजे.

डिजिटल मार्केटींग मधे करियर ?
आजच्या या डिजिटल युगात ,डिजिटल मार्केटींग मधे करियर करायला बऱ्याच सुवर्ण संधि आहेत. तसेच या क्षेत्रातील तज्ञ लोकांना पगार खूप चांगला व इच्छित मिळतो.


उत्तर लिहिले · 22/6/2023
कर्म · 53710
0

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) करणारे अनेक व्यावसायिक आणि कंपन्या आहेत. तुमच्या व्यवसायासाठी योग्य व्यक्ती शोधण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • ॲप (App) आणि वेबसाईट (Website): आजकाल अनेक ॲप आणि वेबसाईट आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल (Digital Marketing Professional) शोधू शकता. उदा. Justdial, LinkedIn.
  • संदर्भ (Reference): तुमच्या मित्र आणि सहकारी यांच्याकडून माहिती घ्या. त्यांच्या ओळखीतील डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांची माहिती मिळाल्यास संपर्क साधा.
  • सोशल मीडिया (Social Media): सोशल मीडियावर तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी (Digital Marketing Agency) किंवा फ्रीलांसर (Freelancer) शोधू शकता.
  • गुगल (Google): Google वर 'डिजिटल मार्केटिंग एजन्सी'[Digital Marketing Agency] किंवा 'डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट'[Digital Marketing Expert] असे सर्च (Search) करून तुम्ही माहिती मिळवू शकता.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे:

  • कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.
  • ठरलेल्याtarget audience पर्यंत पोहोचता येते.
  • मार्केटिंगच्या performance चा मागोवा घेता येतो.

टीप: डिजिटल मार्केटिंगची निवड करताना, त्या एजन्सीचा अनुभव, त्यांचे पूर्वीचे काम आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता तपासा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1820
0
आजच्या डिजिटल मार्केटिंग च्या युगात इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळे च ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन पेयमेन्ट, बिलं पेयमेन्ट, इत्यादी सेवा चे सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत.

       

डिजिटल मार्केटिंग (विपणन) म्हणजे नक्की काय? व त्याचे प्रकार 

डिजीटल मार्केटिंग म्हणजे काय? तर एखाद्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ला ऑनलाईन किंवा इंटरनेट च्या माध्यमातून प्रमोट करण्यासाठी ज्या मार्केटिंग प्रणालीचा वापर केला जातो त्यालाच खऱ्या अर्थाने डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

एखाद्या वस्तूला किंवा सेवेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रमोट करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.

डिजिटल मार्केटिंग सुद्धा इंटरनेट च्याच माध्यमातून केल्या जात असल्यामुळे व्यवसायासाठी नवीन ग्राहक शोधणे अगदी सोपे होत आहे. 

तसेच डिजिटल मार्केटिंग मध्ये वस्तू व सेवांची ऑनलाईन मार्केटिंग करून त्या वस्तूला कमीत कमी वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतो. म्हणूनच आपल्याला प्रॉडक्ट आणि सर्विसेस ला ग्राहकापर्यंत पोहोचवणे सोयीचे झाल्यामुळे आपल्या प्रॉडक्ट ची चांगल्या प्रकारे विक्री होऊ शकते.

पूर्वीच्या काळी जे मार्केटिंग केल्या जात होती, त्या मार्केटिंग पेक्षा आधुनिक विपणन प्रणाली हि खूप लोकप्रिय आणि यशस्वी माध्यम मानले जात आहे.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार

  • सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशन
  • सोशल मीडिया मार्केटिंग
  • इ-मेल मार्केटिंग
  • अफिलिएट मार्केटिंग
  • पे पर क्लिक मार्केटिंग
  • गूगल ऍडवर्ड
  • युट्युब मार्केटिंग
  • मोबाईल मार्केटिंग  
उत्तर लिहिले · 12/4/2021
कर्म · 2195
0

सेफ शॉप ही एक भारतीय मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) कंपनी आहे. जी विविध प्रकारची उत्पादनेDirect selling ( थेट विक्री ) करते. येथे सेफ शॉप (डिजिटल मार्केटिंग) बद्दल काही माहिती आहे:

कंपनी प्रोफाइल:

  • सेफ शॉपची स्थापना 2001 मध्ये झाली.
  • कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे.
  • सेफ शॉप विविध उत्पादने जसे की कपडे, घरगुती वस्तू, आरोग्य आणि सौंदर्य उत्पादने आणि शैक्षणिक साहित्य विकते.

व्यवसाय मॉडेल:

  • सेफ शॉप डायरेक्ट सेलिंग (थेट विक्री) मॉडेलवर कार्य करते, जिथे स्वतंत्र वितरक थेट ग्राहकांना उत्पादने विकतात.
  • वितरक सदस्यांना भरती करून आणि त्यांच्या विक्रीवर कमिशन मिळवून त्यांचे स्वतःचे नेटवर्क तयार करू शकतात.
  • सेफ शॉप बायनरी compensation plan ( भरपाई योजना ) वापरते, जी वितरकांच्या टीमच्या कामगिरीवर आधारित कमिशन देते.

उत्पादने:

  • सेफ शॉप विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करते, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
  • वस्त्र आणि उपकरणे: formal आणि casual कपड्यांचा समावेश आहे.
  • घरातील वस्तू: kitchenware ( स्वयंपाकघरातील भांडी ), bedsheets ( बेडशीट ) आणि अन्य home furnishing ( घराला सुशोभित करणाऱ्या वस्तू ) यांचा समावेश आहे.
  • आरोग्य आणि सौंदर्य उत्पादने: wellness products ( आरोग्यदायी उत्पादने ), personal care items ( वैयक्तिक काळजी उत्पादने ) आणि cosmetics ( सौंदर्य प्रसाधने ).
  • शैक्षणिक उत्पादने: पुस्तके आणि शैक्षणिक साधनांचा यात समावेश आहे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये सेफ शॉप:

  • सेफ शॉप आपले प्रोडक्ट आणि संधी Promote ( जाहिरात ) करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर करते.
  • Website ( संकेतस्थळ ): कंपनीकडे एक website आहे जिथे उत्पादने List ( सूचीबद्ध ) केली जातात आणि वितरक माहिती मिळवू शकतात.
  • Social Media ( सामाजिक माध्यमे ): वितरक आणि कंपनी social media platform ( सामाजिक माध्यमे ) वर Brand awareness ( ब्रांड जागरूकता ) आणि Lead generation ( लीड जनरेशन ) साठी updates ( अपडेट्स ) आणि contents ( सामग्री ) post ( पोस्ट ) करतात.
  • Online Meetings ( ऑनलाइन बैठका ): कंपनी training ( प्रशिक्षण ) आणि meetings ( बैठका ) घेण्यासाठी online meetings ( ऑनलाइन बैठका ) घेते.

टीप:

  • MLM कंपन्यांबद्दल काही समज आणि वाद आहेत.
  • काही MLM कंपन्या पिरामिड योजनांसारख्या असू शकतात, जिथे भरतीवर जास्त लक्ष दिले जाते आणि Product Selling ( उत्पादन विक्री ) कडे दुर्लक्ष केले जाते.
  • सेफ शॉपमध्ये सामील होण्यापूर्वी, कंपनी आणि तिच्या compensation plan ( भरपाई योजने ) बद्दल सखोल संशोधन करणे महत्त्वाचे आहे.

सेफ शॉप एक मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनी आहे जी विविध उत्पादने थेट ग्राहकांना विकते. कंपनी digital marketing ( डिजिटल मार्केटिंग ) द्वारे आपल्या वितरकांना आणि उत्पादनांना प्रोत्साहन देते. MLM मध्ये सहभागी होण्यापूर्वी नेहमी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1820
4
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करणे आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढवणे. या कोर्समध्ये बऱ्याच इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या संबंधित गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. मुख्यत्वे सोशल मीडिया मधून जाहिरात कशी करावी याच्या ट्रिक्स शिकवल्या जातात. प्लेसमेंट साठी तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट बेस कंपनीत डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून लागू शकता.
उत्तर लिहिले · 1/12/2019
कर्म · 34255
2
👍 फ्री डिजिटल व्हिजिटिंग कार्ड फक्त 10 लोकांकरिता 👍

डिजिटल व्हिजिटिंग कार्ड सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे, हा कार्ड इंटरनेट वर असतो, ज्याची लिंक तुम्हाला दिली जाते, ती लिंक तुम्ही कोणाला पाठवली आणि त्यांनी त्यावर क्लिक केले असता,
तुमच्या व्यवसायाची तसेच तुम्हाला संपर्क करण्याची संपूर्ण माहिती त्यानां दिसते.

आमच्या कंपनीने आता पर्यंत 2000 च्या वर लोकांना हे कार्ड बनवून दिलेले आहे.
आमच्या सध्याच्या ऑफर मध्ये आम्ही हे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड फक्त ₹199 मध्ये बनवून देत आहोत.

इतकेच नव्हे तर त्यासोबत व्हिजिटिंग कार्ड ची अँड्रॉइड सुद्धा पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे.

उत्तर वरील 10 व्यावसायिकांना हे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आम्ही अगदी मोफत देणार आहोत, तरी इच्छुकांनी आमच्या ऑफिशियल व्हाट्सएप नंबर वर व्हाट्सएप किंवा कॉल करावा.

व्हाट्सएप लिंक - WhatsApp
कॉल - 7887707719
उत्तर लिहिले · 16/11/2019
कर्म · 8870
0

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत. आजकाल, जवळपास सर्वच व्यवसाय ऑनलाइन झाले आहेत, त्यामुळे डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्सची मागणी वाढली आहे.

डिजिटल मार्केटिंगमधील काही लोकप्रिय करिअर पर्याय:

  • सोशल मीडिया मार्केटर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन) कंपनीच्या ब्रँडची प्रतिमा तयार करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
  • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) स्पेशलिस्ट: वेबसाइटला सर्च इंजिनमध्ये (गुगल, बिंग) उच्च स्थान मिळवून देण्यासाठी काम करणे.
  • कंटेंट मार्केटर: ब्लॉग पोस्ट, लेख, व्हिडिओ आणि इन्फोग्राफिक्स यांसारखे आकर्षक कंटेंट तयार करणे.
  • ईमेल मार्केटर: ईमेलच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधणे आणि त्यांना उत्पादने/सेवांची माहिती देणे.
  • पेड मीडिया स्पेशलिस्ट: ऑनलाइन जाहिराती (गुगल ऍड्स, सोशल मीडिया ऍड्स) व्यवस्थापित करणे आणि त्यांची प्रभावीता वाढवणे.
  • डिजिटल मार्केटिंग मॅनेजर: डिजिटल मार्केटिंगच्या सर्व कामांचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये:

  • मार्केटिंगची मूलभूत माहिती
  • सोशल मीडिया आणि सर्च इंजिनचे ज्ञान
  • कंटेंट तयार करण्याची क्षमता
  • डेटा विश्लेषण कौशल्ये
  • नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञानाची माहिती

तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये कोर्स करून किंवा ऑनलाइनresources चा वापर करून हे कौशल्ये आत्मसात करू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1820