डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञान

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व समजावून सांगा.

2 उत्तरे
2 answers

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व समजावून सांगा.

7



डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? 
डिजिटल मार्केटिंग मराठी मधे २ शब्द आहेत.पहिलं डिजिटल म्हणजे इंटरनेट,कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दूसरा मार्केटिंग म्हणजेच प्रचार.आता तुम्हाला याचा अर्थ थोडा स्पष्ट झाला असेल.

हो, बरोबर डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट,कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वर प्रचार मोहीम राभवणे.

विकिपीडियाच्या मते, जर आपण आपल्या सेवेचे किंवा कोणताही उत्पादनाची मार्केटिंग इंटरनेट सारख्या डिजिटल technology चा वापर करून विक्रीसाठी करत असू,तर त्याला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

ऑनलाईन मार्केटींग करण्याचे बरेच मार्ग आहेत जे काळानुसार वाढत आहेत. offline मार्केटींग आणि ऑनलाइन मार्केटिंग मध्ये बरेच अंतर आहे.

ऑनलाइन मार्केटिंगचा उपयोग करून आपण आपल्याला हव्या असलेल्या लोकं (Target Audience) पर्यंत आपली सेवा व उत्पादनचा प्रचार करू शकतो. आपले उत्पादन योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा डिजिटल मार्केटिंग हा एक वेगवान मार्ग आहे.

मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि या केलेल्या खर्चाच्या दुप्पट त्यांना त्यांच्या बिझनेस मध्ये फायदा देखील होतो.

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हल्ली लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवतात. इंटरनेट वापरणारी व्यक्ती दररोज इंटरनेटवर ३ तास घालवते. म्हणूनच इंटरनेट ही सर्वात मोठी मार्केटींगसाठी जागा बनली आहे.

डिजिटल मार्केटींगचे महत्व काय आहे ?
कोणत्याही कंपनीसाठी मार्केटिंग (Digital Marketing Marathi) किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे.मार्केटिंग साठी कंपन्या आपले स्वतंत्र बजेट तयार करतात.ऑफलाइन मार्केटिंग करणे खूप महाग आहे.

या उलट ऑनलाइन मार्केटिंग हे स्वस्त आहे आणि त्याचा फायदा देखील हा जास्त आहे. तर चला जाणून घेऊयात डिजिटल मार्केटींगचे महत्व .

डिजिटल मार्केटींग का महत्वाचे आहे

आपल्या सेवा व उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी हा एक सरळ,सोपा आणि वेगवान मार्ग आहे.
ऑनलाइन मार्केटिंग हे ऑफलाइन मार्केटिंगपेक्षा स्वस्त आहे.
डिजिटल मार्केटींग आपल्याला चांगला परतावा देतो.
हे आपले उत्पादन आणि सेवा योग्य लोकंकडे पोहचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
डिजिटल मार्केटींगमध्ये आपल्याला आपल्या सेवा आणि उत्पादचा प्रचार करण्यासाठी विविध मार्ग मिळतात.
डिजिटल मार्केटींगमुळे आपल्या कंपनीचे ब्रॅंड मूल्य (Value) वाढते.
डिजिटल मार्केटींगचा मदतीने आपण आपल्या सेवेचे आणि उत्पादनाचे प्रचार हे जागतिक स्तरावर करू शकतो.
आपण आपल्या उत्पादनाचे डिजिटल मार्केटिंग करून आपण ते ऑनलाइन विकू देखील शकतो.
डिजिटल मार्केटींग सुरू कसे करावे
ब्लॉगिंग (Blogging)
तुम्ही Blogging बद्दल ऐकले आहे का? नक्कीच तुम्ही ऐकलं असेल, कारण आजकाल प्रत्येकजण ब्लॉगिंगबद्दल बोलतो. आणि ते का नाही बोलणार?

ब्लॉगवर पोस्ट लिहिण्याची आणि ती विनामूल्य ऑनलाइन प्रकाशित करण्याची संकल्पना गेल्या दशकभरात खूप लोकप्रिय झाली आहे.अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही Blog लिहू शकता.

ब्लॉग सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. Blogging तुम्हाला स्वतःला सर्जनशीलपणे व्यक्त करण्याची, वाचकांकडून feedback मिळवण्याची आणि इतर गोष्टींबरोबरच affiliate marketing द्वारे पैसे कमविण्याची संधी देते.

Passive income मिळवण्याचा ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे.तेव्हा विचार कसला करताय ? आजच आपल्या आवडत्या विषयावर ब्लॉग सुरू करण्याचा निश्चय करा. आपला ब्लॉग वाढवा व त्याद्वारे विविध मार्गाने पैसे कमवा.

ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला होस्टिंग लागेल त्यासाठी Hostinger हा उत्तम पर्याय आहे. आपली ही website देखील Hostinger वर hosted आहे.

Hostinger निवडा आणि तुमची वेबसाइट फक्त ₹149/mo मध्ये होस्ट करा.

Search Engine Optimization (SEO) – सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन
Google हे एक सर्च इंजिन आहे. जर आपल्याला आपल्या वेबसाइट वर किंवा ब्लॉग वर गूगल द्वारे जास्तीत जास्त ट्रॅफिक,विजिटर्स हवे असेल,तर आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) याचा ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

हेच कारण आहे की बऱ्याच कंपन्या त्यांच्या वेबसाइटच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वर हजारो ,लाखो रुपये खर्च करतात.

जर आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) तज्ञ असाल तर तुम्हाला खूप चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते.

Youtube Channel – यूट्यूब चॅनेल
गूगल नंतर ज्यांचा नंबर लागतो ते म्हणजे Youtube. हो यूट्यूब वर आजच्या काळात गूगल नंतर सर्वात जास्त traffic आहे.

आज प्रत्यक व्यक्ति त्याला हवी असलेली कोणतीही माहिती तो गूगल किंवा यूट्यूब वर शोधतो.म्हणूनच यूट्यूब चे पण महत्व आता वाढले आहे.

यूट्यूब हा डिजिटल मार्केटींग चा एक असा पर्याय आहे जिथे तुम्ही तुमच्या सेवेचा किंवा उत्पादनचा प्रचार हा विडियो द्वारे करू शकता.

तुम्ही पाहिलं असेलच ,हल्ली बऱ्याच कंपन्या आपल्या product चा प्रचार करण्यासाठी मोठ मोठ्या यूट्यूबरसला product review करण्यासाठी देतात आणि त्यांना त्याचे पैसे सुद्धा दिले जातात.

जर तुम्ही विडियो बनवू शकता,यूट्यूब चॅनल सुरू करू शकता,तर तुम्ही देखील यूट्यूब वापरुन डिजिटल मार्केटींग सुरू करू शकता. यूट्यूब चॅनल सुरू करणे हे विनामूल्य आहे.

Social Media – सोशल मीडिया
Digital Marketing करण्याचा हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे.बर्‍याच कंपन्या त्यांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात.

Facebook, Twitter, Instagram वगैरे सोशल मीडियावर बर्‍याच कंपन्यांच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतीलच.

Google Adwords – गूगल अ‍ॅडवर्ड्स
आपण नेहमी इंटरनेट वर जाहिराती बगत असतो.बऱ्याच लोकांना कल्पना नसेल की ह्या जाहिराती येतात कुठून ? तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ह्या जाहिराती आपल्याला गूगल adwords द्वारे दाखवल्या जातात.

गूगल अ‍ॅडवर्ड्सच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या उत्पादनाचा प्रचार करू शकता. ही एक सशुल्क सेवा आहे ज्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात.

Google adwords च्या मदतीने आपण आपल्या उत्पादनास आपल्या ग्राहकां पर्यंत पोहोचवू शकतो.

आपण गूगल अ‍ॅडवर्ड्सद्वारे बर्‍याच प्रकारच्या जाहिराती चालवू शकता.जसे की

Display जाहिरात
Text जाहिरात
Image जाहिरात
जीआयएफ (GIF) जाहिरात
Text & Image जाहिरात
Match Content जाहिरात
Video जाहिरात
Pop-up जाहिरात
Sponsored सर्च जाहिरात
Affiliate Marketing – अफिलिएट मार्केटिंग
हे commission बेस्ड मार्केटिंग आहे.Online shopping आणि Product selling कंपन्या असे अफिलिएट कार्यक्रम चालवतात.

याच्या अंतर्गत आपण त्या वेबसाइटचे कोणतेही उत्पादन विकू शकतो.नंतर मग आपण विकलेल्या उत्पादनावर आपल्याला कमिशन दिले जातात.

हा डिजिटल मार्केटिंगचा स्मार्ट मार्ग आहे. याचा मध्ये वेबसाइटचा प्रचार होतो सोबत उत्पादन देखील विकले जातात.Affiliate मार्केटिंगमध्ये उत्पादन विकल्यानंतरच कमिशन मिळते.

Apps Marketing – अ‍ॅप्स मार्केटिंग
आपल्याला Google playstore मध्ये सर्व मोठ्या वेबसाइट्सचे apps पहायला मिळतील.आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि बर्‍याच लोकांना अ‍ॅप शॉपिंग, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन बुकिंग, न्यूज आणि सोशल मीडियासाठी apps चा वापर करायला आवडतो.

हे लक्षात घेऊनच कंपनी अ‍ॅप्स बनवते व त्या द्वारे देखील डिजिटल मार्केटिंग मराठी व इतर भाषेत करते.

Email Marketing – ईमेल मार्केटिंग
कोणत्याही कंपनीला हे Email मार्केटिंग करणे खूप महत्वाचे आहे.याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी देत असलेली नवीन ऑफर आणि सवलत आपण आपल्या ग्राहकांना थेट ईमेलद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो.आणि ग्राहकांकडून अभिप्राय देखील मिळवू शकतो.

डिजिटल मार्केटींगच्या इतरही अनेक पद्धती आहेत.परंतु आपल्याला अशी पद्धत निवडायची आहे जिथून आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक,विजिटर्स मिळतील. जेणेकरून ते आपले प्रोडक्टस पाहतील व त्यांची जास्त विक्री होईल. वरील सांगितल्या मार्गाने तुम्ही जास्तीत जास्त ट्रॅफिक मिळवू शकता.
.



डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
वस्तू आणि सेवांचे मार्केटिंग जेव्हा इंटरनेट,कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वर केली जाते त्याला डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग असे म्हणतात.

डिजिटल मार्केटींगचा फायदा काय ?
कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांकडे प्रचार करता येणे हा डिजिटल मार्केटींगचा सर्वात मोठा फायदा आहे.

डिजिटल मार्केटींगचे प्रकार कोणते ?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग , यूट्यूब मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, पे पर क्लिक (PPC) मार्केटिंग , एप्स मार्केटिंग.

माझ्या कंपनीला डिजिटल मार्केटींगचा फायदा होईल का ?
होय, नक्कीच फायदा होईल.डिजिटल मार्केटींगचा उपयोग हा आजच्या डिजिटल काळात केलाच पाहिजे.

डिजिटल मार्केटींग मधे करियर ?
आजच्या या डिजिटल युगात ,डिजिटल मार्केटींग मधे करियर करायला बऱ्याच सुवर्ण संधि आहेत. तसेच या क्षेत्रातील तज्ञ लोकांना पगार खूप चांगला व इच्छित मिळतो.


उत्तर लिहिले · 22/6/2023
कर्म · 53710
0

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट, मोबाइल उपकरणे, सोशल मीडिया, सर्च इंजिन आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करणे होय. हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे आहे, कारण ते ऑनलाइन चॅनेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करते.

डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:

  1. Targeted Audience (लक्ष्यित प्रेक्षक): डिजिटल मार्केटिंगमुळे विशिष्टtarget audienceपर्यंत पोहोचता येते.location, age, interests आधारावर जाहिरात दाखवता येतात.
  2. Measurable Results (परिणाम मोजता येणे): डिजिटल मार्केटिंगमध्ये जाहिरातींचे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी क्लिक केले आणि किती लोकांनी खरेदी केली हे सर्व डेटा analysis करता येते.
  3. Cost-Effective (कमी खर्चिक): पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी खर्चिक आहे.small businessसुद्धा कमी बजेटमध्ये प्रभावी जाहिरात करू शकतात.
  4. Engagement (Engagement वाढवते): सोशल मीडिया आणि इतर digital माध्यमांमुळे ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे customer relationship सुधारते.
  5. Brand Building (Brand तयार करणे): Digital marketing strategy वापरून, company आपल्या brandची image तयार करू शकते आणि लोकांमध्ये awareness निर्माण करू शकते.

डिजिटल मार्केटिंगचे विविध प्रकार:

  • Search Engine Optimization (SEO)
  • Social Media Marketing (SMM)
  • Email Marketing
  • Content Marketing
  • Pay-Per-Click Advertising (PPC)
  • Affiliate Marketing

अधिक माहितीसाठी:

Accuracy: 95

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820

Related Questions

1bet ॲप वापरू शकतो का आपण?
विमानाची लांबी व रुंदी सांगा?
बी. फार्मसी साठी बेस्ट ॲप कोणते?
बजाज कंपनीच्या १८ वॅटच्या एलईडी बल्बची किंमत किती आहे?
इलेक्ट्रिक तारांवर लाईट लावताना वायरवर काजळी न येण्याकरिता काय करावे?
सी महासेतू कार्य प्रणाली काय आहे?
पाणबुडीमधून पाण्याच्या वरचा भाग बघण्यासाठी कोणत्या प्रकारची टेलिस्कोप वापरली जाते?