औषधे आणि आरोग्य शिक्षण मनोरंजन भाषा मानवी मेंदू आरोग्य

भाषा शिकण्यासाठी आपला मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवू शकतो?

2 उत्तरे
2 answers

भाषा शिकण्यासाठी आपला मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवू शकतो?

1
आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो.म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो. तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते.त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो. मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात.हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात.या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात. माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल. बुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं.
    मातृभाषा शिकत असताना मुलं एकूण दीड मेगाबाईटची माहिती आपल्या मेंदूत ग्रहण करतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या भाषेला खर्‍या अर्थाने जाणण्यासाठी बाल्यावस्थेपासून युवावस्थेपर्यंतचा काळ जातो. या काळात भाषेची समज विकसित होण्यासाठी एकूण 1.25 कोटी बिटस् डाटा मेंदूत साठवला जातो. याचा अर्थ भाषेवर पकड घेण्याच्या काळात मुलं दर मिनिटाला दोन बिटस् माहिती ग्रहण करतात._*
╔══╗ 
║██║ _💫ⓂⒶⒽⒾⓉⒾ_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_* 𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘_
____________________________
एखादी भाषा शिकण्यासाठी प्रत्येक मुलाच्या मेंदूत इतकी माहिती साठवली जाते की जर तिला बायनरी कोडमध्ये रूपांतरीत केले तर ती 1.5 मेगाबाईटइतकी होते. याबाबत दीर्घकाळ संशोधन करण्यात आले व त्याची माहिती आता रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील यूसी बर्कले विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. सकृतदर्शनी असे दिसते की माणसाला आपली मातृभाषा शिकण्यात कोणतीही मेहनत करावी लागत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. लहान मुलं अतिशय उत्तम विद्यार्थी असतात जे रोज 1000 बिटस्ची माहिती गोळा करतात. ते शब्दांचे मोठे भांडारच स्मरणात ठेवतात. भाषा शिकण्यात व्याकरणापेक्षा शब्दांचे अर्थ जाणून घेणे हा मनुष्याचा नैसर्गिक गुण असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.
____________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
_*‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ‼*_
______________________________
0

भाषेच्या शिक्षणासाठी मानवी मेंदूची साठवण क्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते, त्यामुळे निश्चित आकडेवारी देणे कठीण आहे. काही संशोधनानुसार, मानवी मेंदू सुमारे 2.5 पेटाबाईट्स (petabytes) डेटा साठवू शकतो.

पेटाबाईट म्हणजे काय? पेटाबाईट हे माहिती मा measure् measureरण्याचे एकक आहे. १ पेटाबाईट म्हणजे १०२4 टेराबाईट्स (terabytes) आणि १ टेराबाईट म्हणजे १०२४ गिगाबाईट्स (gigabytes). याचा अर्थ असा की मानवी मेंदूमध्ये खूप जास्त माहिती साठवण्याची क्षमता आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
माणसाच्या मेंदूचे वजन किती असते?
मानवाच्या मेंदूचे वजन किती?
मानवी मेंदूबद्दल ‘ही’ ११ आश्चर्यकारक आणि मनोरंजक तथ्ये माहीत आहेत का?
मानवी मेंदूचे वजन किती असते?
मानवी मेंदूची आणखी वेगळी वैशिष्ट्ये काय आहेत?
मानवी मेंदू किती वयापर्यंत पूर्ण क्षमतेने, जलद गतीने काम करू शकतो?