Topic icon

मानवी मेंदू

0

उत्तर: आजच्या मानवाच्या मेंदूचे सरासरी वजन सुमारे 1.2 ते 1.5 किलोग्राम (2.6 ते 3.3 पाउंड) असते.

उत्तर लिहिले · 2/3/2025
कर्म · 980
1
एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मेंदूचे वजन ३ पौंड असते. म्हणजेच साधारणपणे १३०० ते १४०० ग्रॅम इतके असते.
उत्तर लिहिले · 16/10/2022
कर्म · 7460
0
एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मेंदूचे वजन ३ पौंड असते. म्हणजेच साधारणपणे १३०० ते १४०० ग्रॅम इतके असते.
उत्तर लिहिले · 16/10/2022
कर्म · 7460
4

मानवी मेंदूबद्दल ‘ही’ 11 आश्चर्यकारक आणि मनोरंजक तथ्ये माहित आहेत?

 : असे म्हटले जाते की, मानवी मेंदू ही या जगातील सर्वात रहस्यमय गोष्ट आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी आपले गुंतागुंतीचे मन समजून घेण्यासाठी बरेच संशोधन केले आहे. ज्यामुळे आपल्या मेंदूबद्दल नवीन गोष्टी माहिती होत राहतात. चला तर मग, जाणून घेऊया रहस्यमय गुंतागुंतीच्या मेंदूच्या काही मनोरंजक तथ्यांविषयी:

1. तुम्हाला माहित आहे का की एक लहान एलईडी बल्ब सुद्धा आपल्या मेंदूने पेटवू शकतो? कारण आपल्या मेंदूद्वारे सुमारे 12 ते 25 वॅट वीज निर्माण करता येते.

2. आपल्या मेंदूमध्ये सुमारे 100 अब्ज न्यूरॉन्स आहेत. म्हणजेच आकाशगंगेमध्ये जितके तारे आहेत तितकेच!

3. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपला मेंदू देखील संकुचित होऊ शकतो. जर आपण सुमारे 90 मिनिटे घामेघूम झालो तर आपल्याला काही मानसिक आजार उद्भवू शकतो.

4. मानवी मेंदू रासायनिक अभिक्रियेनुसार कार्य करतो आणि आपल्या मेंदूत प्रत्येक क्षणी एक लाखापेक्षा जास्त रासायनिक प्रतिक्रिया असतात.

5. जर एखादी व्यक्ती झोपू शकत नसताना झोपेची गोळी घेते, तर प्रत्यक्षात तो झोपत नाही पण गोळीच्या प्रभावामुळे कोमासारख्या अवस्थेत जातो.

6. जरी अनेक शास्त्रज्ञांनी मानवी मेंदूच्या साठवण क्षमतेवर आपली मते मांडली असलीत तरी सरासरी, आपल्या मेंदूची साठवण क्षमता 1 टेराबाईट ते 2.5 पेटाबाइट्स पर्यंत असते.

7. आपला लहान मेंदू संपूर्ण शरीराच्या फक्त 2% आहे, परंतु आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो संपूर्ण शरीराच्या 20% रक्त आणि ऑक्सिजनचा वापर करतो.

8. तुम्हाला माहित आहे का की जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले किंवा नाकारले, तर आपल्या मेंदूला असे वाटते की आपल्या शरीराला दुखापत झाली आहे.

9. मानवी मेंदू एखाद्या वस्तूचे चित्र एका सेकंदाच्या 16 व्या भागापर्यंत टिकवून ठेवतो, तर आपल्या पापण्या मिटण्याची वेळ एका सेकंदाच्या 16 व्या भागापेक्षा कमी असते.

10. आपला मेंदू ताशी 268 मैल इतक्या वेगाने माहिती पुरवतो. शिवाय, ही माहिती मेंदूपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पोहोचते, कारण न्यूरॉन्स वेगळ्या पद्धतीने निर्माण होतात.

11. मानवी मेंदूचा 73% भाग पाण्याने बनलेला आहे. परंतु आपल्या आठवणी, लक्ष आणि इतर संज्ञानात्मक कौशल्यांवर केवळ 2% निर्जलीकरण होते.
उत्तर लिहिले · 18/10/2021
कर्म · 121765
1
आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो.म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो. तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते.त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो. मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात.हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात.या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात. माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल. बुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं.
    मातृभाषा शिकत असताना मुलं एकूण दीड मेगाबाईटची माहिती आपल्या मेंदूत ग्रहण करतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. एखाद्या भाषेला खर्‍या अर्थाने जाणण्यासाठी बाल्यावस्थेपासून युवावस्थेपर्यंतचा काळ जातो. या काळात भाषेची समज विकसित होण्यासाठी एकूण 1.25 कोटी बिटस् डाटा मेंदूत साठवला जातो. याचा अर्थ भाषेवर पकड घेण्याच्या काळात मुलं दर मिनिटाला दोन बिटस् माहिती ग्रहण करतात._*
╔══╗ 
║██║ _💫ⓂⒶⒽⒾⓉⒾ_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_* 𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘_
____________________________
एखादी भाषा शिकण्यासाठी प्रत्येक मुलाच्या मेंदूत इतकी माहिती साठवली जाते की जर तिला बायनरी कोडमध्ये रूपांतरीत केले तर ती 1.5 मेगाबाईटइतकी होते. याबाबत दीर्घकाळ संशोधन करण्यात आले व त्याची माहिती आता रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेतील यूसी बर्कले विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. सकृतदर्शनी असे दिसते की माणसाला आपली मातृभाषा शिकण्यात कोणतीही मेहनत करावी लागत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. लहान मुलं अतिशय उत्तम विद्यार्थी असतात जे रोज 1000 बिटस्ची माहिती गोळा करतात. ते शब्दांचे मोठे भांडारच स्मरणात ठेवतात. भाषा शिकण्यात व्याकरणापेक्षा शब्दांचे अर्थ जाणून घेणे हा मनुष्याचा नैसर्गिक गुण असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.
____________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
_*‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ‼*_
______________________________
5
मेंदू हे मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सु. २% असते. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सु. १,२६० घसेंमी., तर स्त्रीच्या सु. १,१३० घसेंमी. असते. अन्य सस्तन प्राण्यांची तुलना केल्यास असे दिसून येते की मानवी मेंदू आकारमानाने आणि वजनाने चिंपँझीच्या मेंदूच्या तिप्पट असतो.

धन्यवाद

🚩जय शिवराय🚩
उत्तर लिहिले · 2/8/2020
कर्म · 16930
7

_*⭕ मानवी  मेंदु  23 वॅटची ऊर्जा निर्माण करतो   ⭕*_


             *_मानवी मेंदू ही निसर्गाची सर्वात जटील आणि प्रभावी निर्मिती आहे. या मेंदूची अनेक रहस्ये आजही पुरती उलगडलेली नाहीत. जगभरातील संशोधक त्यासाठी प्रयत्नशील असतात. आपला मेंदू 23 वॅटची ऊर्जा निर्माण करतो, हे तुम्हाला माहिती आहे का?_*

*मेंदूची प्रत्येक चेतापेशी 40 हजार सिनेप्सिस संरचनांशी निगडीत असते. जर मेंदूच्या शंभर अब्जांपेक्षाही अधिक न्यूरॉन्स म्हणजे चेतापेशींना 40 हजार चेतापेशींनी गुणले तर मेंदूचे ‘कनेक्शन’ संपूर्ण ब्रह्मांडातील तार्‍यांपेक्षाही अधिक होईल! आपल्या शरीराला मिळणार्‍या एकूण ऑक्सिजन पैकी 20 टक्के ऑक्सिजनचा वापर मेंदूच करीत असतो. *मेंदूचा 70 ते 75 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. ज्यावेळी आपण जागृत अवस्थेत असतो, त्यावेळी मेंदू 10 ते 23 वॅट इतकी ऊर्जा निर्माण करतो. इतकी ऊर्जा एखादा बल्ब पेटवण्यासाठी पुरेशी असते. मेंदू हा शरीरातील सर्वाधिक मेदयुक्त भाग आहे. त्यामध्ये शरीराच्या एकूण मेदापैकी 60 टक्के भाग असतो. आपल्या मेंदूत रोज 50 ते 70 हजारांपर्यंत विचार येऊन जातात!*