शरीर
मेंदू
आपल्या मेंदूचे वजन किती आहे?
मूळ प्रश्न: मेंदूचे वजन किती आहे?
मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सु. २% असते. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सु. १,२६० घसेंमी., तर स्त्रीच्या सु. १,१३० घसेंमी. असते.
1 उत्तर
1
answers
आपल्या मेंदूचे वजन किती आहे?
4
Answer link
मानवी मेंदूचे वजन सुमारे दीड किलो असते.
यात आणखी माहिती घ्यायची झाल्यास, पुरुषाच्या मेंदूचे सरासरी वजन १३७० ग्रॅम असते तर स्त्रीच्या मेंदूचे सरासरी वजन १२०० ग्रॅम असते.