
मेंदू
0
Answer link
होय, मेंदूची सूज कमी होऊ शकते. मेंदूतील सूज कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
उपचार पद्धती:
- औषधे: कॉर्टिकोस्टेरॉईड्स (Corticosteroids) आणि Mannitol सारखी औषधे सूज कमी करण्यासाठी वापरली जातात.
- शस्त्रक्रिया: काही गंभीर प्रकरणांमध्ये, मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
- हायपरवेंटिलेशन: श्वासाची गती वाढवून रक्तातील कार्बन डायऑक्साइडची पातळी कमी करणे, ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सूज कमी होते.
- शरीराचे तापमान कमी करणे: शरीराचे तापमान कमी ठेवल्यास मेंदूचा चयापचय दर कमी होतो आणि सूज कमी होण्यास मदत होते.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
0
Answer link
मेंदू:
मेंदू हे आपल्या शरीराचे नियंत्रण केंद्र आहे. हे विचार करणे, शिकणे, स्मरणशक्ती, भावना आणि हालचाल यासारख्या महत्वाच्या कार्यांना नियंत्रित करते.
मेंदूची कार्ये:
- संवेदी माहिती स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे (उदाहरणार्थ, दृष्टी, श्रवण, वास, चव आणि स्पर्श).
- स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणे.
- विचार, तर्क आणि निर्णय घेणे.
- भाषा समजून घेणे आणि बोलणे.
- स्मृती तयार करणे आणि साठवणे.
- भावनांवर नियंत्रण ठेवणे.
- शरीराचे तापमान, रक्तदाब आणि श्वासोच्छ्वास यांसारख्या महत्वाच्या कार्यांचे नियंत्रण करणे.
मेंदू सतत कार्यरत असतो आणि शरीराच्या कार्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
अधिक माहितीसाठी: आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
4
Answer link
मानवी मेंदूचे वजन सुमारे दीड किलो असते.
यात आणखी माहिती घ्यायची झाल्यास, पुरुषाच्या मेंदूचे सरासरी वजन १३७० ग्रॅम असते तर स्त्रीच्या मेंदूचे सरासरी वजन १२०० ग्रॅम असते.
5
Answer link
आपण मोबाईल घेताना नेहमी मेमरी स्टोरेज किती जीबी आहे? हे पाहतो. त्यावरुन ठरवतो घ्यायचा की नाही. पण तरीही ती मेमरी कमीच पडते. आपण मग कॉम्प्युटरवर मेमरीचा बॅकअप घेतो. जास्त क्षमता असलेले मेमरी कार्ड घतो. मात्र, जन्मापासून घडणाऱ्या सर्व घटना मेंदू आपल्या लक्षात ठेवतो. त्याची मेमरी किती आहे माहिती आहे का? जाणून घेऊयात आपल्या मेंदूची क्षमता...
मेंदूची क्षमता असते अंदाजे 2.5 पेटाबाईट. 1 पेटाबाईट म्हणजे 1000 टेराबाईट. 1 टेरा बाईट 1000 जीबी. म्हणजे 16 जीबीची मेमरी असलेले 1 लाख 56 हजार फोन! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. 

आपला मेंदू एका सेंकदात 38 हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, स्पष्ट होती, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये 10000 कोटी मज्जापेशी (न्युरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणार्या तार्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला 3171 वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे 1000 कि.मी. एवढी होईल. पण, न्युरॉन्सची रुंदी फक्त 10 मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
-----------------
12
Answer link
मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट.
१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट.
१ टेरा बाईट १००० जीबी.
म्हणजे १६ जीबी ची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होती, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे.
मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतीलआपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात.
आकाशगंगेत असणार्या तार्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील!
एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण, न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
मग आहात ना तुम्ही स्मार्ट!!!
2
Answer link
मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सु. २% असते. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सु. १,२६० घसेंमी., तर स्त्रीच्या सु. १,१३० घसेंमी. असते.