2 उत्तरे
2
answers
आपला मेंदू किती जीबीचा असतो?
5
Answer link
आपण मोबाईल घेताना नेहमी मेमरी स्टोरेज किती जीबी आहे? हे पाहतो. त्यावरुन ठरवतो घ्यायचा की नाही. पण तरीही ती मेमरी कमीच पडते. आपण मग कॉम्प्युटरवर मेमरीचा बॅकअप घेतो. जास्त क्षमता असलेले मेमरी कार्ड घतो. मात्र, जन्मापासून घडणाऱ्या सर्व घटना मेंदू आपल्या लक्षात ठेवतो. त्याची मेमरी किती आहे माहिती आहे का? जाणून घेऊयात आपल्या मेंदूची क्षमता...
मेंदूची क्षमता असते अंदाजे 2.5 पेटाबाईट. 1 पेटाबाईट म्हणजे 1000 टेराबाईट. 1 टेरा बाईट 1000 जीबी. म्हणजे 16 जीबीची मेमरी असलेले 1 लाख 56 हजार फोन! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. 

आपला मेंदू एका सेंकदात 38 हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, स्पष्ट होती, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये 10000 कोटी मज्जापेशी (न्युरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणार्या तार्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला 3171 वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे 1000 कि.मी. एवढी होईल. पण, न्युरॉन्सची रुंदी फक्त 10 मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
---------------------------------------------
९८९०८७५४९८
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
-----------------
0
Answer link
माणसाच्या मेंदूची साठवण क्षमता (storage capacity) नक्की किती असते हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण मेंदू डेटा साठवण्यासाठी कॉम्प्युटरप्रमाणे काम करत नाही.
वैज्ञानिक दृष्ट्या:
- काही वैज्ञानिकांच्या मते, मानवी मेंदूची साठवण क्षमता 2.5 पेटाबाइट्स (petabytes) पर्यंत असू शकते.
- 1 पेटाबाइट म्हणजे 1024 टेराबाइट्स (terabytes) आणि 1 टेराबाइट म्हणजे 1024 गिगाबाइट्स (gigabytes).
- म्हणजेच, मानवी मेंदू 25,60,000 GB पर्यंत डेटा साठवू शकतो.
परंतु हे केवळ एक अनुमान आहे. मेंदूची क्षमता याहून अधिक असू शकते.
टीप: मेंदू माहिती साठवण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. तो न्यूरॉन्स (neurons) आणि त्यांच्यातील संबंधांच्या आधारावर डेटा साठवतो.