2 उत्तरे
2 answers

मेंदूचे वजन किती आहे?

2
मेंदू हा मानवी चेतासंस्थेचे इंद्रिय आहे. मेंदू आणि मेरुरज्जू मिळून मध्यवर्ती चेतासंस्था बनते. मेंदू हा चेतापेशी, सहयोगी पेशी व रक्तवाहिन्या यांनी बनलेला असतो. प्रौढ मानवी मेंदूत सु. ८६ अब्ज चेतापेशी असतात आणि जवळजवळ तेवढ्याच सहयोगी पेशी असतात. मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन १,३००-१,४०० ग्रॅ. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सु. २% असते. पुरुषाच्या मेंदूचे आकारमान सु. १,२६० घसेंमी., तर स्त्रीच्या सु. १,१३० घसेंमी. असते.
उत्तर लिहिले · 17/7/2020
कर्म · 7815
0

मानवी मेंदूचे वजन साधारणपणे 1.2 किलो ते 1.4 किलो असते.

हे वजन व्यक्तीच्या लिंग, वय आणि शारीरिक रचनेनुसार थोडेफार बदलू शकते.

उदाहरणार्थ:

  • पुरुषांच्या मेंदूचे वजन महिलांच्या मेंदू पेक्षा थोडे जास्त असते.
  • नवजात शिशुच्या मेंदूचे वजन प्रौढांपेक्षा कमी असते.

मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. तो आपल्या विचार, भावना आणि हालचालींवर नियंत्रण ठेवतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाच्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो जाळला तरी नष्ट होत नाही?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
माझ्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
प्रौढ वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?
शरिरात योग्य नियंञण ठेवण्याचे काय कोण करते?
तुम्हाला कसे कळले की कुत्रे श्वसन करतात?