2 उत्तरे
2
answers
गृहितके म्हणजे काय?
1
Answer link
कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण किंवा उपपादन करण्यासाठी एखादी कल्पना गृहीत धरावी लागते व तिच्या अनुषंगाने त्या घटनेचा अर्थ लावावा लागतो.
तो अर्थ जर वास्तव घटना समजण्यास अनुकूल व अनुरूप ठरला, तर गृहीत धरलेली कल्पना (गृहीतके ) ग्राह्य ठरते व नंतर तिला एखाद्या व्यापक नियमाचे किंवा सिद्धांताचे रूप व दर्जा प्राप्त होतो. प्रत्यक्ष इंद्रियांच्या साहाय्याने, गरज लागेल तेथे व साहाय्यक उपकरणांची मदत घेऊन, तसेच सामाजिक शास्त्रांत अनुकूल व प्रतिकूल स्वरूपाची सर्व प्रकारची माहिती गोळा करून, शक्य तेथे प्रयोग करून व मिळालेल्या माहितीची चिकित्सक रीत्या छाननी करून, घटनांच्या वर्तनाचा कल व दिशा व्यक्त करणारी विधाने तयार केली जातात व ती विधाने गृहीतक म्हणून वापरून त्याच्यावरून पुढे व्यापक व वैश्विक नियम घडविले जातात. सुचलेल्या गृहीतकापासून तर्कदृष्ट्या संभाव्य परिणाम निगमित केले जातात व प्रत्यक्ष घटना त्या अपेक्षित व निगमित परिणामांशी जुळतात की नाहीत, हे पाहिले जाते. याला निकषण किंवा पडताळा म्हणतात
0
Answer link
गृहितके (Assumptions): गृहितके म्हणजे काहीतरी सत्य आहे असे मानणे, ज्यावर एखादे विधान, युक्तिवाद किंवा निष्कर्ष आधारित असतो. हे गृहितक सिद्ध करण्याची आवश्यकता नसते, कारण ते आधीपासूनच सत्य मानले जाते.
उदाहरणार्थ:
- एखाद्या कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणताना असे गृहित धरले जाते की लोकांना ते उत्पादन आवडेल.
- वैज्ञानिक संशोधनात, प्रयोग करताना काही गोष्टी स्थिर राहतील असे गृहित धरले जाते.
गृहितकांचे महत्त्व:
- गृहितकांमुळे विचार करणे आणि निर्णय घेणे सोपे होते.
- ते संशोधनाला आणि नवीन कल्पनांना दिशा देतात.
टीप: गृहितके नेहमी सत्यच असतील असे नाही. त्यामुळे, गृहितके तपासणे आणि त्यांची सत्यता पडताळणे महत्त्वाचे आहे.