पावसाळ्यातील एक दिवस निबंध कसा लिहावा?
पावसाळ्यातील एक दिवस
पावसाळा म्हणजे सृष्टीचा उत्सव. जून महिना सुरू झाला की, सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहतात. रखरखत्या उन्हामुळे त्रस्त झालेले जीव पावसाच्या आगमनाने सुखावतात.
पावसाळ्यातील एक दिवस नेहमीच खास असतो. सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि रिमझिम पाऊस पडत होता. वातावरण एकदम शांत आणि थंडगार होते. मला शाळेत जायला अजिबात आवडत नव्हते, पण पाऊस बघून मन प्रसन्न झाले.
मी शाळेत पोहोचलो, तेव्हा माझे मित्र आधीच आले होते. आम्ही सगळे पावसाच्या गप्पा मारत होतो. teachers शिकवत होते, पण माझे लक्ष सारखे खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे होते. पावसाच्या थेंबांनी झाडं आणि रस्ते पूर्णपणे भिजले होते.
Intervel मध्ये आम्ही सगळे मित्र भिजायला बाहेर गेलो. आम्ही कागदी होड्या बनवून पाण्यात सोडल्या आणि खूप मजा केली. पाऊस आमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर पडत होता, त्यामुळे खूप आनंद आला.
शाळा सुटल्यावर मी घरी परतलो, तेव्हा पाऊस अजूनही चालू होता. घरी आईने गरमागरम भजी आणि चहा बनवला होता. पाऊस बघत भजी खाण्यात खूप मजा आली.
संध्याकाळी पाऊस थोडा कमी झाला, पण वातावरण अजूनही आल्हाददायक होते. मी माझ्या कुटुंबासोबत गप्पा मारल्या आणि indoor games खेळलो. पावसाळ्यामुळे बाहेर खेळायला जाण्याचा प्रश्नच नव्हता, पण घरातही खूप मजा आली.
रात्री जेवणानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि खिडकीतून बाहेर बघू लागलो. पावसाच्या आवाजाने मला खूप शांत वाटले आणि लवकरच झोप लागली. पावसाळ्यातील तो दिवस खरंच खूप आनंददायी होता.