पर्यावरण निबंध निबंध लेखन

वृक्षवल्ली आम्हा सोयरे निबंध कसा लिहाल?

2 उत्तरे
2 answers

वृक्षवल्ली आम्हा सोयरे निबंध कसा लिहाल?

0
 
 वृक्षवल्ली आम्हा सोयरे 
 



                वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते. विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो. घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते. ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात, दळणवळण होते, व्यवहार वाढतो, हीच झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे.

                हे सर्वकाही आणि अश्या बऱ्याच गोष्टी ही वृक्ष आपल्याला देतात, अगदी निस्वार्थपणे. आपण मात्र या उपकारांची परतफेड कशी करतो? वृक्षतोड करून, प्रदूषण करून, पिकांवर विषारी फवारे मारून, रानामध्ये वनवे लावून, आपल्या पालनकर्त्या निसर्गाचाच संहार करून. किती क्रूर आणि बद्ध झालाय माणूस, आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहत आहोत.

                आता ही वृक्षतोड एवढी सामान्य सामान्य झाली आहे कि आपणास याबद्दल काहीच वाटत नाही. आपण असे वागत आहोत की काही घडतच नाहीये. आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. आपण पाहतो आजकाल दुष्काळ खूप पडतो, पाण्याची टंचाई जाणवते, पृथ्वीचे तापमान वाढत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. निसर्ग देत असलेल्या या सर्व चेतांवण्याकडे आपण आपण दुर्लक्ष करत आहोत. जर निसर्गाचा, जंगलांचा असाच ऱ्हास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे मानवाचे, पशुपक्ष्यांची जगणे अशक्य होईल.

                पशु, पक्षी, वृक्ष, जंगले आणि अगदी कीटकसुद्धा मानवी जीवन चक्राचा भाग आहेत, आपण हे अगदी सहावी, सातवीच्या पुस्तकात शिकलो आहोत. हे सत्य समजून घेणे अवकाश विज्ञानासारखे कठीण ही नाही. वृक्षतोड केली, जंगले जाळली हे तर हे जीवन चक्र तुटू शकते आणि याचा परिणाम सर्व सजीवांना आणि मानवालाही भोगावा लागेल. जर आपण असाच निसर्गाचाच विनाश केला तर आपल्याला अन्नधान्य कुठून मिळेल. मनुष्य प्लास्टिक आणि काँक्रीट खाऊन तर जगू शकत नाही. हे सगळे समजायला तसे सोपं आहे, आणि आपणास ते कळते सुद्धा, तरीही आपण वृक्षतोड, वणवे थांबवत नाही.

                  यावरती उपाय म्हणून सरकार, विविध सामाजिक संघटना अनेक प्रकारच्या योजना, परियोजना आमलात आणतात. पण त्या फक्त घोषणा आणि निधीच्या चक्रातच अडकून राहतात. विविध नियम, कायदे मानवाला अवैध वृक्षतोडी पासुन परावृत्त करण्‍यात सफल होऊ शकले नाहीत.

                     नवीन बनलेल्या तेलंगणा राज्यात काही वर्षांपासून “हरित हरम” नावाचा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत दर वर्षी लाखो झाडे लावली जातात, हि मोहीम तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री के.चंद्रशेखर राव यांच्या मनाजवळची आहे. या मोहिमेत सिनेमा आणि व्यापार जगातील प्रसिद्ध व्यक्तींनीही भाग घेतला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मोहिमेत सर्व सामान्य लोकांनी मनापासून भाग घेतला. देशात नाही तर जगभरात अश्या वृक्षारोपण मोहिमांची गरज आहे.

                   एक झाड पूर्ण वाढायला वर्षे जातात आणि आज काळाच्या प्रगत हत्यारांनी ते काही मिनिटात तोडता येते. आपण अगोदरच निर्सगाचा खूप दुरुपयोग केला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, आज ही आपण आपल्या निसर्गाचे सौदर्य परत आणू शकतो.

🎄🌻🌷🎄🌻🌷🎄🌻🌷🎄🌻🌷🎄


उत्तर लिहिले · 16/12/2022
कर्म · 53715
0
मी तुम्हाला 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या विषयावर निबंध कसा लिहायचा यासाठी काही मुद्दे आणि माहिती देऊ शकेन, ज्यामुळे तुम्हाला निबंध लिहायला मदत होईल.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे


प्रस्तावना:

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या उक्तीचा अर्थ आहे की झाडे आपले नातेवाईक आहेत. संत तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून वृक्ष आणि माणसांमधील अतूट संबंधाचे वर्णन केले आहे. निसर्गातील झाडे, वेली, प्राणी आणि पक्षी हे मानवाचे मित्र आहेत आणि ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.


वृक्षांचे महत्त्व:

  • पर्यावरणाचे संतुलन: झाडे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात. ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध राहते.
  • पावसाचे प्रमाण: झाडे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि ते वातावरणात सोडतात, ज्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते.
  • जमिनीची धूप थांबवणे: झाडे आपल्या मुळांनी माती घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते.
  • नैसर्गिक अधिवास: झाडे अनेक प्राणी आणि पक्ष्यांसाठी घर असतात.
  • उपजीविका: झाडे आपल्याला फळे, फुले, लाकूड आणि औषधे देतात, ज्यामुळे आपली उपजीविका चालते.

वृक्ष आणि मानव:

माणूस आणि झाडं एकमेकांवर अवलंबून असतात. झाडं माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारी हवा देतात आणि माणूस झाडांना वाढण्यासाठी आवश्यक असणारे घटक पुरवतो.


वृक्ष संवर्धनाची गरज:

  • आजकाल प्रदूषण वाढत आहे आणि त्याचा परिणाम झाडांवर होत आहे. त्यामुळे झाडे वाचवणे खूप गरजेचे आहे.
  • वृक्षतोड थांबवणे आणि नवीन झाडे लावणे आवश्यक आहे.
  • झाडांची काळजी घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

उपसंहार:

वृक्ष हे आपले सोयरे आहेत आणि त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून झाडे लावली पाहिजेत आणि त्यांचे संगोपन केले पाहिजे, जेणेकरून आपले भविष्य सुरक्षित राहील.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

मोबाईल बंद झाले तर निबंध कसा लिहायचा?
प्रस्तुत तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा?
खालील विषयावर निबंध लिहिण्‍यासाठी मुद्द्यांची क्रमवार मांडणी करा: 'हे विश्‍वची माझे घर'?
आरशाचे मनोगत निबंध कसा लिहाल?
मोबाईल नसले तर यावर निबंध कसा लिहाल?
अधिमान्यतेवर निबंध कसा लिहाल?
मी वृक्ष बोलतोय यावर निबंध कसा लिहावा?