भारतीय इतिहास
इतिहास
महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांचे आडनाव काय होते?
मूळ प्रश्न: महाभारतामधील अर्जुनाचे आडनाव काय होते?
आडनाव ही सध्याच्या काळातील संकल्पना आहे. जुन्या काळामध्ये आडनाव अशी काही गोष्ट नव्हती. लोक खूप कमी होते आणि त्यांच्या कुळावरूनच त्यांना ओळखलं जायचं. अर्जुनाचे म्हणजेच महाभारतातील पांडवांचे कुळ होते कुरु. कुरूला कौरव असे देखील म्हणतात. जसे की श्रीकृष्णाचे यादव कुळ होते आणि म्हणून काही लोक श्रीकृष्णाचे आडनाव हे यादव आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे अर्जुनाचे म्हणजेच पांडवांचे आणि कौरवांचे आडनाव हे कुरु किंवा कौरव असे होते असे त्या संदर्भानुसार आपण म्हणू शकतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers