शारीरिक विकास आरोग्य

आपली उंची वाढ होण्यासाठी कारणीभूत घटक कोणते?

2 उत्तरे
2 answers

आपली उंची वाढ होण्यासाठी कारणीभूत घटक कोणते?

1

काही मुले बुटकी असतात. त्यामुळे इतर मित्रांच्या बरोबर हिंडताना, खेळताना कायमच त्यांना चिडवले जाते. घरातही त्यांची इतरांबरोबर तुलना केली जाते. "काही उपाय सांगा हो. आमच्या बंड्याची उंची वाढतच नाहीय," अशी वाक्ये ऐकवली जातात. या सर्वामुळे अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते. सर्वच क्षेत्रांत मग ती मुले मागे पडतात. उंची कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात. मुलांच्या वाढीच्या काळात जर काही गंभीर रोग झाला तर वाढ खुंटते. कुपोषित मुलांची उंची कमी वाढते. वजन आयुषभर वाढू शकत असले तरी उंची मात्र जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षांपर्यंतच वाढू शकते. त्यामुळे उंची कमी असेल तर ती कायमसाठी तशीच राहते. उंची किती वाढते, हे शरीरातील पेशींमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांवरच अवलंबून असते. त्यामुळेच माणसांची उंची ठराविक प्रमाणात वाढते. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथीच्या स्रावांवरही उंची वाढणे अवलंबून असते. त्यामुळे उंची वाढण्यासाठी काय करावे, या प्रश्नाचे उत्तर विचारणाऱ्याच्या वयावर अवलंबून राहील. जर त्याचे वय २५ च्या आत असेल तरच काही प्रयत्न करता येतील. त्यानंतर त्याच्या संपूर्ण तपासण्या करून व उंची न वाढण्याचे कारण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करावी लगेल. हार्मोन्स देणे, गंभीर रोग असल्यास त्वरित उपाय करणे, व्यायाम अशा अनेक उपायांचा त्यात समावेश होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, "उंच वाढला एरंड, तरी का तो होईल इक्षुदंड' ही म्हण लक्षात ठेवायला हवी. उंचीवर नाम बुद्धिमत्ता व कर्तृत्व अवलंबून नसते; हे लालबहादूर शास्त्री, सुनिल गावस्कर, सचिन तेंडूलकर यांनी आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे कोणाची उंची कमी असली तरी त्याला हिणवू नये, उलट त्यांना मदत करावी. म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड येणार नाही व समाजासाठी ते उपयुक्त कार्य करू शकतील.

उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

उंची वाढ होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, त्यापैकी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:

  1. आनुवंशिकता (Heredity):

    उंची वाढीत आनुवंशिकतेचा सर्वात मोठा वाटा असतो. जर आई-वडील उंच असतील, तर मुलांची उंची वाढण्याची शक्यता जास्त असते.

  2. पोषण (Nutrition):

    योग्य आणि संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. उंची वाढीसाठी प्रथिने (proteins), कॅल्शियम (calcium), व्हिटॅमिन डी (vitamin D) आणि इतर आवश्यक पोषक तत्वे महत्त्वाची असतात.

  3. शारीरिक क्रिया (Physical Activity):

    नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. खेळणे, धावणे, योगा करणे यांसारख्या ऍक्टिव्हिटीजमुळे उंची वाढण्यास मदत होते.

  4. झोप (Sleep):

    पुरेशी झोप घेणे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे. झोपेत असताना वाढीचे हार्मोन्स (growth hormones) अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

  5. हार्मोनल बदल (Hormonal Changes):

    शरीरातील हार्मोन्सचे संतुलन योग्य असणे आवश्यक आहे. वाढीच्या काळात, विशेषतः पौगंडावस्थेत (puberty) हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे उंची वाढते.

  6. लिंग (Gender):

    साधारणपणे, मुलांची उंची मुलींपेक्षा जास्त वाढते.

  7. आरोग्य (Health):

    आजारांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. काही आजारपणामुळे उंची वाढण्याची प्रक्रिया मंदावते.

टीप: उंची वाढण्याची प्रक्रिया साधारणपणे वयाच्या १८ ते २० वर्षांपर्यंत चालू असते. त्यामुळे या काळात योग्य आहार आणि जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1760

Related Questions

गेले १०-१५ दिवसांपासून माझा डावा डोळा सारखाच उडत आहे, त्यामागचे कारण काय?
ताणतणावाचा आपल्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो? ताणतणाव कमी करण्यासाठी कार्यस्थळावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील?
प्रत्येक घास खाताना पोट गच्च व घास अडकल्यासारखे होते का?
खाताना छातीत जळजळ होते?
ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत?
महिला पाळी आल्यावर कशाचा उपयोग करतात?
वजन वाढवण्यासाठी उपाय व वय ३८ वर्ष?