Topic icon

शारीरिक विकास

1

काही मुले बुटकी असतात. त्यामुळे इतर मित्रांच्या बरोबर हिंडताना, खेळताना कायमच त्यांना चिडवले जाते. घरातही त्यांची इतरांबरोबर तुलना केली जाते. "काही उपाय सांगा हो. आमच्या बंड्याची उंची वाढतच नाहीय," अशी वाक्ये ऐकवली जातात. या सर्वामुळे अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते. सर्वच क्षेत्रांत मग ती मुले मागे पडतात. उंची कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात. मुलांच्या वाढीच्या काळात जर काही गंभीर रोग झाला तर वाढ खुंटते. कुपोषित मुलांची उंची कमी वाढते. वजन आयुषभर वाढू शकत असले तरी उंची मात्र जास्तीत जास्त वयाच्या २५ वर्षांपर्यंतच वाढू शकते. त्यामुळे उंची कमी असेल तर ती कायमसाठी तशीच राहते. उंची किती वाढते, हे शरीरातील पेशींमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांवरच अवलंबून असते. त्यामुळेच माणसांची उंची ठराविक प्रमाणात वाढते. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथीच्या स्रावांवरही उंची वाढणे अवलंबून असते. त्यामुळे उंची वाढण्यासाठी काय करावे, या प्रश्नाचे उत्तर विचारणाऱ्याच्या वयावर अवलंबून राहील. जर त्याचे वय २५ च्या आत असेल तरच काही प्रयत्न करता येतील. त्यानंतर त्याच्या संपूर्ण तपासण्या करून व उंची न वाढण्याचे कारण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करावी लगेल. हार्मोन्स देणे, गंभीर रोग असल्यास त्वरित उपाय करणे, व्यायाम अशा अनेक उपायांचा त्यात समावेश होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, "उंच वाढला एरंड, तरी का तो होईल इक्षुदंड' ही म्हण लक्षात ठेवायला हवी. उंचीवर नाम बुद्धिमत्ता व कर्तृत्व अवलंबून नसते; हे लालबहादूर शास्त्री, सुनिल गावस्कर, सचिन तेंडूलकर यांनी आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे कोणाची उंची कमी असली तरी त्याला हिणवू नये, उलट त्यांना मदत करावी. म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड येणार नाही व समाजासाठी ते उपयुक्त कार्य करू शकतील.

उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
2
माणसाची उंची ही २५ वर्षांपर्यंत वाढू शकते. नंतर वाढण्याची शक्यता खूप कमी असते.
उत्तर लिहिले · 8/8/2019
कर्म · 2120
1
बाळंतपणानंतर, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर, मासिक पाळी उठू शकते.
उत्तर लिहिले · 23/10/2018
कर्म · 28020
3
भावा माणसाची उंची २१ वय होईपर्यंतच वाढते, २१ नंतर जाडी वाढते.
उत्तर लिहिले · 12/9/2017
कर्म · 3995
2
साधारणपणे 21 किंवा 22 या वयापर्यंत माणसाची उंची वाढू शकते.
उत्तर लिहिले · 6/8/2017
कर्म · 6720
1

जवळपास २४ वर्ष. आयुर्वेदिक औषध उपलब्ध नाही. शक्य असल्यास व्यायाम करा.

उत्तर लिहिले · 27/3/2017
कर्म · 15