2 उत्तरे
2
answers
खारे वारे व मतलई वारे म्हणजे काय?
4
Answer link
खारे वारे : दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर तापते. तेथील हवाही जास्त लवकर तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. याउलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात या वाऱ्यांना सागरी किंवा खारे वारे म्हणतात. अशा प्रकारे सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे खारे वारे निर्माण होतात.
मतलई वारे: रात्री समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर तापते व जास्त प्रमाणात थंड होते. त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त राहतो. याउलट रात्री समुद्राचे पाणी उशिरा थंड होते. त्यामुळे समुद्रावरील हवा तुलनेने जास्त तापलेली राहते व तेथे हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. त्यांना भूमीय किंवा मतलई वारे म्हणतात. अशा प्रकारे जमिनीवरील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी. या हवेच्या दाबातील फरकामुळे मतलई वारे निर्माण होतात.
धन्यवाद ||

0
Answer link
खारे वारे (Sea Breeze):
- खारे वारे हे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.
- दिवसा जमिनीच्या तुलनेत समुद्र थंड असतो. त्यामुळे समुद्रावरील हवा थंड असल्याने तिची घनता वाढते आणि दाब वाढतो.
- जमीन लवकर तापते, त्यामुळे जमिनीवरील हवा गरम होऊन हलकी होते आणि वर जाते,Resulting in कमी दाबाचा पट्टा तयार होतो.
- हवा नेहमी उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहते, त्यामुळे समुद्राकडील थंड हवा जमिनीकडे वाहते. ह्याला खारे वारे म्हणतात.
मतलई वारे (Land Breeze):
- मतलई वारे हे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
- रात्री जमीन लवकर थंड होते, तर समुद्र हळू हळू थंड होतो. त्यामुळे जमिनीवरील हवा थंड असल्याने तिची घनता वाढते आणि दाब वाढतो.
- समुद्रावरील हवा जमिनीच्या तुलनेत गरम असल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो.
- परिणामी, जमिनीकडील थंड हवा समुद्राकडे वाहते, ज्याला मतलई वारे म्हणतात.
अधिक माहितीसाठी: